हरिनी अमरसुर्या : दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी श्रीलंकेची प्रधानमंत्री  

Harini Amarasuriya : श्रीलंका राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी हरिनी अमरसूर्या यांना प्रधानमंत्री पदावर नेमलं आहे. श्रीलंकेच्या प्रधानमंत्री पद सांभाळणाऱ्या हरिनी अमरसुर्या या तिसऱ्या महिला प्रधानमंत्री असून त्या दिल्ली विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
[gspeech type=button]

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी नुकताच आपल्या मंत्रिमंडळाला शपथ देत कार्यभार हाती घेतला आहे. या त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी हरिनी अमरसूर्या यांना प्रधानमंत्री पदावर नेमलं आहे. हरिनी या श्रीलंकेच्या तिसऱ्या महिला प्रधानमंत्री आहेत. 

श्रीलंकेच्या या तिसऱ्या महिल्या प्रधानमंत्रीचं भारतासोबत खास नातं आहे. 

भारतातून पूर्ण केलं शिक्षण

हरिनी आमरसुर्या यांनी भारतातील प्रसिद्धी दिल्ली विद्यापीठातून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. सन 1988 – 1989 मध्ये श्रीलंकेमध्ये तामिळ आंदोलनाने जोर धरल्यावर तेथील सर्व व्यवहार ठप्प झाले होते. शाळा-कॉलेजही अनेक वेळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवली जायची. अशा परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्यासाठी हरिनी भारतात आली. तिने दिल्ली विद्यापीठातून 1991 ते 1994 या तीन वर्षाच्या कालावधीत समाजशास्त्र विषयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. या वेळेस सिनेमा दिग्दर्शक इम्तियाज अली आणि प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी हे तिचे सहकारी विद्यार्थी होते. 

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर हरिनी यांनी एडिनबर्ग विश्वविद्यालयामधुन सामाजिक मानविकी विषयात पीएचडी पूर्ण केली. पीएचडीचं शिक्षण पूर्ण करताना हरिनीने श्रीलंकेमधल्या अनेक कॉलेजमधून अध्यापनाचं सुद्धा काम केलं. 

राजकारणात प्रवेश

हरिनी यांनी पीएचडी पूर्ण केल्यावर 2011 मध्ये श्रीलंकेमध्ये कायमची परत येऊन प्राध्यापक म्हणून काम करु लागली. त्यानंतर 2019 मध्ये तिने JVP पक्षात प्रवेश करत राजकिय प्रवासाला सुरुवात केली. 2020 मध्ये ती सांसद म्हणून निवडून आली. त्यानंतर यंदा दिसनायके याचं सरकार आल्यावर सप्टेंबर 2024 मध्ये तिच्यावर अंतरिम प्रधानमंत्री म्हणून जबाबदारी दिली. नोव्हेंबर महिन्यात दिसनायके यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ स्थापन करताना हरिनी यांना त्यामध्ये सामिल करत त्यांच्यावर सर्वातमोठी प्रधानमंत्री पदाची जबाबदारी  दिली. यासोबतच हरिनी यांच्याकडे शालेय शिक्षण, उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षणाची ही जबाबदारी दिली आहे. 

हिंदू कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचा सार्थ अभिमान

‘दिल्ली विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या हिंदू कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केलेली आपली विद्यार्थिनी आज श्रीलंकेची प्रधानमंत्री पद सांभाळत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे’ अशी प्रतिक्रिया या कॉलेजच्या प्रिन्सिपल अंजू श्रीवास्तव यांनी दिली आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ