विविध देशांमधील दिवाळी

Diwali celebration: दिवाळी सण हा फक्त भारताचाच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो आणि काही देशांमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे.
[gspeech type=button]

दिवाळी सण हा फक्त भारताचाच नव्हे तर जगभरात साजरा केला जातो आणि काही देशांमध्ये दिवाळी साजरी करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊया देशाच्या विविध भागात दिवाळी कशी साजरी केली जाते.

नेपाळ

नेपाळमध्ये दिवाळी ‘तिहार’ या नावाने ओळखली जाते. हा पाच दिवसांचा सण असून ‘काग तिहार’ हा या उत्सवाचा पहिला दिवस आहे. ज्यामध्ये कावळ्यांना खायला घालतात. दुसऱ्या दिवशी ‘कुकुर तिहार’ किंवा ‘कुकुर पूजा’ असते. या दिवशी कुत्र्यांना पुष्पहार आणि तिलक लावून पूजले जाते. त्यांना त्यांच्या आवडीचे जेवण दिले जाते. तिसऱ्या दिवशी दिवसभर ‘गायपूजा’ उत्सव साजरा केला जातो आणि संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी लोकं वेगवेगळ्या प्राण्यांची पूजा करतात आणि पाचव्या दिवशी भाऊबीज साजरी करतात. थोडक्यात नेपाळमधील दिवाळी ही दिव्यांशी संबंधित नसून प्राणीमात्रांना समर्पित आहे.

थायलंड

थायलंडमध्येही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र या ठिकाणी दिवाळी या सणाचे नाव लॉय क्रथॉंग (Loy Krathong) असे आहे. या दिवशी केळीच्या पानांपासून दिवे बनवले जातात. रात्रीच्या वेळी हे दिवे पेटवून पैशांसह दिवे आणि अगरबत्ती नदीत सोडले जातात.

श्रीलंका

इतर राज्यांप्रमाणेच श्रीलंकेमध्ये दिवाळीत लोकं आपापल्या घरी मातीचे दिवे, लाईटस लावून घर सजवतात. श्रीलंकेत तमिळ समाजातील लोक जास्त राहत असल्याने तिथे ‘दीपावली’ साजरी केली जाते. पहाटे लवकर उठून तेल लावून स्नान करून नवीन कपडे घालून देवतांची ‘पोसई’ म्हणजेच पूजा करतात.

सिंगापूर

सिंगापूरमध्ये दिवाळीला सरकारी सुट्टी असते. यावेळी दिवाळी निमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. सिंगापूरमधील हिंदू धर्मीय सौर कॅलेंडरच्या सातव्या महिन्यात दिवाळी साजरी करतात. हिंदू धर्माचे लोक या दिवशी मंदिरात जाऊन उत्सव साजरा करतात.

फिजी

फिजीमध्ये दिवाळी हा एक मोठा सण आहे. इथं मोठ्या संख्येने हिंदू लोक असल्याने दिवाळी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. फक्त हिंदूच नाही तर इतर धर्माचे लोकही या उत्सवात सहभागी होतात. फिजीमध्ये दिवाळीला सार्वजनिक सुट्टी असते आणि शाळांमध्ये गाणी, निबंध, क्विझ आणि रांगोळी यांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. हिंदी, इंग्रजी आणि फिजियन या भाषांमध्ये चर्चासत्रेही होतात. अनेक शाळांमध्ये पारंपरिक लक्ष्मी पूजाही केली जाते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली
Vedh Shivkalacha : दुर्गबांधणीचे शास्त्र आपल्या देशाला फार प्राचीन काळापासून माहिती होतं. दुर्गाचे विविध प्रकार कोणते? याचा शिवकाळात देखील बारकाईने

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ