एखादी स्त्री जेव्हा सल्ला घ्यायला आहारतज्ज्ञापर्यंत पोहोचते, तेव्हा बऱ्याचदा पाळी अनियमित झालेली आहे, जडत्व आलेलं आहे, रक्तातील साखर वाढली आहे, डॉक्टरांनी लवकरात लवकर वजन कमी करायला सांगितले आहे, अशा गोष्टी घेऊनच. पण या आजारांना कारणीभूत परिस्थिती आपल्या शरीरात आपणच खूप वर्ष आधीच तयार करत असतो. प्रत्येक मुलीला तिची पाळी सुरु व्हायच्या आधीपासून वयाच्या प्रत्येक टप्प्यावर आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याच्याविषयी प्रॅक्टिकल टिप्स मिळाल्या हव्यात.
अंडरवेट आणि ओव्हरवेटची समस्या
साधारण 6 ते 12 वर्षांच्या मुलींमध्ये अति लठ्ठपणाची समस्या प्रकर्षाने दिसून येते. अति लठ्ठपणांमुळे मग या वयातल्या मुलींना लवकर पाळी येते. त्यामुळे त्यांच्या वाढीवरही दुष्परिणाम होतात. तर काही मुलींमध्ये वजन कमी असणे किंवा अशक्तपणा असणे, रक्तात लोहाची कमतरता याही वरचेवर आढळून येणाऱ्या आरोग्याच्या समस्या आहेत. अलीकडे अंडरवेट आणि ओव्हरवेटची समस्या असलेल्या अनेक मुली आजुबाजूला दिसून येतात.
सध्याची मुलं पूर्वीसारखी मैदानी खेळ खेळत नाहीत. याला जागेचा अभाव आणि मोबाईलचं व्यसनं अशी दोन्ही कारणं आहेत. मात्र, या मुलांच्या खाण्यात अतिरिक्त साखर, मीठ, तेल, बटर यासारख्या फॅट्सचा मारा असतो. यात पॅकबंद पदार्थ आणि जंक फूडचाही मोठ्या प्रमाणावर भडिमार असतो. या पॅकबंद अन्न पदार्थांच्या सेवनातून शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणापेक्षा जास्त कॅलरिजचं सेवन होतं. यालाच विषम समतोल (नेगेटिव्ह बॅलन्स) म्हणतात. यामुळे शरीरातल्या चरबीचं प्रमाण वाढून लठ्ठपणा यायला सुरूवात होते.
पाळीसाठी शरीर कसं तयार होतं?
आपल्या शरिरात अशी नैसर्गिक रचना आहे की, वजनाचा एक विशिष्ट टप्पा गाठल्यावर शरीर पुढच्या तयारीला म्हणजे मासिक पाळीच्या पूर्वतयारीला लागते. मासिक पाळीच्या अनुषंगाने आवश्यक ते हार्मोनल बदल मुलींच्या शरिरात घडायला सुरूवात होते. या काळात मुलींची शारीरिक वाढ थांबते. तर काही मुलींमध्ये लोह, कॅल्शिअम, बीकॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स यांची कमतरता दिसू लागते. त्यामुळे मासिक पाळी सुरु होण्याआधी मुलीला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासाठी त्यांच्या आहारात योग्य ते बदल करणं गरजेचं आहे.
6 ते 12 वयोगटाच्या मुलींसोबत करावयाच्या एक्टिव्हिटिज
– दिवसभरात किमान एक तास कुठल्याही प्रकारचा शारीरिक व्यायाम अतिशय आवश्यक आहे. यामध्ये मैदानी खेळ, सांघिक खेळ, जिम्नॅस्टिक, योगासनं, दोरीवरच्या उड्या मारणे, जिने चढणे-उतरणे, झुंबासारखे नृत्यप्रकार, पोहणे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी आवडीनुसार करू शकतो.
– मुलांना घरच्या खाण्याची, जेवणाची सवय लावावी. यासाठी त्यांना जेवण बनवण्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचं. मुलांना भाजी मार्केटमध्ये घेऊन जायचं, भाज्या चिरायला-कापायला देणे, जमल्यास सुट्टीच्या दिवशी एखाद्या भाजीच्या मळ्यात किंवा शेतात घेऊन जाणे. त्यांना स्वत:ला सोप्या आणि हेल्दी रेसिपीज पाहून त्या बनवण्यासाठी उद्युक्त करायचं.
आहारात विशेष काय हवं?
– त्यांच्या जेवणातील तंतुमय पदार्थ म्हणजे फायबरचं प्रमाण चांगलं असायला हवं. त्यासाठी रोजच्या आहारात भाज्या, कोशिंबिरी, फळे, सुकामेवा यांचा समावेश असावा.
– याशिवाय काळे मनुका, खजूर, अंजीर तसेच नाचणीपासून बनवलेले पदार्थ, मांसाहार घेत असल्यास अंडी, मासे, चिकन इत्यादींचा समावेश केल्यास रक्तात लोहाची कमतरता भासणार नाही.
दीर्घकाळासाठी हाडांची मजबूती
– बऱ्याचदा या वयात हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त असलेलं दूध प्यायला मुलींना आवडत नाही. पण त्यांना बाजारात मिळणाऱ्या अन्य वेगवेगळ्या पावडरपेक्षा शतावरी कल्प दुधासह प्यायची सवय लावावी. याशिवाय ताक, दही यातूनही मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम मिळते. त्यामुळे दुधाऐवजी निदान ताक,दही चा समावेश दररोजच्या आहारात करावा.
पॅकबंद पदार्थ आपणच टाळावेत
– पॅकबंद पदार्थांचे प्रमाण कमी करण्याची सुरुवात प्रथम घरापासून करायला हवी. घरात हे पदार्थ (फ्रोझन फूड, चीप्स) आणलेच गेले नाहीत. तर ते खाण्याचं प्रमाण ही 50 टक्क्यांने कमी होईल.
मित्र-मैत्रिणींना घरी बोलवा
– या वयात मुलींच्या खाण्या-पिण्याच्या सवयीवर मित्र-मैत्रिणींचा खूप पगडा असतो. तेव्हा अधून-मधून सुट्टीच्या दिवशी मुलींच्या मित्र-मैत्रिणींना घरी बोलावून खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना विविध पौष्टिक पदार्थ वाढून देत त्यांचं महत्व पटवून देता येईल.
झोपेच्या वेळा आणि हार्मोन असंतुलन
– वाढत्या स्कीनटाइममुळे या वयातल्या मुलींच्या झोपेच्या वेळा बदलतात. उशिरा झोपणे, उशिरा उठण्याच्या सवयींमुळे हार्मोनल इम्बॅलन्सला सामोरं जावं लागते. यामुळे मग पुढे मासिक पाळी येणं, त्यातील नियमितता अनियमितता अशा सगळ्याचं गोष्टींवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे याच वयात त्यांना स्क्रीनटाइमचे दुष्परिणाम पटवून देऊन, वेळेचं बंधन ठरवून देणं गरजेचं आहे.
संवाद साधा
– शाळेतल्या अभ्यासाचा तणावाचा सुद्धा नकारात्मक परिणाम होतो. यासाठी पौष्टिक आहारासोबत मुलांच्या मनाची काळजी घेण्यासाठी मुलांमध्ये एखाद्या कलेची आवड निर्माण करत ती जोपासणे तसचं वेळोवेळी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला घेऊन जात त्यांच्याशी संवाद साधणं ही तितकचं गरजेचं आहे.
27 Comments
अनुजा वयात येणाऱ्या मुलींसाठी काय योग्य आणि काय अयोग्य ते अतिशय उत्तम पद्धतीने समजाऊन सांगितले आहेस ,उत्तम लेखन keep it up Anuja 👍👍👍
Very useful and important message, nicely explained.
All the best Anuja !
अनुजा खूप सुंदर आणि माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण ,बॅलन्स डाएट बद्दल मार्गदर्शन करणारा सुरेख लेख आहे. पुढील लेखन प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद
Very important topic nicely explained. All the best .
खूपच छान अनुजा सहज सोप्या शैलीत उपयुक्त माहिती
Anuja, tuzi soppi mandani ani vichar faar chhan 👌
Excellent Article
अत्यंत उपयुक्त माहिती अगदी व्यवस्थित सांगितली आहे. लेख आवडला.
अनुजा, लिहीती झालीस म्हणून अभिनंदन, नवरात्रीचे निमित्ताने प्रत्येक घरातील वयात येणाऱ्या मुलीचे सशक्त, सुदृढ स्त्री मध्ये रुपांतर होण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी, अगदी सुलभ पध्दतीने मांडल्या आहेस, खरंच जर साधे सोपे आहारातील बदल , व्यायाम , शारिरीक खेळ ह्यांची सवय लावली तर प्रत्येक घरात मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सशक्त दुर्गा तयार होतील, , keep it up
Nice n crisp
नेहमी प्रमाणे उत्तम लेख, याचा नक्कीच सर्वाना उपयोग होईल…अशीच लिहीत रहा…अनेक शुभेच्छा.
खूप माहितीपूर्ण लेख आहे…. अनुजा वयात येणाऱ्या सर्व मुलींना सोप्या भाषेत समजेल असे लिहिले आहे…. अशीच लिहीत रहा…….
खूप छान ,अशीच लिहीत रहा, पुढच्या लेखाची वाट पाहते आहे.
Nice & Informative 👍
सुंदर लेख
Anuja, khup changly prakare, points madhe mahiti dili aahes .
All d best 👍👍
Khup chan mahiti deli ahes Anuja.
लेख छान आहे…..keep it up Anuja thumbs 👍🏼👍🏼
Very useful and important message, nicely explained,it should be followed strictly. congratulations Anuja and all the best.
खूपच माहितीपूर्ण लेख आहे अनुजा👌👌
आहार/ विहार, व्यायाम, इतर सवयी आणि त्यावर पर्याय सगळे cover केले आहेस. छानच .
असेच माहितीपूर्ण लेख लिहीत जा
Wishing you very All The best.🌹✌️✌️
खूपच सुंदर लेख आहे अनुजा
व्वा अनुजा लेख छानच! माहिती पूर्ण लिहीला आहेस
छान माहिती दिलीयस अनुजा
अप्रतिम लेख ताई, छान मार्गदर्शन केले आहे
Good work Anuja as usual
Very nicely explained in simple way
All the best
खूप छान लेख आहे अनुजा..,वयात येणाऱ्या मुलींच्या आईंसाठी छान मार्गदर्शक लेख…..असेच लेख लिहीत रहा….All the best…keep it up….👍
खूप मस्त मुद्देसुद मांडणी आहे . आहाराची .वाढत्या वयात असणारी गरज आणि काय टाळावे हे अगदी छान सांगितले आहे .
तुझ्या पुढील प्रवासास अनेक शुभेच्छा