14 व्या अधिवेशनातील एकूण प्रश्न : 5,921
यवतमाळ जिल्ह्याची एकूण प्रश्नसंख्या: 167
यवतमाळ जिल्ह्याशी संबंधीत प्रस्नसंख्या : 88
यवतमाळ जिल्ह्यातून तेराव्या विधानसभेत आरोग्य विषयावर एकही प्रश्न विचारण्यात आला नव्हता. पण या विधानसभेतला कोविड काळ लक्षात घेता आरोग्य विषयावर 9 प्रश्न सभागृहात उपस्थित केले होते. सर्वाधिक (54) प्रश्न हे राळेगाव मतदारसंघांचे भाजपा आमदार अशोक उइके यांनी मांडले आहेत.
या जिल्ह्यातून गेल्या दोन वर्षात एक हजार मुली बेपत्ता झाल्या संदर्भातला प्रश्न सभागृहात प्रामुख्यांने उपस्थित केला गेला. त्यासोबतच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणे, जिल्ह्यातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मिळण्याबाबत आणि विद्यार्थ्यांमध्ये इ-सिगारेटच्या वाढत्या व्यसना संदर्भात प्रश्न उपस्थित केले होते.
जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे आमदार, त्यांचे पक्ष, मतदारसंघ आणि त्यांची प्रश्नसंख्या
| क्र. | आमदाराचे नाव | पक्ष | मतदारसंघ | प्रश्नसंख्या |
| 1 | मदन येरावार | भाजप | यवतमाळ | 23 |
| 2 | नामदेव ससाणे | भाजप | उमरखेड | 48 |
| 3 | प्रा. अशोक उईके | भाजप | राळेगाव | 54 |
| 4 | संदीप धुर्वे | भाजप | आर्णी | 35 |
| 5 | इंद्रनील नाईक | राष्ट्रवादी कॉंग्रेस. जुलै 2023 पासून अजित पवार गट | पुसद | 25 |
| 6 | संजय राठोड, मंत्री | शिवसेना. जून 2022 पासून शिंदे गट | दिग्रस | 0 |
| 7 | संजीवरेड्डी बोदकुरवार | भाजप | वणी | 16 |
(टीप – काही प्रश्न एकापेक्षा अधिक आमदार उपस्थित करतात. त्यामुळे, आमदारांची प्रश्नसंख्या जिल्ह्याच्या प्रश्नसंख्येपेक्षा जास्त भरते.)
14 व्या विधानसभेत यवतमाळ जिल्ह्याशी संबंधित उपस्थित केलेल्या प्रश्नांमधील काही प्रमुख प्रश्न –
- पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत रोजगार हमी योजनेच्या कामात झालेला गैरव्यवहार
- यवतमाळ तालुक्यातील मौजा मोहा येथील भूदान जमिनीची अवैधरीत्या विक्री
- जिल्हयातील नदीपात्रातून अवैधरित्या रेती उत्खनन
- उमरखेड-तिवडी-टाकळी राजापूर या रस्त्यांची दुरवस्था
- नेर तालुक्यात सर्व्हर डाऊन व नेटवर्क नसल्यामुळे लाभार्थी स्वस्त धान्य योजनेपासून वंचित राहिले आहेत इत्यादी प्रश्न सभागृहात प्रामुख्यांने उपस्थित केले.



