Google ने सोमवारी 16 डिसेंबर, 2024 रोजी नुकतीच क्वांटम विलो नावाची नेक्स्ट जनरेशन चिप लाँच केली आहे. कॅलिफोर्नियामधील सांता बार्बरा येथील कंपनीच्या क्वांटम लॅबमध्ये विकसित केलेली ही नवीन चिप केवळ पाच मिनिटांत कठीण गणिताविषयी समस्या सोडविण्यास तुमची मदत करेल, जे सोडविण्यासाठी जगातील सर्वांत वेगवान सुपर कॉम्प्युटरला देखील करोडो वर्षे लागतील.
गुगलची विलो क्वांटम चिप म्हणजे काय?
गुगलची विलो चिप 105 क्यूबिट्सने बनवली आहे. क्यूबिट्स हे क्वांटम कॉम्प्युटिंगमध्ये वापरले जाणारे मुख्य घटक असतात. पारंपारिक बाईट्सपेक्षा क्यूबिट्स खूप वेगाने कामं करतात. पण, क्यूबिट्समधील सब-एटोमिक पार्टिकल्स त्यांची गती आणि हालचालींमुळे काही वेळा चुकीचे होतात. या त्रुटी वाढल्यास, चिपचे काम कमी होऊ शकते, विशेषतः जेव्हा चिपवर जास्त क्यूबिट्स असतात.
विलो चीप
एका अहवालानुसार, गुगलच्या क्वांटम कंप्युटरने पारंपरिक कंप्युटर्ससाठी अशक्य असलेली कामं करून दाखवली आहेत. कंपनीने आपल्या संशोधन अहवालात सांगितले की, गुगलच्या या क्वांटम उपकरणाने जी गणितीय मोजणी केवळ 3 मिनिट 20 सेकंदात पूर्ण केली, ती गणना एका सुपरकंप्युटरला 10,000 वर्षांनंतरही शक्य होणार नाही.
गुगलची ही नवीन चीप क्वांटम कॉम्प्युटिंग क्षेत्रात एक मोठी प्रगती मानली जात आहे. जी भौतिकशास्त्राच्या तत्वांचा वापर करुन शक्तीशाली कम्प्युटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.
गुगलने विकसित केलेली ही क्वांटम विलो चिप भविष्यात कॉम्प्युटरचा क्षमतेत अनेक चांगले बदल घडवू शकते. क्वांटम कम्प्युटर विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे गुगलकडून सांगण्यात आले.
जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटरलाही 10 सेप्टिलियन किंवा 10,000,000,000,000,000,000,000,000 वर्षे लागतील, अशा प्रश्नांची उत्तर ही चीप केवळ 5 मिनिटांत देणार आहे, असा गुगलकडून दावा करण्यात आला आहे.
जगातील मोठ मोठ्या समस्या सोडवण्यासाठी अधिक शक्तिशाली कम्प्युटर लागतील आणि यासाठी अनेक वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स खर्च येऊ शकतो. पण, ही चिप भविष्यात क्वांटम संगणकांची क्षमता पूर्णपणे बदलू शकते.
औषधांचा शोध, फ्यूजन ऊर्जा आणि बॅटरी डिझाइन यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रयोग करण्यासाठी एक उपयुक्त क्वांटम कम्प्युटर तयार करण्याच्या दिशेने गुगल विलोला एक महत्त्वाचे पाऊल मानते.
क्वांटम चिप ही एक विशेष प्रकारची कॉम्प्युटर चिप आहे, जी क्वांटम मेकॅनिक्सची तत्त्वे, अणूंसारख्या अत्यंत लहान कणांचे सायन्स जाणून घेण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
नियमित चिप्स माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी ‘बिट्स‘ (0 किंवा 1) वापरतात. तर क्वांटम चिप्स ‘क्विट्स‘ वापरतात. जे एकाच वेळी 0 किंवा 1 किंवा दोन्ही असू शकतात. ही अनोखी क्षमता क्वांटम चिप्सना पारंपारिक कम्प्युटरपेक्षा अधिक वेगाने काम करण्यास अनुमती देते.
क्वांटम कॉम्प्युटिंग हे क्वांटम फिजिक्सच्या तत्त्वांवर आधारित संगणक तंत्रज्ञानाचा एक नवीन प्रकार आहे. यामध्ये कॉम्प्युटर बिट्सऐवजी क्यूबिट्सचा वापर केला जातो.
विलोने जरी त्रुटी सुधारण्यात यश मिळवले असेल, तरीही त्याचा वापर हे एक मोठे आव्हान आहे.
विलो चिपचा वापर सुरुवातीला काही वास्तविक समस्या सोडवण्यासाठी केला जाईल, परंतु व्यावसायिक वापरात येण्यासाठी अनेक दशके लागतील.