‘स्वरसम्राज्ञी’ लतादिदी

गानकोकिळा ‘भारतरत्न’ लता मंगेशकर यांची आज जयंती. जगाच्या पटलावर भारतीय संगिताचा आवाज आणि ओळख बनलेल्या लतादिदी यांची आज विशेष आठवण.

सन 1942 साली लतादिदींनी संगीत दुनियेत पाऊल ठेवलं. मास्टर विनायक यांच्या मार्गदर्शानाखाली लतादिदींनी 1942 साली 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी पहिलं गाणं गायलं. पण हे कधी प्रदर्शितच झालं नाही. पण लतादिदींनी हार नाही मानली.

1942 सालीच लतादिदींनी पहिली मंगळागौर या चित्रपटात छोटी भूमिका साकारत, नटली चैत्राची नवलाई हे गीतही गायलं.

लतादिदी या आपल्या कुटुंबियांसोबत मुंबईत आल्यावर त्यांनी संगिताचं शास्त्रोक्त शिक्षण घ्यायला सुरूवात केली.

यामधल्या काळात त्यांनी काही गाणीही गायली. मात्र, 1949 साली महल चित्रपटातील ‘आएगा आएगा आनेवाला’ या मधुबाला यांच्यावर चित्रीत केलेल्या गाण्यातून खरा ब्रेक मिळाला. या गीतानंतर त्या नावारूपाला येऊ लागल्या.

1950 च्या दशकापासून चित्रपट सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त लतादिदींचाच आवाज गुंजत असे. लतादिदींनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत वेगवेगळ्या अशा 36 भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत.

लतादिदींच्या आवाजामध्ये एक करिष्मा होता. देशभक्ती, आध्यात्मिक, प्रेम वा दुःख अशा कोणत्याही स्वरूपातली गाणी ही त्यांच्या आवाजात ऐकताना त्या-त्या मूडमध्ये आपल्याला स्वैर करून आणतात.

लतादिदींच्या आवाजाची जादू ही कदापी न उतरणारी आहे. सहाबहार आठवणीत राहणाऱ्या लतादिदींच्या आवाजातील शेवटचं गीत ‘ठीक नहीं लगता’ हे संगीत दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी 2021 साली प्रदर्शित केलं आहे.

त्यांच्या आवाजातल्या या वैविध्यामुळेच त्यांना गान कोकिळा, स्वर कोकिळा, क्वीन ऑफ मेलोडी अशा अनेक सन्मानीय पदव्या मिळाल्या आहेत.

भारतरत्न लतादिदींना फ्रान्स सरकारने फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘द लीजन ऑफ ऑनर’ या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

इतर बातम्या

Ganeshotsav : गणेश मूर्ती ही विविध रंगाची आणि धातूपासून तयार केली जाते. या प्रत्येक धातूच्या गणेशमूर्ती मागे विशेष असा अर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ