कोरीअन ग्लास स्कीन!

Korean Glass Skin : कोरिअन स्कीनमध्ये मेलॅनिन आणि तेलग्रंथींचे प्रमाण भारतीयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारतीयांच्या तुलनेत पिगमेंटेशन, मेलास्मा, सिबोरियासारख्या समस्यांचे प्रमाणही कमी किंवा नगण्य आहे.
[gspeech type=button]

मला सौंदर्य क्षेत्रात काम करताना जवळपास 25 वर्ष झाली. त्यातले अनुभव आणि निरीक्षणातून एक गोष्ट लक्षात आली आहे. ती म्हणजे आपण भारतीय त्वचा सौंदर्याबद्दल म्हणावे तितके जागरुक नाही. उदासीनच म्हणा ना! आणि डब्या-बाटल्यांमधून येणाऱ्या उत्पादनांसाठी मानसिकताच वेगळी आहे. पण सध्याची तरुणाई मात्र K-Beauty ने झपाटलेली आहे. कारण Korean प्रॉडक्टमधले वैविध्यपूर्ण ingredients. जसे rice water, snail mucin (गोगलगाय सरकताना, जो स्त्राव सोडते त्याला mucin म्हणतात), जिनसँग, propolis (मधमाशांच्या पोळ्याच्या भिंतीतील घटक) असे वेगळे घटक …. त्यांची नावं, इंटरनेटवरची माहिती त्यांना आकर्षित करते. विशेष म्हणजे, ब्युटी प्रोडक्ट अॅप्सना कोरिअन प्रॉडक्टसाठी वेगळं सेगमेंट तयार करावं लागलं. 

कोरियन 10 -स्टेप स्किनकेअर रूटीन

K – Skincare म्हणजे प्रामुख्याने हायड्रेशन आणि मॉइश्चरायझेशन आहे. भारतीय उपखंडात बहुतांश भागात हवामान उष्ण आणि दमट आहे. त्यामुळे त्यातले बरेच प्रॉडक्ट आपल्याला सुटेबल नाही असं वाटतं. दुसरं म्हणजे कोरिअन स्कीन आणि इंडियन स्कीनमधला फरक. कोरिअन स्कीनमध्ये मेलॅनिन आणि तेलग्रंथींचे प्रमाण भारतीयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे भारतीयांच्या तुलनेत पिगमेंटेशन, मेलास्मा, सिबोरियासारख्या समस्यांचे प्रमाणही कमी किंवा नगण्य आहे.

आता आपण कोरियन स्किनकेअर रूटीनची प्रत्येक पायरी समजून घेऊ आणि ती भारतीय त्वचेसाठी किती उपयुक्त आहे ते पाहू.

1.ऑईल-बेस्ड क्लीन्झर 

ऑईल-बेस्ड क्लेन्झरने त्वचेवरील मेकअप, रूटीन प्रॉडक्ट्स, घाम आणि प्रदूषण जसे धूळ कार्बनचे अंश स्वच्छ केले जातात. हेवी मेकअप ह्या क्लेंझर ने पटकन निघतो.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: भारतातील अनेक लोकांची स्किन ऑइली आहे. त्यामुळे तेल लावल्याने एक्ने होऊ शकतात अशी सर्वांना भीती वाटते. परंतु योग्य प्रकारे वापरल्यास, हे क्लीन्झर त्वचेत अतिरिक्त तेल न ठेवता त्वचा स्वच्छ करण्याचे काम करतात.

2.वॉटर-बेस्ड क्लीन्झर 

दुसऱ्या स्टेपमधे वॉटर बेस्ड क्लीन्झर वापरले जाते. हे ऑइली क्लींझरचे राहिलेले कण, घाम, तेलामध्ये न विरघळणारे घटक जसे घाम स्वच्छ करण्याचे काम करते. कमी pH, सल्फेट फ्री क्लेंझर खूप उपयुक्त असतात. 

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: भारतीय हवामानात ही स्टेप खूप महत्त्वाची आहे, कारण उष्ण हवामानामुळे घाम आणि तेलामुळे मुरुमांची समस्या उद्भवते. सॉफ्ट आणि सल्फेट-फ्री क्लीन्झर भारतीय त्वचेसाठी योग्य आहे.

3.एक्सफोलिएशन

एक्सफोलिएशन त्वचेवरील मृत त्वचा काढून ताज्या पेशींची वाढ करते. रोजच्या वापरासाठी कोरियन स्कीनकेअरमध्ये मऊ आणि सौम्य एक्सफोलिएटर वापरले जातात. ही स्टेप पुढच्या ट्रीटमेंटसाठी खूप महत्त्वाची आहे. डेड स्किन निघल्यामुळे नवीन पेशी उत्तेजित असतात आणि त्यानंतर वापरलेलं प्रोडक्ट त्वचा चांगल्या प्रकारे शोषून घेते. 

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: भारतीय त्वचेलाही एक्सफोलिएशनची गरज असते, मात्र जास्त प्रमाणात केल्यास त्वचा लाल किंवा इरीटेट होऊ शकते आणि हायपर पिग्मेंटेशनची समस्या वाढू शकते. आठवड्यातून दोनदा एक्सफोलिएटर वापरणे योग्य ठरते. रोजच्या वापरासाठी फोमिंग क्लींझर बरा पडतो. त्याने स्किन स्वच्छ आणि रेसिड्यू फ्री होते. 

4.टोनर

कोरियन स्किनकेअरमध्ये टोनर त्वचेचा pH बॅलन्स करण्याचे काम करतो. हा टप्पा त्वचेला स्थिर करून पुढील उत्पादनांसाठी तयार करतो.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: टोनर भारतीय त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरू शकतो, विशेषतः कोरड्या किंवा साध्या त्वचेसाठी गुलाब पाणी आणि ऑइली स्किन साठी कॅमोमाईल किंवा ग्रीन टी यासारखे घटक असलेले टोनर भारतीय त्वचेसाठी योग्य आहेत.

5.एसेन्स

एसेन्स म्हणजे अर्क. अत्यंत सौम्य आणि मॉइश्चरायझरयुक्त पदार्थ जो त्वचेत खोलवर हायड्रेशन देतो. ह्यात अर्क हा प्रमुख घटक असल्याने हे त्वचेला अधिक मऊ आणि ताजेतवाने करण्याचे काम करतो.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: ज्या लोकांची त्वचा तेलकट आहे त्यांना हा टप्पा अतिरिक्त वाटू शकतो. परंतु सौम्य आणि नॉन-कॉमेडोजेनिक एसन्स वापरल्यास त्वचेची मॉइश्चरची पातळी सुधारते. कोरड्या त्वचेसाठी हा टप्पा विशेषतः उपयुक्त आहे.

6.सीरम

सीरम एक विशेष घटक असलेला पदार्थ आहे जो त्वचेला पोषण देतो आणि विविध समस्यांवर लक्ष केंद्रित करतो, जसे की पिग्मेंटेशन, मुरुम, किंवा सुरकुत्या.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: पिग्मेंटेशनची समस्या भारतीय त्वचेत सामान्य आहे. त्यामुळे नायसिनामाइड किंवा व्हिटॅमिन C असलेले सीरम उपयुक्त ठरू शकते.

7.शीट मास्क

शीट मास्क म्हणजे त्वचेला पोषण देण्यासाठी वापरण्यात येणारा मुखवटा. साधारणपणे लिंटचा बनलेला असतो. ह्या मास्कला सीरम किंवा एसेंसमधे बुडवून वापरतात. असे मास्क तयार पण मिळतात. हे त्वचेला हायड्रेशन देतातच पण मऊपणा ही देतात.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: शीट मास्क भारतीय हवामानात ताजेपणा देतात, परंतु दररोज वापरण्याची गरज नाही. आठवड्यातून एक किंवा दोन वेळा वापरणे पुरेसे आहे.

8.आय क्रीम

आय क्रीम डोळ्यांच्या आसपासच्या भागासाठी असते, जी त्वचेला हायड्रेट करून सुरकुत्या आणि काळ्या वर्तुळांपासून बचाव करते.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: डार्क सर्कल्स भारतीय लोकांमध्ये सामान्य असतात. कॅफीन किंवा व्हिटॅमिन C असलेले आय क्रीम उपयुक्त ठरते. पण हे रात्री झोपताना वापरणे जास्त फायद्याचं आहे. 

9.मॉइश्चरायझर

मॉइश्चरायझर हा त्वचेच्या दैनंदिन निगेचा एक अत्यावश्यक भाग आहे, जो त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतो आणि त्वचेला मऊ ठेवतो.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: भारतीय हवामानासाठी जेल-बेस्ड किंवा हलका मॉइश्चरायझर योग्य ठरतो. विशेषतः उष्ण प्रदेशात हे जास्त उपयुक्त आहे.

10.सनस्क्रीन

कोरियन स्किनकेअरमध्ये शेवटचा टप्पा म्हणजे सनस्क्रीन. सूर्याच्या अतीनील किरणांपासून बचावासाठी आणि त्वचेचे संरक्षण करण्यासाठी हे अत्यावश्यक आहे.

  • भारतीय त्वचेसाठी उपयुक्तता: भारतातील उष्ण हवामानात सनस्क्रीन अत्यावश्यक आहे. SPF30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन वापरणे चांगले आहे.

 

तर तब्बल 10 स्टेप्स ची ही कोरीअन ग्लास स्किनची गाथा किती जणांची सुफळ संपूर्ण होते हा संशोधनाचा विषय आहे. पण त्यापूर्वी हे लक्षात असू दे की, हयात एक  गोष्ट अशी आहे जी विकत आणता येणार नाही. ती म्हणजे सातत्य आणि संयम. कारण त्याशिवाय हे प्रॉडक्ट ड्रेसिंग टेबलवर धूळ खात पडतील आणि एक्सपायर होतील. जर का तुम्ही ‘मिनीमलीस्ट’ असाल किंवा “हे एवढे कोण करणार?” असं वाटत असेल तर एवढंच समजून घ्या की, ह्यातल्या काही  नेमक्या स्टेप्सही आपण फॉलो करू शकतो. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Agriculture insiders : ‘ओळख कृषी-निविष्ठा उद्योगांची’ या लेखमालिकेतील कृषी रसायन (Agrochemicals) उद्योगांवरील लेखांतर्गत या चौथ्या भागामध्ये भारतातील कीटकनाशक उद्योगांचे SWOT
आजही जिथे शाळेची गुणवत्ता प्रश्नचिन्हांकित आहे, डिजिटल माध्यमांचा वापर कमी आहे. बसची सुविधा नाही की प्रेरणादायी आदर्शांची कमतरता आहे, अशा
Diabetes : डायबिटीज म्हणजे रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर) नेहमीपेक्षा जास्त असणे. ही वाढलेली साखर शरीरात इतर अवयवांवर अनेक दुष्परिणाम

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ