महाराष्ट्रातील श्रद्धा आणि समृद्धीचे केंद्र

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर
महाराष्ट्रातील अनेक मंदिरे (Temples) ही केवळ धार्मिक विश्वासाचे केंद्र नव्हे, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचे केंद्र देखील आहेत. या मंदिरात वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी येतात. या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो.
[gspeech type=button]

महाराष्ट्रातील अनेक मंदिरे ही केवळ धार्मिक विश्वासाचे केंद्र नव्हे तर, मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धीचे केंद्र देखील आहेत. लाखो भाविक या मंदिरात वर्षभर दर्शनासाठी येतात. या भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दान धर्म करण्यात येतो. राज्यातील काही मुख्य मंदिरांमध्ये या दानामुळं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा झाली आहे. या संपत्ताचा उपयोग सामाजिक कार्यासाठी करण्यात येतो.

साईबाब मंदिर, शिर्डी

अहमदनगर जिल्ह्यामधलं शिर्डी इथलं साईबाबा मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराला दरवर्षी साधारण 900 कोटी रुपयांचे दान प्राप्त होते. या पैशातून मंदिर प्रशासन विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम आयोजित करते. तसेच गरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देते.

सिद्धिविनायक मंदिर, मुंबई 

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे गणपती बाप्पाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरात केवळ सामान्य भाविकच नाही, तर मोठमोठे सेलिब्रिटीही दर्शनासाठी येतात. या मंदिरातही भाविकांकडून मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. मंदिराच्या गाभाऱ्याला 3.7 किलो सोन्याचा लेप करण्यात आला आहे. मंदिराच्या विश्वस्त मंडळाकडून शिक्षण आणि शस्त्रक्रियांसाठी आर्थिक मदत करण्यात येते.

                                             दगडूशेठ हलवाई मंदिर, पुणे

महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे. या मंदिराला दरवर्षी सुमारे 15 ते 20 कोटी रुपये दान स्वरुपात प्राप्त होतात.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, पुणे

पुणे शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराची एकूण संपत्ती अंदाजे 40 ते 45 कोटी रुपये आहे.

या मंदिरांना मिळणारे मोठ्या प्रमाणात दान ही भाविकांची श्रद्धा आणि देवावरील विश्वास दर्शवते. या दानाच्या रक्कमेतून मंदिर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात वैद्यकीय मदत करण्यात येते. तसेच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम राबवण्यासाठी मदत होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trekking : ट्रेकच्यावेळी ट्रेक लीडर आणि स्वयंसेवक म्हणून काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
Trekking: ट्रेकर्स असणं म्हणजे फक्त गड-किल्ले चढण्यापुरतं मर्यादित नसतं. आपण एखाद्या गड-किल्ल्यावर जातो तेव्हा, तिकडच्या इतिहासाची आवड, माहिती आणि तिकडची
Trekking : ट्रेकिंगची आवड जपायची आहे पण त्यासाठी लागणारा खर्चही फार असतो. खिशाला परवडतील अशा किंमतीत राहण्याची, खाण्याची आणि पूर्ण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ