रजोनिवृत्तीनंतरचा काळ 

Navratri Diet Plan : रजोनिवृत्ती झाली म्हणजे सगळं झालं, आता कसली काळजी असं नसतं. त्यामुळंच आपण स्त्रियांचा रजोनिवृत्तीनंतरचा काळ आणि म्हातारपणी घ्यायची काळजी ह्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत.

स्त्रियांच्या वयोगटाच्या प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या पद्धतीनं कशी काळजी घ्यायची, हे आपण पाहिलं. रजोनिवृत्ती झाली म्हणजे सगळं झालं, आता कसली काळजी असं नसतं. त्यामुळंच  आपण स्त्रियांचा रजोनिवृत्तीनंतरचा काळ आणि म्हातारपणी घ्यायची काळजी ह्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. 

ज्या स्त्रीला 1 वर्ष सलग मासिक पाळी आलेली नाही, तिची रजोनिवृत्ती झालेली आहे, असे म्हणता येते. या वेळेस शरीरातील इस्ट्रोजेन या हॉर्मोनचं स्रवणे जवळ जवळ बंद होते आणि अर्थातच अंडाशयातून नवीन बीज निर्माण व्हायचं थांबते. यामुळे perimenopause, म्हणजे रजोनिवृत्तीच्या पूर्वकाळात होणारे त्रास जसं की अशक्तपणा येणे, अति रक्तस्राव होणे इत्यादी कमी होतात. मात्र इस्ट्रोजेनच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या वयामुळे स्त्रियांना पुढील समस्यांना सामोरं जावं लागतं.

  • हाडांचे विकार 
  • शरीरातील स्नायूंचे प्रमाण कमी होऊन चरबीचे प्रमाण वाढणं
  • त्वचा, तोंडाचा आतील भाग, डोक्यावरील त्वचा, योनीमार्गामध्ये कोरडेपणा येणं 
  • हृदयविकार, उच्च रक्तदाब 
  • पचनाशी संबंधित तक्रारी- अपचन,ऍसिडिटी, गॅसेस 
  • चव न लागणे 
  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे 
  • नैराश्य, एकटेपणा जाणवणं

या काळामध्ये आहाराच्या सवयींमध्ये आणि जीवनशैलीशी निगडित काही बदल केल्यास हा काळ स्त्रियांसाठी अधिक सुकर होऊ शकेल. 

कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी 

रजोनिवृत्तीनंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण वेगाने कमी होते. त्यामुळे हाडांची घनता कमी होऊन, हाडे ठिसूळ होतात आणि सारखं फ्रॅक्चर होणं, सांधे दुखणं, मणक्याचे विकार याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आहारात गायीचं दूध, दही, ताक, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, तीळ, सुकामेवा यांचं प्रमाण व्यवस्थित ठेवावं. हाडांमध्ये कॅल्शिअम शोषले जाण्यासाठी व्हिटॅमिन डी या जीवनसत्वाची आवश्यकता असते. सकाळच्या कोवळ्या उन्हात चालायला जाणं, योगासने करणं इत्यादी केल्यास व्हिटॅमिन डी मिळण्यासही मदत होते. याशिवाय 45 वर्षानंतरच्या प्रत्येक स्त्रीने कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी च्या चाचण्या वर्षातून एकदा तरी  कराव्या. कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास वेळीच डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट घेणं आवश्यक आहे. 

शरीरातील चरबीचे वाढते प्रमाण 

45-50 वर्षे वयानंतर स्त्रियांच्या शरीरात स्नायूंचं प्रमाण कमी होऊन चरबीचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढते आणि शक्ती (ताकद) कमी होऊ लागते. यासाठी आहारात कर्बोदके म्हणजे भात, पोळी, भाकरी, ब्रेड, नूडल्स आणि गोड पदार्थाचं अतिरिक्त सेवन करू नये. कारण शरीराच्या गरजेपेक्षा अधिक कर्बोदके खाल्ल्यास त्याचे रूपांतर चरबीमध्ये होऊन ती स्त्रियांच्या पोटावर, मांड्यांवर वगैरे साठून राहते. यासाठी रोजच्या आहारात कर्बोदकांबरोबर भरपूर भाज्या आणि प्रथिने ह्यांचा समावेश केल्यास चरबी बनण्याचं प्रमाण आटोक्यात यायला मदत होते.

हृदयाचे आरोग्य 

वयाच्या 40 -45 नंतर बऱ्याच स्त्रियांच्या शरिरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोका संभवतो. त्यासाठी महत्वाचं म्हणजे बेकरीचे पदार्थ, पुन्हा पुन्हा त्याच तेलात तळलेले वडे, भजी, सामोसे यासारखे बाहेरचे पदार्थ, अति तेल वापरलेली लोणची इत्यादींचे सेवन टाळावे. खूपच इच्छा झाल्यास हे पदार्थ  घरी करून खाण्यास हरकत नाही. आहारात ओमेगा-3-फॅटी ऍसिड असणारे  पदार्थ जसे की बदाम, अक्रोड, जवस/अळशी, मासे इत्यादींचा समावेश आवर्जून करावा.  याशिवाय नियमित चालणं, योगासने, प्राणायाम करणे यामुळेही हृदयाचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते. 

पचनाशी निगडित आजार 

जसं वय वाढतं तशी पचनशक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे अति मसालेदार, तळलेल्या पदार्थांचे नियमित सेवन होत असल्यास ते कमी करावं. सर्वात महत्वाचं म्हणजे पचनाशी संबंधित आजार टाळण्यासाठी रात्रीचं जेवण संध्याकाळी 6 ते 7 च्या सुमारास म्हणजे  जितकं शक्य आहे, तितकं लवकर करावं. याशिवाय भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे. त्यामुळे त्वचा कोरडी पडणं, कफ, ऍसिडिटी अशा आजारांचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.  

मानसिक आरोग्य 

या दरम्यान बऱ्याच स्त्रियांची मुलं शिक्षणानिमित्त किंवा कामानिमित्त बाहेरगावी जातात. आई वडिलांचा सहवास अंतरतो आणि त्यात रजोनिवृत्तीमुळे आपले शारीरिक त्रास वाढतात. यामुळे अचानक एकटेपणा जाणवतो परिणामी नैराश्य येतं. यावर उपाय म्हणून, स्त्रियांनी आपल्या समवयस्क मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर भेटीगाठी करत संवाद साधावा, त्यांच्याबरोबर शक्य असेल तेव्हा फिरायला, सहलीला जावं.  त्याचबरोबर काहितरी नविन शिकत राहत,आपल्याला आवड असलेल्या गोष्टींचा ऑनलाइन कोर्स उपलब्ध असेल तर तो करावा. छंद जोपासत, स्वतःच्या आरोग्याला जपावं. यासोबतच नामस्मरण आणि नियमित ध्यान केल्याने सुद्धा हा रजोनिवृत्तीचा प्रवास अधिक समाधान आणि सुखकारक होऊ शकेल.

5 Comments

  • Snehal Tillu

    Thank you Anuja Right information at Right Time. It will help me. Once again thank you

  • Sharmila

    अतिशय उपयुक्त माहिती 👍🏼

  • माधुरी थळकर

    अनुजा महत्वाचा आणि सर्व महिलांच्या आरोग्याशी निगडित विषय सोप्या पद्धतीने मांडला

  • Revati

    सविस्तर मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद…
    मानसिक आरोग्य साठी बरेच चांगले पर्याय लेखात सुचवले आहेत .

    • प्रीती बक्षी

      अनुजा योग्य वेळी अतिशय आवश्यक आशी माहिती मिळाली नक्कीच ह्याचा सगळ्या स्त्रियांना नक्कीच उपयोग होईल thanks 👌👌👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

5 Responses

  1. सविस्तर मार्गदर्शन मिळाले. खूप खूप धन्यवाद…
    मानसिक आरोग्य साठी बरेच चांगले पर्याय लेखात सुचवले आहेत .

    1. अनुजा योग्य वेळी अतिशय आवश्यक आशी माहिती मिळाली नक्कीच ह्याचा सगळ्या स्त्रियांना नक्कीच उपयोग होईल thanks 👌👌👍

  2. अनुजा महत्वाचा आणि सर्व महिलांच्या आरोग्याशी निगडित विषय सोप्या पद्धतीने मांडला

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Perfumes : अत्तर म्हणजे तर हवाहवासा सुगंध. देवघरात दरवळणारा चंदनाच्या अत्तराचा गंध असो, किंवा आजी-आईच्या रेशमी साड्यांना येणारा जुन्या खस/हीना/केवड्याच्या
Diwali Magazines - दिवाळी म्हणजे सगळ्या भारतात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण. हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये
Poetry : कविता वाचनाने सौंदर्यदृष्टी विकसित होते. कवितेतून आपण आपल्या सभोवतालचे सौंदर्य अनुभवू शकतो. कविता वाचल्याने समजून घेण्याची आणि विश्लेषण

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली :  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निगम बोध घाट येथे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली