महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय

Mahakumbh 2025 : 13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेश सरकार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या उपक्रमामुळे  तीर्थयात्रेकरूंच्या उपस्थितीचे ट्रॅकिंग केलं जाणार आहे. AI कॅमेरे, RFID ब्रेसलेट्स आणि मोबाइल ॲपच्या मदतीने या मेळ्याचं व्यवस्थापन अधिक सोपं आणि सुरक्षित केलं जाईल.

13 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये सुरू होणाऱ्या महाकुंभमेळ्यात उत्तर प्रदेश सरकार डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. या उपक्रमामुळे  तीर्थयात्रेकरूंच्या उपस्थितीचे ट्रॅकिंग केलं जाणार आहे. AI कॅमेरे, RFID ब्रेसलेट्स आणि मोबाइल ॲपच्या मदतीने या मेळ्याचं व्यवस्थापन अधिक सोपं आणि सुरक्षित केलं जाईल.

महाकुंभमेळा हा एक अतिशय महत्त्वाचा धार्मिक उत्सव आहे. यामध्ये लाखो लोक सहभागी होतात. आणि सरकारच्या अंदाजानुसार यंदा 45 कोटी भक्त सहभागी होतील. महाकुंभमेळा 13 जानेवारी 2025 रोजी सुरू होईल आणि पुढे 45 दिवस चालेल.

हे ही वाचा : युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत कुंभमेळ्याचा समावेश

या महाकुंभ मेळ्यात काही नविन डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल:

स्मार्ट कॅमेरेAttribute-based Search टेक्नोलॉजीच्या मदतीने प्रत्येक कॅमेरा गर्दी किती आहे, कुठे अडचणी होऊ शकतात याची माहिती देईल. यामुळे सरकारला लोकांच्या सुरक्षा व्यवस्थापनात मदत होईल.

RFID ब्रेसलेट्सप्रत्येक यात्रेकरूला एक RFID ब्रेसलेट दिलं जाईल. यामुळे कोण कोण आले, कोणती व्यक्ती कुठे गेली याची माहिती मिळू शकेल. यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवणं सोपं होईल.

मोबाइल ॲप आणि वेबसाइटयात्रेकरूंसाठी 11 भाषांमध्ये AI चॅटबॉट उपलब्ध असेल, या चॅटबॉटच्या माध्यमातून लोकांना माहिती मिळवणं सोपं होईल. तसेच, QR कोड-आधारित पासेस दिले जातील, यामुळे प्रवेश सोपा आणि सुरक्षित होईल.

हे ही वाचा : वर्ल्ड टूरिझम ट्रेड मध्ये झळकणारमहाकुंभ 2025’

महाकुंभाची तयारी

महाकुंभ मेळ्यात 450 दशलक्ष भक्तांची उपस्थिती अपेक्षित आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. सरकारने यासाठी अनेक डिजिटल उपाययोजना केल्या आहेत. त्यात स्वच्छतेचे निरीक्षण, तंबूंचे व्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन यांचा समावेश आहे.

महाकुंभ परिसरात महत्त्वाची माहिती दाखवणारे डिजिटल साइनबोर्ड्स (VMD) लावले जातील. तसेच 530 प्रकल्पांचे थेट निरीक्षण सॉफ्टवेअर आणि ड्रोनद्वारे होईल.

महाकुंभ शहरात भक्तांसाठी स्नानाची सोय करण्यासाठी 35 कायमस्वरूपी घाटांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याशिवाय, 9 नवीन घाटांची बांधणी बांधणी केली आहे.

 उत्तर प्रदेश सरकार महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून तीर्थयात्रेकरूंच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेसाठी नवे उपाय लागू करत आहे. यामुळे महाकुंभ अधिक सुरक्षीत, प्रभावी आणि भक्तांसाठी आरामदायक बनेल.

हे ही वाचा : 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mahakumbh 2025 : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा
Mahakumbh 2025 Stampede : बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा
Mahakumbh 2025 : महाकुंभ या धार्मिक मेळाव्यासाठी जगभरातून कोट्यावधी लोक प्रयागराजला एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी विमानातून येणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश