ट्रेकिंगचं प्लानिंग करता मग ‘या’ टिप्स लक्षात ठेवा

Trekking : ट्रेकिंगसारखं अॅडव्हेंचर करताना काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ट्रेकिंगचं ठिकाण, कधी, कसं जायचं यासह काय - काय घेऊन गेलं पाहिजे या सगळ्याचं नियोजन आपण करतो.. पण अलिकडच्या काळात ज्या काही अपघाती घटना घडल्या आहेत त्यानुसार आपण आणखीन बारकाईनं ट्रेकिंगचं नियोजन केलं पाहिजे. पाहुयात हे नियोजन कसं करायचं.
[gspeech type=button]

यावर्षी मे महिन्यातच पावासाचं आगमन झालं आहे. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यावर जे आल्हाददायक वातावरण अनुभवायला मिळतं, त्याचा अनुभव आताच घेता येतोय. सगळीकडे हिरवंगार दिसायला लागलं आहे आणि वातावरणातही प्रसन्नता आली आहे. अशा सगळ्या वातावरणात अनेकांनी तर ट्रेकिंगचं प्लॅनिंग सुरु केलंच असेल. 

अलिकडे ट्रेकिंगचा ट्रेंड खूप वाढत चालला आहे. दर आठवड्याच्या शेवटी कुठेतरी ट्रेकिंगला जाणं, किंवा पावसाळ्याच्या दिवसात आठवडाभर तरी दुसऱ्या जिल्ह्यात, राज्यात ट्रेकिंगला जाणं हे आता ट्रेंडी आणि स्टेट्स सिम्बॉल बनत आहे. पण ट्रेकिंगसारखं अॅडव्हेंचर करताना काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. ट्रेकिंगचं ठिकाण, कधी, कसं जायचं यासह काय – काय घेऊन गेलं पाहिजे या सगळ्याचं नियोजन आपण करतो.. पण अलिकडच्या काळात ज्या काही अपघाती घटना घडल्या आहेत त्यानुसार आपण आणखीन बारकाईनं ट्रेकिंगचं नियोजन केलं पाहिजे. पाहुयात हे नियोजन कसं करायचं. 

हवामानाचा अंदाज

पावासाळा सुरु झाला आहे.  आता जरी एक-दोन दिवस पावसाने उसंत घेतली असली तरी राज्यातल्या सगळ्याच धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. पण धबधबे सुरु व्हायला आणि त्यासगळ्या भागामध्ये हिरवळ उगवायला आणखीन थोडे दिवस लागणार आहेत. म्हणून तुम्ही जरा धीर धरा आणि जून महिन्यातच ट्रेकिंगचं प्लॅनिंग करा. 

तुम्ही ट्रेकिंगला ज्या ठिकाणी जाणार आहात तिथलं हवामान कसं असणार आहे, याची आगाऊ माहिती मिळवून ठेवा.  कारण आता पावसाचा पॅटर्न बदलला आहे. कमी वेळात खूप जास्त पाऊस पडतो.. तर सकाळी ऊन असलं तरी दुपारहून मुसळधार पावसाची शक्यता असते. मुसळधार पावसामध्ये ट्रेकिंगला जाणं धोकादायक असतं. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणावर जाणार आहात तिथलं हवामान कसं असेल याची जरुर माहिती घ्या. ट्रेकिंगच्या स्थळावर प्रशासनाने पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट दिला असेल तर तिथे जायचं टाळावं. 

स्थानिक प्रशासनाच्या सूचना आणि संपर्क

उत्साही ट्रेकर्स हे काहितरी साहस, अॅडव्हेंचर करायच्या जोशात असतात. मात्र, यामध्ये काहिही अघटित घडू शकते.. अलिकडच्या काळात अशा अनेक घटना ऐकायला मिळतात. त्यामुळे नियमाचं पालन अत्यावश्यक आहे. अनेक ट्रेकिंग स्थळांवर स्थानिक प्रशासनांकडून एका ठरावीक मर्यादेपलिकडे न जाण्याच्या ठळक सूचना दिलेल्या असतात. त्याचं पालन करणं गरजेचं आहे. फिरण्याची गुप्त ठिकाणं (हिंडन पॉईटंस्) शोधण्याच्या प्रयत्नात आपल्यासोबत चूकीच्या घटना, अपघात घडू शकतात याची जाणीव ठेवणं गरजेचं आहे. 

तसंच आपण जिथे ट्रेकिंगला जाणार आहात, त्या क्षेत्रातल्या स्थानिक पोलिस स्थानक, प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी आवश्यक असलेले फोन नंबर आपल्याजवळ असावेत. यातही शक्य असल्यास, तुम्ही जर ग्रुपने ट्रेकिंगला जात असाल तर तिथल्या पोलिस स्थानकाला किंवा रेस्क्यू ऑपरेशन यूनिट उपलब्ध असेल तर त्यांना आधी भेट देऊन त्यांना माहिती द्यावी. तसंच ट्रेक पूर्ण झाल्यावर पुन्हा एकदा पोलिस स्थानकाला भेट देऊन तुम्ही सुखरुप परत आल्याची माहिती द्यावी. हे अशासाठी की, ट्रेकिंग स्थळावर काही अडचण आली तर पोलिसांना त्याची कल्पना असेल. तेही सतर्क असतात. तुमच्याकडून मदतीसाठी फोन गेल्यावर ते तात्काळ त्याठिकाणी पोहोचू शकतात.  

हे ही वाचा : मिलाया इटालिया 1001’चे साहसवीर आशिष जोशी

तुमच्या शारिरीक क्षमतेनुसार ट्रेक स्थळाची निवड

ट्रेकिंगला कुठे जायचं हे तुम्ही तुमच्या शारिरीक क्षमतेनुसार ठरवलं पाहिजे. मोठ-मोठ्या ट्रेकिंग स्थळावर जाण्याची कितीही इच्छा असली तरिही, तुम्ही तो ट्रेक पूर्ण करता येईल का? जर तुम्हाला एखादा आजार असेल तर त्या स्थितीत तुम्हाला तिकडे जाता येईल का? याचा विचार जरुर करावा. 

जर तुम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला जात असाल तर जास्त उंचीची ठिकाणं टाळावीत. या ट्रेकिंग फील्डमध्ये तुम्ही नवीन असाल तर जास्त दिवसाचे ट्रेक्स करु नयेत. त्याऐवजी राहत्या ठिकाणापासून जवळपास असलेली एक दिवसात परत येऊ अशा ठिकाणांची निवड करावी. 

ट्रेक करताना विश्रांती आवश्यक

काही ट्रेक हे 4 – 5  तासाचे असतात. 4 – 5  तास सलग डोंगर वा गड – किल्ले चढणं हे जरी अनुभवी ट्रेकर असला तरी शक्य नसतं. त्यामुळे थोड्या – थोड्या अंतरावर विश्रांती घेणं आवश्यक आहे. या मधल्या विश्रांतीच्या वेळेत अंग स्ट्रेच करण्यासारखे व्यायाम करता येतात, पाणी पिणं, हलका प्रथिने पुरवणारा आहार घेणं तसंच दीर्घ श्वास घेण्याचा व्यायाम करता येईल.. यामुळे शरीरात पाण्याच्या पातळीचं संतुलन राखता येईल आणि आणखीन पुढे जायला ऊर्जा मिळते. 

ऊर्जा मिळेल असा आहार सोबत ठेवा

ट्रेकिंग करताना तुमच्या जवळ साधा प्रथिने असलेल्या आहार असणं आवश्यक आहे. ट्रेकिंग करताना जास्त तेलकट, मसालेदार नाश्ता, जेवण टाळावं. त्याऐवजी साधा नाश्ता, जेवण करावं. यामध्ये तुम्ही वाफवलेले अंडी, फळं, ड्रायफ्रुड्स यांचा वापर करु शकता. यामुळे शरिराला पुरेशी ऊर्जा मिळते. तसंच सुस्तपणा येत नाही, त्यामुळे ट्रेक करायला सोपं जातं.  

अनेक ट्रेकिंग स्थळांच्या आसपास मिळणाऱ्या चूलीवरचं शाकाहारी – मांसाहारी जेवणाचा फक्कड बेत केलेला असतो. पण असं जेवण हे ट्रेक पूर्ण झाल्याच्या आनंदात केलेलं उत्तम. त्यामुळे ट्रेक करतेवेळी साध्या आहाराला पसंती द्यावी. 

हे ही वाचा : माऊंट एव्हरेस्टला गवसणी घालणारी सर्वात लहान महिला, कृष्णा पाटील

ट्रेकिंग कॉस्च्युम

ट्रेकिंगसाठी आपले कपडे आणि शूज हे सुयोग्य असले पाहिजेत. ज्या कपड्यामध्ये आपण मोकळेपणाने वावरु शकतो असे कपडे घालावेत. कपडे हे खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त ओवरसाईज नसले पाहिजेत. अंगभर, सूटसूटीत कपडे असलेले उत्तम. जर पाऊस असेल तर रेनकोट घ्यायला विसरु नका. 

पायामध्ये चांगले शूज असले पाहिजेत. पायापेक्षा मोठे किंवा पायाला खूप घट्ट बसतील असे शूज घालू नका. शूजचा सोल हा ग्रीप असलेला पाहिजे. 

तुम्ही जर चष्मा वापरत असाल तर तुमच्याकडे इमरजन्सी म्हणून एक आणखीन चष्मा ठेवावा. 

बॅग पॅक मध्ये काय असलं पाहिजे

सगळ्यात महत्त्वाचं बॅग कोणती न्यायची आणि त्यात काय असलं पाहिजे. तर तुमच्या सामानानुसार तुमची बॅग असली पाहिजे. तसंच ती हाताळता घेईल म्हणजे ती बॅग खांद्याला लावून चढण चढता येईल अशी बॅग असली पाहिजे. या बॅगमध्ये एक बॅटरी, चाकू, तुमची औषधं, तुमच्या खाण्याच्या वस्तू, पाण्याची बाटली, तुमचा नॅपकीन अशा मोजक्याच वस्तू असाव्यात. जेणेकरुन तुमच्या बॅगचं वजन कमी राहिल.

सरतेशेवटी तुम्ही ट्रेकिंगला जात आहात.. या सगळ्या ट्रेकचे फोटो, व्हिडीओ काढायचा मोह तर तुम्हाला होणारच पण त्याला आळा घालणं गरजेचं आहे. तुम्ही चालत असताना मोबाईल वापरु नका. तो खिशात ठेवण्याऐवजी बॅगमध्येच ठेवा. तसंच पावसाच्या पाण्यात भिजू नये म्हणून मोबाईलसाठी प्लास्टिक पिशवी किंवा कव्हर घ्या. ज्यावेळेला तुम्ही विश्रांतीसाठी थांबाल तेव्हा आवश्यकता असेल तरच मोबाईल वापरा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trekking : ट्रेकिंगची आवड जपायची आहे पण त्यासाठी लागणारा खर्चही फार असतो. खिशाला परवडतील अशा किंमतीत राहण्याची, खाण्याची आणि पूर्ण
Ahmadabad and Jaipur : गुजरात येथील अहमदाबाद आणि राजस्थान मधील जयपूर ही दोन शहरं जागतिक वारसा दर्जा प्राप्त असलेली शहरं
नालासोपाराला (Nala Sopara) अनेक ऐतिहासिक संदर्भ आहेत. आज हे संदर्भ काहीसे दुर्लक्षित झाले आहेत. प्राचीन भारतातलं आध्यात्मिक आणि आर्थिक तीर्थ

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ