मुंबई-पुणे हायपरलूप ट्रेनने फक्त 25 मिनिटांत!

भारतात लवकरच हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. Indian Railway First Hyperloop Train : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्रेनचा वेग ताशी 1200 किमी पर्यंत असू शकतो.
[gspeech type=button]

भारतात लवकरच हायपरलूप ट्रेन सुरु होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हायपरलूप ट्रॅकचा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला आहे. या ट्रेनचा वेग ताशी 1200 किमी पर्यंत असू शकतो. तमिळनाडूतील चेन्नईमध्ये 410 मीटर लांबीचा हायपरलूप चाचणी ट्रॅक पूर्ण झाला आहे. हा ट्रॅक रेल्वे आणि आयआयटी मद्रास यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

हायपरलूप ट्रेन प्रणाली भारतात वेगवान वाहतूक सेवा सुरू करणार आहे. 2019 मध्ये, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेतील व्हर्जिन हायपरलूप कंपनीच्या चाचणी केंद्राला भेट दिली होती. मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप ट्रेन प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.

प्रवासीसंख्या 24-28

भारताची पहिली हायपरलूप ट्रेन मुंबई आणि पुणे दरम्यान धावणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे हे अंतर केवळ 25 मिनिटांत पार होईल, या प्रवासाला सध्या रेल्वेने 3 ते 4 तास लागतात. हायपरलूप ट्रेनमध्ये 24 ते 28 प्रवासी बसू शकतात. या प्रकल्पाचे उद्दिष्ट प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी करणे आहे.

हायपरलूप तंत्रज्ञान

हायपरलूप ट्रेन एक हायस्पीड ट्रेन आहे. ही ट्रेन व्हॅक्यूम ट्यूबमधून धावते. चुंबकीय तंत्रज्ञानावर आधारित ही ट्रेन ताशी 1100 ते 1200 किमी वेगाने धावू शकते. पण भारतीय हायपरलूप ट्रेनचा अधिकतम वेग 600 किमी असणार आहे. हायपरलूप ट्रेन बुलेट ट्रेनपेक्षा अधिक वेगवान आहे आणि तिचे डिझाइन ताशी 1100 किमीपर्यंत धावण्यासाठी सक्षम आहे.

हायपरलूपची संकल्पना

हायपरलूपची संकल्पना एलॉन मस्क यांनी 2013 मध्ये मांडली होती. मस्क यांनी लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यान हायपरलूप ट्रेन सुरू करण्याचा विचार केला होता. 2013 मध्ये मस्क यांनी पुन्हा हायपरलूप तंत्रज्ञानावर चर्चा सुरू केली. यामुळे ‘हायपरलूप वन’ कंपनीची स्थापना झाली. मात्र, तांत्रिक अडचणी आणि खर्चामुळे ही कंपनी बंद पडली. तरीही, हायपरलूपची संकल्पना भारतासह जगभर लोकप्रिय होत आहे. नेदरलँडमधील हार्डट कंपनीने यशस्वी चाचणी घेतली. आणि मस्क यांच्या बोरिंग कंपनीनेही हायपरलूप तंत्रज्ञानावर संशोधन सुरू ठेवले आहे.

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

submarine deals : हिंदी महासागरात चीनची जहाजे आणि पाणबुड्या खूप जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत. याचा आपल्या देशाच्या सुरक्षिततेला धोका
1 September Rules Changes : 1 सप्टेंबरपासून आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. यामध्ये आयटीआर फाइलिंगच्या तारखेपासून आधारकार्डशी
Women in Supreme court : सर्वोच्च न्यायालयात सध्या सरन्यायाधीशांसह 34 न्यायाधीश आहेत. या संपूर्ण न्यायाधीश बेंचमध्ये न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना या

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ