बँकॉकच्या किनाऱ्यावर फडकला महाकुंभ 2025चा झेंडा!

Mahakumbh 2025 : अनामिका शर्मा या पेशाने स्कायडायव्हर असलेल्या उत्तरप्रदेशमधल्या तरुणीने बँकॉकच्या किनाऱ्यावर 13 हजार फूटावर 'महाकुंभ 2025' चा झेंडा फडकवला आहे.

जगभरात महाकुंभ मेळावा हा चर्चेचा विषय झाला आहे. हा महाकुंभ मेळावा प्रत्यक्षात पाहण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक प्रयागराज इथे दाखल झाले आहेत. अधिकाधिक परदेशी पर्यटकांना या धार्मिक उत्सवाची माहिती मिळावी आणि अनेक भाविकांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे यासाठी उत्तर प्रदेश पर्यटन विभाग प्रयत्नशील आहे. 

आपल्या धार्मिक संस्कृतीचा अभिमान बाळगत 144 वर्षांनी साजरा होणाऱ्या या महाकुंभ मेळाव्याची माहिती देणारा झेंडा चक्क बँकाकच्या किनाऱ्यावर फडकला आहे. 

https://www.instagram.com/reel/DErScKsvJEn/?utm_source=ig_web_copy_link

महाकुंभ 2025 चा झेंडा

अनामिका शर्मा ही मूळची उत्तरप्रदेशची तरुणी आहे. ती पेशाने स्काय डायव्हर आहे.  अनामिकाने आपल्या या स्काय डायव्हिंगच्या माध्यमातून महाकुंभ मेळाव्याची प्रसिद्धी करण्यासाठी, परदेशातील लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी बँकाकच्या किनाऱ्यावर 13 हजार फूट उंचीवरून महाकुंभ मेळावा 2025 असा झेंडा फडकवला. 

अनामिका शर्मा हिने हा साहसी व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होण्यापूर्वी 8 जानेवारीला तिने हे स्काय डायव्हिंग केलं आहे. यामध्ये ती एका विमानातून उडी मारते आणि तिच्याजवळ असलेला महाकुंभ मेळावा 2025 असा झेंडा हवेत फडकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने त्यावर इंग्रजी भाषेमध्ये जगभरातल्या लोकांना जगातल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात जास्त लोकांचा सहभाग असलेल्या महाकुंभ 2025 च्या मेळाव्यामध्ये सहभागी होण्याचं आमंत्रण देत आहे. 

हे ही वाचा : महाकुंभमेळ्यात डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षा आणि सोयीसाठी नवे उपाय

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

अनामिकाने महाकुंभ मेळाव्यासाठी केलेल्या या विशेष साहसाबद्दल सोशल मीडियावर अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. तिचा हा व्हिडीयो 8 लाख 61 हजार 52 जणांनी इन्टाग्रामवर पाहिला आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवत तिचं अभिनंदन केलं आहे. 

एका युजरने म्हटलं आहे की, धर्मासाठी, आणि धार्मिक उत्सवासाठी असं साहस करणाऱ्या प्रयागराजच्या कन्येचा आम्हाला अभिमान आहे.

अनामिकाकडून अनेक युवकांनी प्रेरणा घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रियाही तिच्या या व्हिडीओवर आली आहे. 

तर अनेकांनी तिचं अभिनंदन करत तिचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Mahakumbh 2025 : नासाचे अंतराळवीर डॉन पेटिट यांनी अंतराळातून प्रयागराजचा फोटो घेतला आहे. जगातल्या सगळ्यात मोठ्या जनसमुदयांचा सहभाग असलेला हा
Mahakumbh 2025 Stampede : बुधवारी 29 जानेवारीच्या पहाटे प्रयाग संगमावर मौनी अमावस्येनिमित्त भाविकांच्या प्रचंड संख्येमुळं चेंगराचेंगरी झाली. यात 17 जणांचा
Mahakumbh 2025 : महाकुंभ या धार्मिक मेळाव्यासाठी जगभरातून कोट्यावधी लोक प्रयागराजला एकत्र येत आहेत. या मेळाव्यासाठी विमानातून येणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश