किशोरावस्था : आहार आणि हार्मोन्सचे संतुलन 

Navratri Diet Plan : किशोरावस्था हा मानवाच्या संपूर्ण वाढीतील सर्वात सुंदर आणि आव्हानात्मक काळ असतो. या वयात मुलींची वाढ अतिशय वेगाने होत असते. एका लहान मुलीचं संक्रमण हळूहळू एका पूर्ण वाढ झालेल्या स्त्री मध्ये होत असते. त्यासाठी शरीरात स्रवत असलेल्या इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्समुळे मुलीच्या शरीरातच नाही तर, तिच्या मानसिक आरोग्यात आणि सामाजिक वर्तणुकीतही आमूलाग्र बदल होतात. 
[gspeech type=button]

किशोरावस्था हा मानवाच्या संपूर्ण वाढीतील सर्वात सुंदर आणि आव्हानात्मक काळ असतो. या वयात मुलींची वाढ अतिशय वेगाने होत असते. एका लहान मुलीचं संक्रमण हळूहळू एका पूर्ण वाढ झालेल्या स्त्री मध्ये होत असते. त्यासाठी शरीरात स्रवत असलेल्या इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन यासारख्या हार्मोन्समुळे मुलीच्या शरीरातच नाही तर, तिच्या मानसिक आरोग्यात आणि सामाजिक वर्तणुकीतही आमूलाग्र बदल होतात. 

स्वतःवरचं सकारात्मक प्रेम 

या काळात आई-वडिलांपेक्षा मित्र-मैत्रिणी अधिक जवळचे वाटायला लागतात. जंकफूड आणि बाहेरचं खाण्याचं प्रमाण वाढते. सोशल मीडिया किंवा सोबतच्या मुलांच्या जीवनशैलीचं आकर्षण वाटून त्याचं अनुकरण करु लागतात. शरीराबद्दल, दिसण्याबद्दल अधिक जागरूक होत जातात.  हे सगळे बदल अगदी सहज आणि नकळत घडू लागतात. त्यामुळे ह्या काळात मुलींच्या शारीरिक आणि  मानसिक आरोग्याची काळजी घेणं ही तारेवरची कसरत असते. त्याबद्दल काही सोप्या प्रॅक्टिकल टिप्स आज समजून घेऊया. 

आहार 

या काळात खरंतर शारीरिक वाढ, शरीरात होणारे बदल आणि ऋतुप्राप्ती म्हणजे मासिक पाळी सुरु होते. ह्या सगळ्यासाठी समतोल आहार घेण्याची खूप गरज असते. परंतु याच काळात मुली शाळेत माध्यमिक इयत्तेत प्रवेश घेतात. अभ्यास वाढतो, शाळेसोबत क्लासेसही लावले जातात. त्यामुळे शाळेच्या आणि क्लासेसच्या वेळा पाळणे,  परीक्षांचा ताण अशा सगळ्या गोष्टींमुळे खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष होते. मात्र, अभ्यासासोबत मुलांच्या आहाराची ही काळजी घेण्यासाठी आपल्यासाठी काही विशेष टिप्स.

साध्या पण पौष्टीक गोष्टी

बऱ्याचदा सकाळची शाळा किंवा क्लास असेल तर नाश्ता केला जात नाही. अश्या वेळेस मुलांना फळे, सुकामेवा, कुरमुरे, चणे शेंगदाणे घातलेला चिवडा, फोडणी दिलेल्या ज्वारीच्या लाह्या, साखरविरहित एनर्जी बार्स, घरी केलेले शेंगदाणा, मूग, नाचणी इत्यादी लाडू, तुपावर भाजलेले मखाणे अशा गोष्टी डब्यात भरून देता येतील.

भाज्यांची आवड निर्माण करा 

दोन्ही वेळेच्या जेवणात भाज्यां असणे आवश्यक आहे. भाज्या कमी खाल्ल्यास कार्बोदके असणारे पदार्थ म्हणजे पोळी, भात, ब्रेड अतिरिक्त प्रमाणात खाल्ले जातात आणि वजन वाढण्याचा धोका असतो. यासाठी  मुलींना, ऑनलाईन सलाड, सूपच्या रेसीपी शोधणं, भाजी आणायला पाठवणं, सुट्टीच्या दिवशी भाज्या निवडायला मदतीला घेणं असे करून त्यांच्या मनात भाज्या खाण्यासाठी आवड निर्माण करता येईल. दोन्ही वेळेच्या जेवणात कमीत कमी एक-एक वाटी भाजी खाणे अतिशय आवश्यक आहे.

 आयर्न आणि कॅल्शियम

शरिरात आयर्न आणि कॅल्शियमचे प्रमाण संतुलित असणं आवश्यक आहे. त्यासाठी काळे मनुका, अंजीर, खजूर, नाचणी, जवस, भोपळ्याच्या बिया,  हिरव्या पालेभाज्या, दूध आवडत नसल्यास त्याला पर्याय म्हणून दही, ताक घेणे आवश्यक आहे. तसंच जेवणामध्ये लिंबाचा रस असलेले सॅलेड्स, कोशिंबिरीचा समावेश करावा.

चांगल्या त्वचेसाठी

सतत पॅकबंद किंवा रेडी टू इट गोष्टी खाल्ल्यामुळे वजन वाढण्याबरोबरच आपली त्वचा आणि पचनसंस्थेवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. या किशोरावस्थेत मुली आपण कसे दिसतो याबद्दल खूप पझेसिव्ह असतात. अशावेळी योग्य खाणं खाल्ल्याने आरोग्य आणि त्वचा ही चांगली राहू शकते हे पालकांना पटवून देता येईल. तसचं यासाठी ऑनलाईन रिसर्च लेख आणि यूट्युब व्हिडिओचीही मदत घेता येईल. 

पुरेसं पाणी पिणे

पाणी पिण्याचे प्रमाण फार कमी असते. त्याउलट कोल्ड्रींग्ज, ज्यूस, सरबत अशा शूगरी ड्रिंग्जचं सेवन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. केक, चॉकलेट असे मैदा आणि साखर असणाऱ्या पदार्थांचं अतिसेवन केल्याने वजन वाढणं, थकवा येणं, त्वचेवरचं तेज कमी होणं, डिहायड्रेशन होणं, त्यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळे येणं अशा सगळ्या तक्रारी सुरू होतात. या सगळ्याची मुलींना कल्पना देत त्यांना अधिकाधिक पाणी पिण्यासाठी व समतोल आहार घेण्यासाठी मार्गदर्शन करावं.  

स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवा

वयाच्या या टप्प्यावर शरिरातील हार्मोन्समध्ये खूप मोठी उलथापालथ होत असते. या बदलांमुळे मुला-मुलींमध्ये एक प्रकारचा बंडखोरपणा येतो. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून वागवावे, त्यांची मते विचारात घ्यावी असं त्यांना वाटायला लागते. ह्या सगळ्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या आहारा निवडीवर होतो. ह्यावर सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे संवाद. घरातले छोटे – छोटे निर्णय जसं भाजी काय करायची, रविवारी स्पेशल काय बनवायचे अश्या गोष्टींमध्ये त्यांना सहभागी करून घेतल्यास त्यांना घरी थांबून सगळ्यांबरोबर खाण्या पिण्यात मजा येऊ लागते. 

व्यसनांपासून सावध करा

त्याबरोबरच ह्या काळात मुलांना एखाद्या गोष्टींच्या दीर्घकालीन परिणामाचा विचार करणे आवश्यक वाटत नाही, त्यामुळेच ती सहज जंक फूड, दारू, सिगारेट, ड्रग्स ह्यांच्या आहारी जातात. पालकांनी वेळोवेळी समाजातील काही उदाहरणे देत आपल्या मुलींशी यासगळ्या विषयांवर संवाद साधला पाहिजे.

9 Comments

  • प्रीती बक्षी

    अनुजा अतिशय उत्तम लेखन 👌👌 वाढत्यावयातीलबदल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासावर अगदी उपयुक्त माहिती

  • विद्या परब

    खूप छान मांडणी आहे किशोर अवस्थेतील मुलांसाठी त्याच्या हया वयातील त्याच्या मनाच्या अवस्थेची ही योग्य कल्पना दिलीस इतर ही मुद्दे खूप छान आहेत . खूप शुभेच्छा
    धन्यवाद

  • Rupali Hande-Navale

    Very useful and important message, nicely explained.
    All the best Anuja !

  • विजया साठे

    नमस्कार,
    लेख सुंदर आहे, वयोमानाप्रमाणे होणारे बदल, त्यानुसार आहार आणि सगळ्या भाज्या खाण्याची सवय मुलामुलींना असणे, मुलांना काहीं निर्णयात सहभागी करून घेणे,तसेच स्वतः वर प्रेम करायला लावणे इत्यादी छान सांगितले आहे.
    असेच वेग वेगळ्या विषयावर लिहीत रहा.

  • शुभा वडके

    खूपच छान, उपयुक्त माहिती सांगितली आहे

  • Sheetal Deshpande

    छान आणि उपयुक्त लेख….👍

  • Varsha P.

    उत्तम लेख आणि लेखणी

  • Manasi Nikhilesh godbole

    Nice n very informative Anuja

  • Revati

    पहिल्या लेखा सारखाच हा ही उत्तम आणि उपयुक्त लेख 👌👌👌👌👌

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 Responses

  1. पहिल्या लेखा सारखाच हा ही उत्तम आणि उपयुक्त लेख 👌👌👌👌👌

  2. खूपच छान, उपयुक्त माहिती सांगितली आहे

  3. नमस्कार,
    लेख सुंदर आहे, वयोमानाप्रमाणे होणारे बदल, त्यानुसार आहार आणि सगळ्या भाज्या खाण्याची सवय मुलामुलींना असणे, मुलांना काहीं निर्णयात सहभागी करून घेणे,तसेच स्वतः वर प्रेम करायला लावणे इत्यादी छान सांगितले आहे.
    असेच वेग वेगळ्या विषयावर लिहीत रहा.

  4. खूप छान मांडणी आहे किशोर अवस्थेतील मुलांसाठी त्याच्या हया वयातील त्याच्या मनाच्या अवस्थेची ही योग्य कल्पना दिलीस इतर ही मुद्दे खूप छान आहेत . खूप शुभेच्छा
    धन्यवाद

  5. अनुजा अतिशय उत्तम लेखन 👌👌 वाढत्यावयातीलबदल आणि त्यामुळे होणाऱ्या त्रासावर अगदी उपयुक्त माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने
National Milk Day : राष्ट्रीय दूध दिनानिमित्त भारतातल्या दुग्ध क्रांतीविषयक विशेष लेख.
Vedh Shivkalacha : कोणत्याही युद्धाचे यश हे अनेक गोष्टींवर अवलंबून असते आणि त्यातील एक सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ