गडचिरोलीतील ‘आनंदाची बस’

Gadchiroli ST Bus : महाराष्ट्र सरकारची गावागावातून धावणारी ‘लाल परी’ ही गडचिरोलीसाठी ‘आनंदाची बस’ झाली आहे. गडचिरोलीमधल्या ज्या गावात दळण-वळणाची सुविधा नव्हती अशा गावांमध्ये अखेर राज्य सरकारची एसटी बससेवा सुरु झाली आहे.
उद्योगधंद्याबरोबर ‘धान’ उत्पादनातही गडचिरोली ठरतेय अग्रेसर!

बदलतं गडचिरोली : गडचिरोली नक्षलवादी भाग ते उद्योगधंदे अशी ओळख बदलत आहे. मात्र, यात गडचिरोलीची कायम राहिलेली ओळख आहे ती म्हणते धान उत्पादक जिल्हा. गडचिरोलीमध्ये 25% शेतजमीन आहे. तरी धान उत्पादनामध्ये हा जिल्हा अग्रेसर आहे.
गडचिरोलीची नवी ओळख ‘उद्योगनगरी’

बदलतं गडचिरोली : गडचिरोलीमध्ये सध्या सुरक्षेबरोबरच विकासावरही जोर दिला जातोय. ज्यामध्ये रस्ते, पाणी, लाईट यासारख्या सुविधा देण्याच्या कामाबरोबरच या जिल्ह्यात मोठे उद्योग धंदे सुरू केले जाऊ लागलेत. मागील काही वर्षांमध्ये या जिल्ह्यांत अनेक वेगवेगळे बदल घडताना दिसून येऊ लागलेत.
नक्षलवाद्यांच्या हरयाणवी कॅडरचं आत्मसमर्पण

बदलतं गडचिरोली : नक्षलवादी हे सर्वसाधारणपणे आदिवासी भागातले किंवा स्थानिकच असतात आपला असा समज असतो. पण आपल्याला आश्चर्य वाटेल केवळ या आदिवासी भागातलीच नाही तर पार हरयाणातली सुशिक्षित मुलं गडचिरोलीच्या नक्षल कॅडेरमध्ये सहभागी झाली होती. पण या मुलांना काही काळानं त्यांची दिशाभूल झाल्याचं लक्षात आलं. नक्षली चळवळीतून बाहेर पडलेल्या असीनची कथा..
गडचिरोली सिव्हिक एक्शन प्रोग्राम

बदलतं गडचिरोली : प्रशासकीय सेवा गडचिरोलीतल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचवण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी ‘पोलिस दादलोरा खिडकी’ सुरू केली आहे. प्रशासन आणि पोलिस एकत्र येऊन गडचिरोलीची नवी ओळख प्रस्थापित करण्यासाठी झटून काम करत आहेत. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना घर बांधायला जमीनीसोबतच सरकारकडून निधीही दिला जातो. त्यांना रोजगारही दिला जातो.
गडचिरोलीला नक्षली विळख्यातून बाहेर काढणारे सी 60 कंमाडो

बदलतं गडचिरोली : 17 जुलै 2024 रोजी एका मोठ्या एन्काउंटरनंतर संपूर्ण उत्तर गडचिरोली शून्य नक्षल विभाग करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आल्याची माहिती गडचिरोली पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी ‘श्रेष्ठ महाराष्ट्र’ला दिली.