22 ऑक्टोबर 1797 मानवाची ‘पहिली पॅराशूट उडी’

First parachute jump : आकाशात उडण्याचे स्वप्न मानवाने प्राचीन काळापासून पाहिलं आहे. या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले. यातलेच एक आंद्रे-जॅक गार्नेरिन
[gspeech type=button]

आकाशात उडण्याचे स्वप्न मानवाने प्राचीन काळापासून पाहिलं आहे. या स्वप्नाला वास्तविकतेमध्ये उतरवण्यासाठी अनेकांनी प्रयत्नही केले. यातलेच एक आंद्रे-जॅक गार्नेरिन त्यांनीच पहिल्यांदा पॅराशूट वापरून यशस्वी उडी मारून एक नवीन इतिहास रचला.

22 ऑक्टोबर 1797 रोजी पॅरिसमध्ये आकाशात एक हायड्रोजन फुगा उंच उडत होता, त्याच्या खाली एक टोपली होती. गार्नेरिनने स्वतः डिझाइन केलेलं पॅराशूट त्यांच्या कमरेला बांधले होते. 3200 फूट उंचीवर पोहोचल्यावर त्यांनी फुग्यापासून वेगळे होत पॅराशूट उघडला. आणि मग ते हळूहळू जमिनीकडे येऊ लागले. त्यांच्या पॅराशूटमध्ये काही अडचणी होत्या, पण तरीही ते सुरक्षितपणे जमिनीवर उतरले.

फ्रेंच क्रांतीदरम्यान तुरुंगात कैदेत असताना, गार्नेरिनच्या मनात हा अनोखा विचार आला. त्यांनी विचार केला की, हवेच्या प्रतिकारशक्तीचा वापर करून उंचावरून पडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवता येतील आणि त्यांच्या याच कल्पनेला वास्तविक स्वरूप देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे संशोधन केलं.

पॅराशूटची कल्पना लिओनाडों दा विंची यांची

पंधराव्या शतकात पॅराशूटची कल्पना लिओनार्डो दा विंची यांनी मांडली होती आणि त्याचे स्केचही तयार केले होते. दा विंचीच्या या डिझाइनपासून प्रेरणा घेऊन, फॉस्ट फ्रान्सिसने 1617 मध्ये कडक-फ्रेम असणाऱ्या पॅराशूटमध्ये स्वार होऊन व्हेनिस टॉवरवरून उडी मारली. यानंतर असे अनेक प्रयत्न झाले पण सर्वात प्रथम यशस्वी पॅराशूट जंप 1797 मध्ये आंद्रे-जॅक गार्नेरिन यांची होती.

1802 मध्ये, गार्नरिनन यांनी इंग्लंडमधील प्रदर्शनादरम्यान 8,000 फुटांवरून नेत्रदीपक उडी मारली होती. त्यानंतर नवीन पॅराशूटची चाचणी घेण्याच्या तयारीत असताना 1823 मध्ये गार्नरिनन यांचा बलून अपघातात मृत्यू झाला. गार्नेरिनची पत्नी, जीन-जेनेव्हिव्ह, ही पहिली महिला पॅराशूटिस्ट बनली. 1799 मध्ये तिनेही पॅराशूट वापरून उडी मारली होती. गार्नेरिनच्या या अद्भूत शोधाने आज पॅराशूटचा वापर अनेक क्षेत्रात होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला
Denmark Book Tax Free : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ