हिंदू – मुस्लिम वादाची साक्ष आणि ऐक्याचं प्रतीक धुळ्यातील ‘खुनी गणपती’

[gspeech type=button]

नाव वाचून आश्चर्य वाटलं नं ? पण हा धुळ्यातला मानाचा गणपती आहे! धुळ्यातील या खुनी गणपतीची ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी महापूजा खुनी मशिदीजवळ होते. 

 

पण या खुनी नावांची भानगड नेमकी काय?

1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यावेळी श्री गणेशाची विसर्जन मिरवणूक साधारण एक हजार वर्ष जुन्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळच्या नमाजाच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाचं रुपांतर हाणामारीत झालं. या हाणामारीला थांबवण्याकरता ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले,अनेक जखमी झाले.  स्थानिक आहिराणी भाषेत “त्या मशिदीजवळ खून पडनात”, “खून नी मसिद”, गणपतीना वकतले तथा खून पडनात”… या चर्चांमुळे मशिदीला ‘खुनी मशिद’ आणि गणपतीला ‘खुनी गणपती’ ही नावं प्रचलीत झाली.  त्यावेळी निर्माण झालेल्या तणावामुळं तब्बल 5 दिवस गणपती त्या मशिदीसमोरच होता.

मशिदीतर्फे गणपती बाप्पाची आरती

ब्रिटिशांकडून समेटाकरता देणगी 

पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचललं. ‘फोडा आणि राज्य करा’ अशी नीती असणाऱ्या ब्रिटीशांकडून चक्क देणगी म्हणून दोन्ही गटांना 228 रुपये दिले गेले.  

 

नमाजाच्यावेळी पालखीवर पुष्पवृष्टी

आताही दर अनंत चर्तुदशीला गणपतीची विसर्जन मिरवणूक पालखीतूनच निघते. यावेळी पारंपारीक टाळ-मृदुंगाच्या गजरात तीनपावली, बारापावली नृत्य सादर केलं जातं. बरोबर सायंकाळी 5 वाजता, म्हणजेच नमाजाची अजान सुरू असताना, खुनी गणपतीची पालखी मशिदीच्या प्रवेशद्वाराच्या एकदम समोर येते. मशिदीतून गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते. मशिदीतून एक धर्माधिकारी येतात. त्यांच्यासोबत आरतीचं तबक आणि गुलाबाच्या फुलांचा हार घेऊन आणखीही काही जण असतात.  मशिदीतर्फे गणपतीची आरती करण्यात येते.एकीकडे आरती आणि दुसरीकडे अजान सुरु होते. आपापल्या परमेश्वराशी एकसंध होण्याऱ्या ध्वनींमधून वातावरणात चैतन्य सळसळतं.  मशीदीसमोर आरती झाली की गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो. 

याठिकाणी आल्यावर पालखीचा भार अचानक वाढत असल्याचा अनुभव काही  भाविक सांगतात. हिंदू-मुस्लीम ऐक्याची सुंदर परंपरा इथे आहे. आणि दोन्ही धर्मीयांनी ती आजतागायत जपलीय. 

 

धार्मिक सलोखा कायम

आठ-दहा लाख लोकसंख्या असलेल्या धुळे महानगरात जुने धुळे सोडलं, तर गणपतीची ही विशेष आरती फार कुणाला माहित नाही. जुन्या धुळ्यातल्या जुन्या लोकांनी ही प्रथा जपलीय. त्यामुळंच वेगळेपणाचा इव्हेंट होण्यापासून सुटका झाली आहे.  जसं 1895-1896 मध्ये होतं तसंच तंतोतंत आजही पाळलं जातंय. धुळ्यात आल्यानंतर, जुने धुळे विचारलं की खुनी मशिद हाच बसथांबा आजही आहे. जसं मशिदीच्या प्रशासनाने गणपती जपलाय, तसं जुन्या धुळ्याने हिंदूबहूल पेठेतील लोकांनी मशिदीचं पावित्र्य जपलीयं. 

 

धनश्री कलाल

धुळे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ