अळशीच्या बियांचे आरोग्यदायी फायदे

flax seeds : अळशीच्या बिया त्यांना जवस असंही म्हणतात, या छोट्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. अळशीच्या बियांमध्ये असे अनेक पोषक तत्त्व आहेत जे आपल्याला निरोगी ठेवतात आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतात.
[gspeech type=button]

अळशीच्या बिया त्यांना जवस असंही म्हणतात, या छोट्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड्स, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे पोषक घटक शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. अळशीच्या बियांमध्ये असे अनेक पोषक तत्त्व आहेत जे आपल्याला निरोगी ठेवतात आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यात मदत करतात.

दररोज 1 चमचा अळशीच्या बिया खाल्ल्याने किंवा त्यांना चांगले कुटून पाण्यात मिसळून प्यायल्याने आपण अनेक गंभीर आजार टाळू शकतो. चला, तर मग अळशीच्या बियांचे फायदे जाणुन घेऊ.

अळशीच्या बियांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स चांगल्या प्रमाणात असतात, यामुळे त्वचा ताजीतवानी आणि निरोगी राहते. या बियांमुळे चेहऱ्यावर सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

अँटीऑक्सिडंट्स आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवून शरीराचे रक्षण करतात. अळशीच्या बियांमधील अल्फा लिनोलिक ॲसिड संधिवात, दमा, मधुमेह आणि कर्करोगाशी लढण्यास मदत करते. 

या बियांमुळे रक्तातील कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो, तसचं आपले रक्ताभिसरण सुधारतं आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. परिणामी हृदयविकार किंवा हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

अळशीच्या बियांमुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात, वजन नियंत्रणात राहते आणि पोटाचा घेर कमी होतो. योग्य प्रमाणात अळशीच्या बिया खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहिलं जातं, हे डायबिटीसच्या रुग्णांसाठी  फायदेशीर ठरू शकते. 

अळशीच्या बियांप्रमाणेच जवसाचं तेलही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. जवस तेलाने शरीराला मसाज केल्यास त्वचेसोबतच शरीराच्या अंतर्गत अवयवांचे कार्यही सुधारते.

ओमेगा 3 फॅटी ॲसिड शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. अळशीच्या बियांमध्येही ओमेगा 3 फॅटी ॲसिड असल्याने शाकाहारी लोकांसाठी ते अत्यंत फायदेशीर आहे.

अळशीच्या बियांचा  केसांसाठीही  आपण उपयोग करू शकतोएक चमचा अळशीची पावडर, दोन चमचे नारळ तेल आणि थोडंसं दूध एकत्र  मिसळून हे मिश्रण केसांवर लावून 20 ते 30 मिनिटे ठेवा. नंतर शँपूने केस धुवा. यामुळे केस घनदाट आणि मजबूत होण्यास मदत होते.

अळशीच्या बियांमध्ये असलेले पोषक घटक शरीरासाठी खूप उपयुक्त असतात. तरीही कोणतेही आरोग्यविषयक उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे होणाऱ्या आजारांना टाळण्यासाठी या चालीरीती किंवा रिवाज आपल्या पूर्वजांनी सुरू केले आहेत, हे जर लक्षात
Lifestyle: काही स्वस्त आणि लोकल मार्केटमधील लिपस्टिक्समध्ये असे काही केमिकल्स असू शकतात, जे आपल्या शरीरासाठी खूप हानीकारक असतात.
Lifestyle: आपल्या देशात केळीच्या अशा भरपूर जाती आहेत. आणि गंमत म्हणजे, प्रत्येक जातीच्या केळ्याचे फायदे देखील वेगळे आहेत. काही केळी

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ