अफगाणिस्तानमधील आरोग्यसेवेतून महिला ‘हद्दपार’

Afghanistan : महिलांचे जगणं कसं असह्य करता येईल' याकरता तालीबानी शासक रोज काही तरी भर टाकत असतात. सार्वजनिक ठिकाणी सोबत घरातल्या पुरुषाशिवाय फिरु नये, मुलींना उच्च शिक्षण घेण्यावर बंदी हे आहेच. त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातही मुलींनी पाऊल ठेवू नये, असा नविन फतवा काढला आहे.
[gspeech type=button]

‘अफगाणिस्तान म्हणजे महिलांसाठी भूतलावरचा नरक’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘महिलांचे जगणं कसं असह्य करता येईल’ याकरता तालीबानी शासक रोज काही तरी भर टाकत असतात. सार्वजनिक ठिकाणी सोबत घरातल्या पुरुषाशिवाय फिरु नये, मुलींना उच्च शिक्षण घेण्यावर बंदी हे आहेच. नोकरी करणं, सार्वजनिक ठिकाणी आणि घरातही मोठ्या आवाजात बोलणं आणि प्रार्थना करणं हेही निषिध्द मानलं जात आहे. त्यानंतर आता वैद्यकीय क्षेत्रातही मुलींनी पाऊल ठेवू नये, असा नविन फतवा काढला आहे.

शिक्षणापासून मुलींना वंचित ठेवण्याचा फतवा जूना

तालिबानी सत्ता आल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये तालिबान्यांनी मुलींना उच्च शिक्षण घेण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे मुलींना बारावी पर्यंतचचं शिक्षण घेता येत होतं. या फतव्यामुळे जवळपास 1.1 दशलक्ष मुलीं शिक्षणापासून वंचित राहिल्या आहेत.

बारावीच्या पुढे मुलींना फक्त वैद्यकीय शिक्षण घेण्याची मुभा दिली. त्यासाठी तालिबानी सत्ताधाऱ्यांनी फेब्रुवारी 2024 मध्ये काही प्रांतामध्ये वैद्यकीय संस्था सुरु केल्या. कपिसा, परवाना, पंजशीर, मैदान वर्दक, गझनी, पक्तिकास, लोगर, खोस्ट आणि पक्तिया याठिकाणच्या काही संस्थांमधून महिलांना वैद्यकीय प्रशिक्षण, शिक्षण देण्यास सुरुवात केली. मात्र, मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी वैद्यकीय शिक्षणासाठीही मुलींना प्रवेश देण्याची बंदी घातली गेली आहे.

दरम्यान, या संदर्भातलं अधिकृत नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं नाहिये. तसचं या फतव्यामागचा तालिबानी सत्ताधाऱ्यांचा उ‌द्देशही अजून स्पष्ट झालेला नाहीये.

अफगाणिस्तानातील वैद्यकीय संस्था

सध्या अफगाणिस्तानामध्ये 10 सरकारी तर 150 खासगी वैदयकिय शिक्षण संस्था आहेत. या संस्थांमधून 18 विषयांमध्ये 2 वर्षाचा डिप्लोमा, पदवीचं शिक्षण दिलं जातं. यामध्ये अनेस्थेशिया, प्रसूतीतंत्र, फार्मसी, डेंटिस्ट अशा वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण दिलं जातं. जवळपास 35 हजार महिला वि‌द्यार्थीनी या क्षेत्रात शिकत होत्या. मात्र, तालिबान्यांच्या नव्या फतव्यामुळे या सगळ्या मुलीं या क्षेत्रातून बाहेर पडणार आहेत.

या नविन फतव्यामुळे, अनेक मुलींच्या स्वप्नांवर तर पाणी फिरलंच आहे सोबत या शैक्षणिक संस्थामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनींच प्रमाणही कमी होणार आहे. केवळ 10 टक्के पुरुष विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक संस्था कशा चालवणार हा प्रश्न ही या शैक्षणिक संस्थासमोर उभा राहिला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील महिलांच्या नोकऱ्याही गेल्या

या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिलांनाही पुढील सूचना मिळेपर्यंत कामासाठी येऊ नये, असा स्पष्ट मेसेज सर्व तरुणी, विद्यार्थीनी आणि महिला शिक्षिकांना पाठवण्यात आला आहे.

‘आमच्यासाठी हा मानसिक धक्का आहे.’ या एकमेव क्षेत्राकडून महिलांना काही अपेक्षा होत्या. काबुलमधल्या प्रसुतीतंत्र शिकवणाऱ्या शिक्षिकेने अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आरोग्य क्षेत्रात महिला डॉक्टरांची गरज

आधीच पुरेसे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. अशावेळी तालिबानी सताधाऱ्यांच्या या फतव्यामुळे आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर ताण पडणार आहे, असं मत आरोग्य मंत्रालयातील एका अधिकाऱ्यांने व्यक्त केलं आहे.

तालिबानी राजवटीमध्ये महिलांना यत्किचिंतही स्थान दिलं जात नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रामध्ये असे निर्बंध घालणं हे अतिशय धोक्याचं आहे. आज अफगाणिस्तानच्या एकूण लोकसंख्यंपैकी एक तृतीयांश जनता ही आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. अनेक रुग्णालयात विविध तज्ज्ञ, सर्जनची कमतरता असल्यामु‌ळे रुग्ण उपचाराविना आयुष्याशी झगडत आहेत. महिला रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेषतः प्रसुतीसाठी महिला डॉक्टर नसल्याने मृत्यूदर वाढला आहे, अनेक महिलांची प्रकृती ही ढासळत आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये 80 टक्के औषधांचा तुटवडा, आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांचा तुटवडा भासला होता. या सततच्या निबंधामुळे अनेक नामांकित डॉक्टरांनी परदेशात जाणं पसंत केलं आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे अनेक हॉस्पीटल्सही बंद झाली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ