भारताच्या आदित्य-L1 मिशनद्वारे सौर वादळांविषयी महत्त्वाची माहिती समोर

Aditya L1: आदित्य-L1 च्या माध्यमातून सौर वादळांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सौर वादळे म्हणजे Coronal Mass Ejection (CME).
[gspeech type=button]

आदित्य-L1 च्या माध्यमातून सौर वादळांविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सौर वादळे म्हणजे Coronal Mass Ejection (CME). सूर्याच्या पृष्ठभागावरून बाहेर पडणारे प्रचंड ऊर्जा असणारे हे आगीचे गोळे असतात. हे गोळे पृथ्वीच्या वातावरणावर सातत्याने प्रभाव टाकत असून, पृथ्वीच्या बाह्य कक्षात असलेल्या उपग्रहांवर तसेच पृथ्वीवरील तंत्रज्ञानावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो.

सध्या पृथ्वीच्या बाह्य कक्षात सुमारे 7,800 उपग्रह आहेत, त्यापैकी 50 उपग्रह भारताचे आहेत. सौर वादळांचा या उपग्रहांवर प्रभाव पडू शकतो, आणि यामुळे इंटरनेट कनेक्शन, संदेशवहन प्रणाली, तसेच इतर तंत्रज्ञानावर परिणाम होऊ शकतो.

आदित्य-L1 मिशन हे भारताचे सूर्याशी संबंधित पहिले मोठे अंतराळ मिशन आहे. यामध्ये सूर्याच्या बाह्य वातावरणाचे निरीक्षण करण्यासाठी 7 अत्याधुनिक उपकरणांचा समावेश आहे.

प्रोफेसर आर. रमेश यांनी VELC डिव्हाइसची रचना केली आहे. त्यांनी सांगितले की, CME म्हणजे सूर्यापासून बाहेर पडणारे प्रचंड ऊर्जा आणि पदार्थाचे गोळे असतात. त्यांचे वजन ट्रिलियन किलोग्रॅमपर्यंत असू शकते. त्यांचा वेग 3,000 किलोमीटर प्रति सेकंद पर्यंत पोहोचू शकतो. या वादळांचा प्रभाव पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी फक्त 15 तासांचा कालावधी लागेल. आणि ते पृथ्वीच्या वातावरणावर गंभीर परिणाम करू शकतात. विशेषत: जर हे वादळ पृथ्वीच्या दिशेने आले तर त्याचा प्रभाव पृथ्वीच्या बाह्य कक्षावर तसेच उपग्रहांवर होऊ शकतो. यामुळे तंत्रज्ञानाच्या कार्यप्रणालीत अडचणी येऊ शकतात.

आदित्य-L1 मिशनचे उद्दिष्ट

आदित्य-L1 मिशनचे मुख्य उद्दिष्ट सूर्याच्या बाह्य वातावरणाचे निरीक्षण करणे आणि सूर्य-पृथ्वी प्रणालीतील अंतराळ हवामानाबद्दल अधिक माहिती मिळवणे आहे. यामध्ये सूर्याच्या कोरोनल मास इजेक्शनचे निरीक्षण करणे आणि त्याची अचूक पूर्वसूचना मिळवुन पृथ्वीवरील तंत्रज्ञानाची सुरक्षा वाढवणे.

VELC उपकरण सूर्याच्या बाह्य वातावरणाच्या निरीक्षणासाठी अत्याधुनिक पदधतीने डिझाईन केले आहे. आपल्याला सूर्य एक मोठा नारिंगी गोळा दिसतो. मात्र VELC यंत्र सूर्याच्या तेजस्वी थराची चकाक कमी करून सूर्याच्या बाह्य वातावरणाचे अधिक स्पष्ट चित्र प्राप्त करते.

भारताच्या आदित्य-L1 मिशनने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल टाकले आहे. यामुळे सौर वादळांच्या अचूक पूर्वसूचनेची क्षमता वाढेल.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Internationalisation of Rupee : आंतरराष्ट्रीय पातळीवर रुपयाचं स्थान मजबूत व्हावं यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारताच्या शेजारील राष्ट्रांसोबत रुपयामधून व्यवहार
आज दिनांक 1 ऑक्टोबरपासून युपीआय, रेल्वे प्रवास आणि आधार अपडेटशी संबंधित काही नव्या नियमांच्या अंमलबजावणीला सुरूवात होणार आहे. हे बदल
NASA Women lead : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था NASA ने नुकतीच त्यांच्या नव्या अंतराळवीर तुकडीची म्हणजेच 'एस्ट्रोनॉट क्लास' ची घोषणा

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ