एलन मस्क यांच्या SpaceX ने करणार भारतीय उपग्रह GSAT-N2 चे प्रक्षेपण

GSAT-N2 : एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीने भारताचा GSAT-N2 कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला सांगितले की, स्पेसएक्सचे फॅलकॉन-9 रॉकेट इस्रोच्या GSAT-20 उपग्रहाचे प्रक्षेपण करेल, ज्याला 'GSAT-N2' म्हणूनही ओळखले जाते.
[gspeech type=button]

एलन मस्क यांच्या SpaceX कंपनीने भारताचा GSAT-N2 कम्युनिकेशन उपग्रह प्रक्षेपित केला आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला सांगितले की, स्पेसएक्सचे फॅलकॉन-9 रॉकेट इस्रोच्या GSAT-20 उपग्रहाचे प्रक्षेपण करेल, ज्याला ‘GSAT-N2’ म्हणूनही ओळखले जाते. हा उपग्रह 4700 किलो वजनाचा आहे आणि भारतभर हाय-स्पीड ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल व्हिडीओ व ऑडिओ ट्रान्समिशन सेवा सुलभ करणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे.

काय आहे GSAT-N2

GSAT-N2 हा एक Ka-बॅंड कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) ने विकसित केला आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ 14 वर्षांचा आहे. या उपग्रहामुळे संपूर्ण भारत, अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर हाय-स्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. या उपग्रहाच्या 32 बीममुळे हे कार्य सुलभ होईल. याचा 80% कार्यक्षेत्र हे खाजगी कंपन्यांना दिले आहे, तर इतर उरलेले 20% विमान वाहतूक आणि सागरी क्षेत्रासाठी वापरले जाईल.

इस्रोने ‘स्पेसएक्स’ची मदत का घेतली?

GSAT-N2 हा उपग्रह खूप जड होता, त्यामुळे इस्रोच्या LVM3 रॉकेटला त्याचे वजन उचलता येत नव्हते. LVM3 रॉकेट फक्त 4 टन वजन उचलू शकतो, तर स्पेसएक्सच्या फॅलकॉन-9 रॉकेटला 8 टन वजन GTO मध्ये ठेवता येते. यामुळे, स्पेसएक्सचा फॅलकॉन-9 रॉकेट या प्रक्षेपणासाठी सर्वोत्तम पर्याय ठरला. स्पेसएक्ससह केलेले हे NSIL चे पहिले प्रक्षेपण आहे, यासाठी 500 कोटी रुपये खर्च आला आहे.

इस्रो सध्या आपल्या नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल (NGLV) वर काम करत आहे. यामुळे इस्रोला 4 टनांपेक्षा जास्त वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्यात मदत होईल. NGLV च्या माध्यमातून इस्रो LEO मध्ये 30 टन आणि GTO मध्ये 10 टन वजन उचलू शकेल. हा रॉकेट LVM3 पेक्षा तिप्पट ताकदीचा असेल. स्पेसएक्सच्या फॅलकॉन-9 रॉकेटच्या मदतीने भारतीय अंतराळ मोहिमेला एक मोठे यश मिळालं आहे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Women's employment rate : कामगार मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार, गेल्या सात वर्षांत भारतातील महिलांच्या रोजगार दरात मोठी वाढ झाली आहे.
CIBIL score : संसदेच्या 2025 पावसाळी अधिवेशनादरम्यान, अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे की, बँका फक्त CIBIL स्कोअर
Indian Railway : तुम्ही जर रेल्वेने प्रवास करणार असाल, तर आता तुमचं सामान किती आहे, हे तपासणं गरजेचं आहे. कारण,

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ