केरळमधील धार्मिक उत्सवात रोबोटिक हत्तीचा प्रवेश

Robot Elephant- हा रोबोटिक हत्ती तयार करायला 5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. 11 फूट उंच आणि 800 किलो वजनाचा हा हत्ती आहे. या हत्तीला 'रमन' असे नाव देण्यात आलं आहे
[gspeech type=button]

केरळमधील इरिंजदापल्ली इथल्या श्रीकृष्ण मंदिरात ‘नादायरुथल’ या धार्मिक विधीत खऱ्या हत्तीऐवजी आत्ता रोबोटिक हत्तीचा वापर करण्यात येत आहे. हा उपक्रम दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री पार्वती थिरुवोथू यांच्या नेतृत्वाखाली प्राण्यांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ एनिमल्स (People for the Ethical Treatment of Animals) (PETA) च्या सहकार्याने राबवण्यात आला आहे.

हा रोबोटिक हत्ती तयार करायला 5 लाख रुपयांचा खर्च आला आहे. 11 फूट उंच आणि 800 किलो वजनाचा हा हत्ती आहे. या हत्तीला ‘रमन’ असे नाव देण्यात आलं आहे. इलेक्ट्रीक करंटच्या साहाय्याने रमनचे डोके, कान आणि शेपटी हलतात. रमनच्या हालचाली एवढ्या सर्राईत आहे की तो रोबोटीक हत्ती आहे, यावर चटकन विश्वासच बसत नाही. गंमत म्हणजे त्याच्या पाठीवर खऱ्या हतीप्रमाणे पाच लोक बसू शकतात. त्याचा उपयोग मिरवणुकीतही करता येऊ शकतो. दुबई शॉपिंग फेस्टिव्हलसाठी हत्तीची शिल्पे बनवणाऱ्या त्रिशूर येथील कलाकारांच्या गटाने या रोबोटिक हतीची निर्मिती केली आहे.

बऱ्याच काळापासून विविध धार्मिक विधी, उत्सव आणि इतर कारणांसाठी जिवंत हत्ती किंवा इतर प्राण्यांचा वापर टाळण्याचे आवाहन केलं जात आहे. हत्तींमुळे होणाऱ्या हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर, पेटा इंडिया आणि पार्वती थिरुवोथू यांच्या सहकार्याने हा रोबोटिक हत्ती मंदिराला भेट म्हणून देण्यात आला.

केरळमधील देवस्थानांमध्ये हत्तींची उपस्थिती अनिवार्य असते. परंतु बंदिवासात असलेल्या हत्तींमध्ये अनेकदा हिंसक वर्तन दिसून येते. हेरिटेज अ‍ॅनिमल टास्क फोर्सच्या सर्वेक्षणानुसार, गेल्या 15 वर्षांत 526 लोकांचा बंदिस्त हत्तींनी बळी घेतला आहे.त्यामुळे जीवितहानी टाळण्यासाठी खऱ्या हत्तींऐवजी रोबोटिक हत्तींचा वापर करण्याची मागणी केली जात होती, जी पूर्ण झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Government new rules for two-wheelers : तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी केली, तर तिच्यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS) असणं
Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ