संरक्षण कंपनीवर हल्ल्यानंतर तुर्कस्तानचा इराक, सीरीयातील 32 कुर्दी दहशतवाद्यांवर एअर स्ट्राईक

Turkey : तुर्कस्थानची राजधानी अंकाराजवळील एका संरक्षण कंपनीवर बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार आणि 22 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर बुधवारी रात्री तुर्कस्थानने इराक आणि सीरियामधील कुर्दिश दहशतवाद्यांच्या 32 ठिकाणांवर हवाई हल्ले केले.
[gspeech type=button]

तुर्कस्थानची राजधानी अंकाराजवळील एका संरक्षण कंपनीवर बुधवार, 23 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात पाच जण ठार आणि 22 जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर बुधवारी रात्री तुर्कस्थानने इराक आणि सीरियामधील कुर्दिश दहशतवाद्यांच्या 32 ठिकाणांवर हवाई हल्ले केले.

तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या वायुसेनेने कुर्द कामगार पक्षाच्या (PKK) 32 दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. कुर्दिश अल्पसंख्यांकाच्या मागण्यांसाठी लढणाऱ्या PKK या अतिरेकी संघटनेवर तुर्कस्थान, अमेरिका आणि इंग्लंडमध्ये बंदी आहे.

हल्ला कसा झाला?
खासगी न्यूज चॅनेल NTV च्या वृत्तानुसार, एका दहशतवाद्याने इमारतीत प्रवेश करून स्वतःला उडवून दिले. या हल्ल्यात स्फोटक द्रव्य वापरण्यात आले होते. त्यानंतर इतर हल्लेखोरांनी इमारतीत गोळीबारही केला. या संपूर्ण घटनाक्रमात एक तासाहून अधिक काळ गोळीबार सुरू होता.

साबाह वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या CCTV फुटेजमध्ये एक संशयित दहशतवादी दिसून येतोय. तो काळ्या कपड्यात होता आणि त्याच्या हातात एक रायफल आणि बॅग होती.

तुर्की सरकारची प्रतिक्रिया

सध्या तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तैप एर्दोगान हे ब्रिक्स शिखर परिषदेसाठी रशियाच्या कझानमध्ये आहेत. त्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी म्हटले की, हा एक दहशतवादी हल्ला होता आणि यामागे PKK ही दहशतवादी संघटन आहे. त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजलीही वाहिली.

तुर्कीचे संरक्षण मंत्री यासर गूलर यांनी PKK ला ‘खोटारडे’ म्हटले आहे.PKK ने अनेकदा अशा प्रकारचे हल्ले करून देशाची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न केला आहे असं ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ