डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान

President Donald Trump : अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. 78 वर्षाचे ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष असतील. आणि राष्ट्राध्यक्ष पदाची त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीनं तीन वेळा निवडणूक लढवून दोनदा विजयाची माळ गळ्यात घातली आहे.
[gspeech type=button]

अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. 78 वर्षाचे ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्रध्यक्ष असतील. आणि राष्ट्राध्यक्ष पदाची त्यांची ही दुसरी टर्म असणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीनं तीन वेळा निवडणूक लढवून दोनदा विजयाची माळ गळ्यात घातली आहे.

अमेरिकन माध्यमांच्या बातम्यांनुसार, एकूण 24 राज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प हे जिंकलेले आहेत. यामध्ये टेक्सास, ओहयो या दोन मोठ्या राज्यांचा सुद्धा समावेश आहे. यासह जॉर्जिया, नॉर्थ कॅरोलिन यारख्या निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या राज्यातही ट्रम्प यांचाच विजय झालेला आहे.

कमला हॅरिस या कॅलिफॉर्निया, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन अशा एकूण 15 राज्यातून आघाडीवर होत्या.

ट्रम्प यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ

दरम्यान, या निवडणुकीत ट्रम्प यांनी राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली राज्ये तर काबीज केली आहेत. पण 2020 च्या तुलनेत त्यांना यावर्षी अधिक मतं मिळाल्याचं पाहायला मिळतं. 2020 च्या तुलनेत ट्रम्प यांना जवळपास 92 टक्के अधिक मतं मिळाली आहेत. फ्लोरीडामध्ये त्यांच्या मताच्या टक्केवारीत सर्वाधिक वाढ झाली आहे. तसंच डेमोक्रेटिक पक्षाचं वर्चस्व असलेले ब्लू सबर्ब्स, नॉर्थ वर्जिनिया, लाउडॉन आणि प्रिन्स विल्यम काउंटी या प्रांतातही ट्रम्प यांना चांगली मतं मिळाली आहे.

ट्रम्प यांचे विजयानंतरचं पहिलं भाषण

ट्रम्प यांनी फ्लोरिडामध्ये विजयानंतरच पहिलं भाषण केलं. यावेळी त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले. आणि अमेरिकेला पुन्हा एकदा सर्वात श्रेष्ठ राष्ट्र बनविण्याचा संकल्प जाहीर केला. ते म्हणाले की, मी तुमच्यासाठी तुमच्या भवितव्यासाठी लढत राहीन. जोपर्यंत माझ्या शरीरात श्वास आहे, तोपर्यंत मी लढत राहीन. सामर्थ्यशाली, सुरक्षित आणि वैभवशाली अमेरिका घडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. पुढील चार वर्ष हा अमेरिकेचा सुवर्णकाळ असणार आहे. अमेरिकन नागरिकांसाठी हा मोठा विजय आहे.

हे यश आपल्या सगळ्यांना एकत्र आणणार आहे. आपल्याला सर्व समस्या सोडवायच्या आहेत. मी तुमचा अपेक्षाभंग करणार नाही. अमेरिकेचं भविष्य आणखी उज्ज्वल, आणखी चांगलं आणि आणखी सामर्थ्यशाली असेल.

या भाषणामध्ये त्यांनी एलॉन मस्क यांचं सुद्धा विशेष कौतुक करत आभार मानले.

शुभेच्छांचा वर्षाव

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह जगातल्या अनेक नेत्यांनी, राष्ट्रप्रमुखांनी ट्रम्प यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत की, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीमध्ये विजय मिळविणारे माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन. भारत – अमेरिका राष्ट्रामध्ये मैत्रिपूर्ण संबंध जपताना, जागतिक पातळीवरील व्यापार आणि धोरणात्मक संबंधही मजबूत व्हावे यासाठी एकत्र काम करण्यासाठी उत्सुक आहे.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला
Denmark Book Tax Free : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ