सुमा शिरूर यांना ‘कोच ऑफ द इयर’ पुरस्कार

Suma Shirur : सुमा शिरूर यांना इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2024 मध्ये ‘वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक’ हा बहुमान मिळाला आहे. भारतीय शूटिंग संघाला यश मिळवून देणे आणि क्रीडा क्षेत्रात लिंग समानता आणण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.
[gspeech type=button]

सुमा शिरूर यांना इंडियन स्पोर्ट्स ऑनर्स 2024 मध्ये ‘वर्षातील सर्वोत्तम महिला प्रशिक्षक’ हा बहुमान मिळाला आहे. भारतीय शूटिंग संघाला यश मिळवून देणे आणि क्रीडा क्षेत्रात लिंग समानता आणण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

सुमा शिरूर या एक प्रसिद्ध नेमबाज असून, ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय नेमबाजांनी तीन ऑलिम्पिक पदके जिंकली आहेत. यामध्ये अवनी लेखरा हिने महिला 10 मीटर इव्हेंटमध्ये पैरालिंपिक्समध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.

कोच ऑफ द इयर पुरस्कार स्वीकारताना सुमा यांनी सांगितलं की, हा सन्मान फक्त त्यांचा एकटीचा नसून त्यांच्या सोबत काम करणाऱ्या प्रत्येक खेळाडू आणि संघातील सदस्यांचा आहे. क्रीडा संस्कृतीला चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

सुमा शिरूर यांनी नेमबाजी सोबतच ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठीही काम केलं आहे. त्यांच्या “लक्ष्य शूटिंग” क्लबद्वारे त्यांनी 200 हून अधिक राष्ट्रीय स्तरावरील नेमबाजांना प्रशिक्षित केलं आहे. त्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या लिंग समानता समितीच्या सदस्यही आहेत.

सुरुवातीच्या काळात नेमबाजी क्षेत्र हे पुरुषप्रधान होते. या क्षेत्रात महिलांचा सहभाग नव्हता. पण, सुमा शिरूर यांनी जिद्द आणि मेहनतीने या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

सुमा यांनी 2002 आणि 2006 मधील राष्ट्रकूल आणि आशियाई खेळांमध्ये अनेक पदके जिंकली आहेत. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरी गाठून त्यांनी आपली छाप पाडली. एका मुलाखती मध्ये बोलताना त्यांनी सांगितलं की, 2016 मध्ये आंतरराष्ट्रीय शूटिंग फेडरेशनने नेमबाजांसाठी 60 शॉट्सचा नियम केला आणि मिश्र सांघिक स्पर्धा सुरू केल्या होत्या. 2024 मध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुष आणि महिलांना समान संधी देण्यात आली, ही मोठी प्रगती आहे. सुमा शिरूर यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे भारतीय नेमबाजीला नवी ओळख मिळाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ