आत्मनिर्भर भारताच्या यशाची दिवाळी

Atmanirbhara India : अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपल्या देशात गुंतवणूक करुन पक्क्या मालाचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. संरक्षण क्षेत्रातही भारताने आत्मनिर्भरतेचा ध्यास धरला आहे. आणि याही क्षेत्रात आपल्याला यश मिळत आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आपले पाय घट्ट रोवत असून इतर देशांनाही आता भारत आवश्यक ती मदत करत आहे.
[gspeech type=button]

भारताचा शाश्वत विकास साधताना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी होणं गरजेचं आहे. या उद्देशापोटी आत्मनिर्भर भारत ही योजना केंद्र सरकारकडून राबवण्यास सुरुवात झाली. यानुसार अनेक क्षेत्रामध्ये कच्च्या मालापासून पक्का माल बनवण्याची प्रक्रिया देशातच पूर्ण होऊ लागली.

अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही आपल्या देशात गुंतवणूक करुन पक्क्या मालाचं उत्पादन करण्यास सुरुवात केली. संरक्षण क्षेत्रातही भारताने आत्मनिर्भरतेचा ध्यास धरला आहे. आणि याही क्षेत्रात आपल्याला यश मिळत आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत आपले पाय घट्ट रोवत असून इतर देशांनाही आता भारत आवश्यक ती मदत करत आहे.

टाटा एअर-बस एअरक्राफ्ट (Tata-Airbus aircraft)

सोमवार दिनांक, 28 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांनी वडोदरा येथील टाटा एअर-बस एअरक्राफ्ट प्रकल्पाचा शुभारंभ केला. लष्करी सामानाची वाहतूक करणाऱ्या एअरक्राफ्टची निर्मिती करणारा हा देशातला पहिला प्रकल्प आहे.

यापूर्वी संरक्षण क्षेत्राशी संबंधीत अनेक गोष्टी वा साहित्य या परदेशातून आयात केल्या जायच्या. मात्र, आता महत्त्वपूर्ण शस्त्रांस्त्राची निर्मिती, लष्करी साहित्य हे पूर्ण भारतीय बनावटीचेच असेल यावर भर दिला जात आहे. त्या अनुषगांने वडोदरा येथे टाटा ग्रुपच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेला प्रकल्प अतिशय महत्वाचा ठरत आहे.

लष्करी सामानाची वाहतूक करण्यासाठी, यापूर्वी Avro – 748 या एअरबस वापरात होत्या. मात्र, 2021 साली, अद्ययावत अशा C – 295 या एअरबससाठी स्पेनमधील दोन कंपन्यांशी 21, 935 कोटी रुपयांचा करार केला. या अंतर्गत एकूण 51 एअरबसची निर्मिती केली जाणार आहे. मात्र, यापैकी केवळ 16 एअरबस या स्पेनकडून मिळणार आहेत. तर उर्वरित 40 एअरबसची पूर्ण निर्मिती ही टाटा एअर-बस प्रकल्पामध्ये केली जाणार आहे. त्यामुळे या 40 एअरबस या खऱ्या अर्थाने भारतीय बनावटीचे असतील.

वज्र गन: अँटी-ड्रोन गन

बदलत्या तंत्रज्ञानानुसार संरक्षण क्षेत्रातल्या शस्त्रामध्येही नाविन्यपूर्ण बदल घडत आहेत. अलीकडे युद्धजन्य स्थितीत शत्रूंवर हल्ला करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. हे ध्यानात घेऊन चेन्नईतल्या बिग बँग बूम सोल्युशन्स ने अँटी-ड्रोन बंदूकीची निर्मिती केली आहे. या बंदुकीला ‘वज्र शॉट’ असं नाव देण्यात आलं आहे.

या बंदुकीच्या मदतीने शत्रूपक्षांच्या ड्रोन सिग्नलला पकडून त्याला निकामी करता येऊ शकते. आणि ड्रोन व ड्रोन हाताळणाऱ्या ऑपरेटरमध्ये व्यत्यय आणू शकते. या बंदुकीची रेंज ही चार किमी असून याचं वजन फक्त साडेतीन किलो आहे.

दिनांक 28 ऑक्टोबर रोजी, भारतीय नौदलाच्या नेव्हल इनोव्हेशन ॲण्ड इंडिजनायझेशन ऑर्गनायझेशन (एनआयआयओ) सेमिनार ‘स्वावलंबन 2024’ मध्ये ही बंदूक प्रदर्शित करण्यात आली होती.

संरक्षण शस्त्रास्त्रांच्या आयातीकडून – निर्यातीकडे भारताची वाटचाल

आर्मेनिया देशाने आता भारताकडून शस्त्र खरेदी करायला सुरुवात केली आहे. केंद्रीय वित्त खात्याच्या अहवालानुसार 2023- 24 सालामध्ये, आर्मेनिया देशासोबत 21,083 कोटीचा
व्यवहार झाला आहे. यापूर्वी होत असलेल्या व्यवहारांच्या तुलनेत 32.5 टक्के वाढ ही गेल्या वर्षभरात झाली आहे.

आज भारताकडून आर्मेनियामध्ये क्षेपणास्त्रे प्रणाली (Missiles Systems), पाळत ठेवणारी एअरक्राफ्ट (Surveillance Aircraft), रॉकेट लॉन्चर्स अशी शस्त्रास्त्रे निर्यात केली जातात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ