वर्ल्ड टूरिझम ट्रेड मध्ये झळकणार ‘महाकुंभ 2025’

Mahakumbh 2025 : महाकुंभ मेळाव्याच्या धार्मिक उत्सवाची ख्याती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार वर्ल्ड टूरिझम ट्रेडमध्ये महाकुंभ मेळाव्याचं प्रदर्शन करणार आहेत.
[gspeech type=button]

उत्तरप्रदेशमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभ मेळाव्याला सुरुवात होत आहे. या महाकुंभ मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. महाकुंभ मेळाव्याच्या धार्मिक उत्सवाची ख्याती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी उत्तरप्रदेश सरकार वर्ल्ड टूरिझम ट्रेडमध्ये महाकुंभ मेळाव्याचं प्रदर्शन करणार आहेत.

धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतीक उत्सव

महाकुंभ मेळावा हा आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा अनोखा उत्सव असतो. या महाकुंभ मेळाव्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या धार्मिक उत्सवातून देशाच्या ऐतिहासिक परंपरंचं आणि संस्कृतीचं दर्शन घडतं. या महाकुंभ मेळाव्यासाठी जगभरातून बांधव येत असतात. या मेळाव्याचं आयोजन, संरक्षण आणि स्वच्छतेसाठी वापरल्या जाणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञान हे सारं अभ्यासाचा विषय आहे. 

त्यामुळे या मेळाव्याबद्दलची माहिती वर्ल्ड टूरिझम ट्रेडच्या माध्यमातून जगासमोर ठेवून पर्यटकांना आकर्षित केलं जाणार आहे. 

हे ही वाचा : प्रयागराजमधील महाकुंभ मेळाव्याच्या स्वच्छतेसाठी इस्त्रो आणि BARC संस्थाही सज्ज!

स्पेन आणि जर्मनीमध्ये ‘महाकुंभ 2025’ चा मंडप

महाकुंभविषयी परदेशी पर्यटकांना माहिती व्हावी, यासाठी यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड टूरिझम ट्रेडमध्ये ‘महाकुंभ 2025’ चा भव्य देखावा उभा केला जाणार आहे. 

स्पेनमधल्या माद्रीद इथे 24 ते 28 जानेवारी दरम्यान वर्ल्ड टूरिझम ट्रेडचं आयोजन केलं आहे. तर जर्मनीतल्या बर्लिनमध्ये 4 ते 6 मार्च या दरम्यान  वर्ल्ड टूरिझम ट्रेड असणार आहे. या दोन्ही टुरिझम ट्रेडमध्ये उत्तरप्रदेश पर्यटन खात्याकडून महाकुंभ मेळावा आणि उत्तर प्रदेशमधील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती दाखवणारा मंडप उभा केला जाणार आहे. हा मंडप जवळपास 40 चौरस किमीचा असणार आहे.  या दोन्ही टुरिझम ट्रेडमध्ये व्हीव्हीआयपी पाहुण्यांसाठी विशेष व्यवस्था उभी केली जाणार आहे. तसेच उत्तरप्रदेश पर्यटनाच्या वाढीसाठी बीटूबी आणि बीटूसी म्हणजे पर्यटक कंपन्या आणि  पर्यटकांशी संवाद साधण्यासाठी विविध सत्रांचं आयोजन केलं जाणार आहे. तसेच विविध भाषांमध्ये उत्तरप्रदेश पर्यटनासंदर्भात माहिती देणारी माहिती पुस्तका तयार केली जाणार आहे. 

हे ही वाचा : 183 देशांतील 33 लाखांहून अधिक लोकांनी महाकुंभच्या अधिकृत वेबसाइटला दिली भेट

‘ब्रँड यूपी’

पर्यटन क्षेत्रामध्ये उत्तरप्रदेश राज्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी ‘ब्रँड यूपी’ मोहीम राबवली जात आहे. या अंतर्गत बौद्ध आणि सनातन भूमी या विषयावर लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राला अनुसरुन जागतिक पातळीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

वारंवर चालणारी क्रीया म्हणजे वारी. या वारीला हजारो वर्षांची परंपरा आहे. साक्षात भगवान शंकर हे पहिले वारकरी मानले जातात. पण
Pandharpur Wari : वर्षातून चारदा होणाऱ्या वाऱ्या हे पंढरपुरचे वैशिष्ट्य. शिवाय महिन्याच्या एकादशीला येणारे भाविक वेगळेच. वर्षभराचा विचार केला तर
Vedh Shivkalacha : काही दिवसांपूर्वी आपण पाहिले की भारताने सिंधु करार स्थगित केला आहे आणि पाकिस्तानची वेगळ्या प्रकारे नाकाबंदी केली

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ