गोवर्धन पूजा : अंगांवरुन गायींना चालवण्याची उज्जैनमधली अनोखी परंपरा

Gowardhan Puja : उत्तर भारतात लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गाई-वासरांची पूजा केली जाते. या सणाला गोवर्धन पूजा असं म्हणतात.
[gspeech type=button]

महाराष्ट्रामध्ये वसुबारसपासून दिवाळी सणाला सुरुवात होते. या दिवशी गोमातेची तिच्या वासरांची पूजा करतात. उत्तर भारतात मात्र, लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी गाई-वासरांची पूजा केली जाते. या सणाला गोवर्धन पूजा असं म्हणतात. कार्तिक महिन्यात बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.

उज्जैनमधली अनोखी परंपरा

गोवर्धन पूजेच्या दिवशी मध्यप्रदेश इथल्या उज्जैन जिल्ह्यातल्या भिडावद गावामध्ये अनोखी परंपरा जोपासली जाते. या गावात गोवर्धन पूजेच्या दिवशी सर्व भक्त हे जमिनीवर पालथे झोपून राहतात आणि त्यांच्या अंगावरुन गाई चालत जातात. अंगावरून गायी चालत गेल्याने गोमातेच्या आशिर्वादासह आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असा विश्वास स्थानिकांमध्ये आहे.

या पूजेसाठी भक्तगण पाच दिवसापासून उपवास करतात. दररोज रात्री मंदिरात भजन-किर्तन गायली जातात. त्यानंतर बलिप्रतिपदेच्या दिवशी पहाटे गायींची विधीवत पूजा केली जाते. गायींची पूजा झाल्यावर मुख्य दारापाशी सर्व भक्तगण पालथे झोपून राहतात. त्यांच्या अंगावरुन गायींना चालवलं जातं. तर दुसरीकडे ढोल-ताशांच्या आवाजासह मंत्रांचं पठण केलं जातं.

का करतात गोवर्धन पूजा?

अशी आख्यायिका आहे की, इंद्रदेवाने रागावून मथुरेमध्ये मुसळधार पाऊस पाडला. तेव्हा श्रीकृष्णाने गोकुळातील सर्व लोकांचं आणि गायींचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण गोवर्धन पर्वत हा आपल्या एका हाताच्या करंगळीवर उचलून धरला. गोवर्धन पर्वताच्या खाली सर्वांनी आश्रय घेतला. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाची हानी झाली नाही. सगळे लोक आणि गायी सुरक्षित राहिल्या. या प्रसंगातून इंद्रदेवाला श्रीकृष्णाच्या अगम्य शक्तीची जाणीव होते. त्यांना आपल्या कृतीचं वाईट वाटल्याने त्यांनी श्रीकृष्णाकडे क्षमा मागितली. या प्रसंगाचं स्मरण म्हणून दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते.

सोबतच भगवान श्रीकृष्ण, गायीचीही पूजा केली जाते. यानिमित्त घराच्या अंगणात पारंपारिक पद्धतीने गाईच्या शेणाने गोवर्धन पर्वताची प्रतिकृती काढली जाते व पूजा केली जाते.

अन्नकूट सण

गोवर्धन पूजेला अन्नकूट सण म्हणूनही संबोधलं जातं. यावेळी भगवान श्रीकृष्णाला पंचपक्वानाचा नैवेद्य दाखवला जातो. यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या, दूध आणि माव्याची मिठाई, भाताचे वेगवेगळे प्रकार आणि फळांचा समावेश असतो. या सर्व नैवेद्यापासून एक पर्वतासारखी प्रतिकृती तयार करुन ती श्रीकृष्णाना अर्पण केली जाते. त्यानंतर हे पदार्थ प्रसाद म्हणून शेजाऱ्यांना वाटतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ