20 जानेवारीपर्यंत ओलीसांची सुटका न केल्यास युद्धाला सामोरं जावं लागेल ; डोनाल्ड ट्रम्प यांनी हामासला दिली थेट धमकी.

Donald Trump: अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी हमासविरुद्ध मोठं विधान केलं आहे. गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेबाबत त्यांनी हमासला थेट इशारा दिला आहे.
[gspeech type=button]

अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी सोमवारी हमासविरुद्ध मोठं विधान केलं आहे. गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या लोकांच्या सुटकेबाबत त्यांनी हमासला थेट इशारा दिला आहे.

त्यामुळे मध्य-पूर्वेतील स्थिती अधिक तणावपूर्ण झाली आहे. ट्रम्प यांनी गाझा पट्टीतील ओलीसांची सुटका करण्याची हमासला धमकी दिली आहे. ट्रम्प म्हणाले, “जर 20 जानेवारी 2025 पर्यंत गाझा पट्टीत ओलीस ठेवलेल्या इस्रायलच्या नागरिकांची सुटका केली नाही, तर अमेरिका संपूर्ण मध्य-पूर्वेत विध्वंस करेल.”

ट्रम्प यांच्या या इशाऱ्यानंतर अमेरिकेची मध्य-पूर्वेतील भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे. यापूर्वीच ट्रम्प यांनी इस्रायलला बाहेरून पाठिंबा दिला आहे, आता त्यांनी थेट मैदानात उतरून धमकी दिली आहे. या धमकीमुळे तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात आहे.

धमकीचा तपशील

“गाझा पट्टीतील ओलीसांना 20 जानेवारी 2025 च्या शपथविधीपूर्वी सोडा. नाहीतर, आम्ही संपूर्ण मध्य-पूर्वेत विध्वंस करू. ज्यांनी मानवतेविरूद्ध हा गुन्हा केला आहे, त्यांना अमेरिका कठोर शिक्षा देईल” असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे युद्ध पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हमासचे हल्ले आणि मागणी

गेल्या वर्षी, हमासने इस्त्रायलच्या सीमावर्ती भागात हल्ला करून अनेक नागरिकांचा जीव घेतला आणि काहींना ओलीस ठेवले. या हल्ल्यात इस्रायलच्या 1200 नागरिकांचा मृत्यू झाला होता. इस्रायलने हल्ल्याला प्रत्युत्तर देत युद्ध सुरू केले. परंतु अजूनही अनेक नागरिक हमासच्या ताब्यात आहेत. गाझा पट्टीतून इस्रायलच्या सैन्याची माघार घेतल्याशिवाय बंधकांची सुटका होणार नाही, अशी मागणी हमासने केली आहे.

इस्रायलचे प्रत्युत्तर

ट्रम्प यांच्या विधानानंतर, इस्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांनी ट्रम्प यांचे आभार मानले आणि आशा व्यक्त केली की, गाझा पट्टीतील ओलीस लवकरच घरी परततील. इस्रायलच्या अधिकाऱ्यांच्या मते, 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने हल्ला केल्यानंतर 250 हून अधिक लोक बंधक बनवले होते, त्यापैकी सुमारे 100 लोक अजूनही तिथं बंदिवासात आहेत ,ज्यात काहींचा मृत्यू झाला आहे. गाझा पट्टीतील ही परिस्थिती अधिक तणावपूर्ण होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ