कमला हॅरिसच्या प्रचार कार्यालयावर गोळीबार; तपास सुरू

( Shots fired into Kamala Harris’ campaign office ) अमेरिकेतील ॲरिझोना राज्याच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला.
[gspeech type=button]

अमेरिकेतील ॲरिझोना राज्याच्या उपाध्यक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्या प्रचार कार्यालयावर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला.

टेम्पे पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कार्यालयात रात्रीच्या वेळी कोणीही उपस्थित नसल्याने या गोळीबारात कोणतीही व्यक्ती जखमी झालेली नाही. परंतु, या घटनेने परिसरातील कामकाज करणाऱ्यांच्या सुरक्षेबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तसेच Southern Avenue आणि Priest Drive जवळील कार्यालयाच्या समोरच्या खिडक्यांचेही नुकसान झालं आहे.

तपास यंत्रणा घटनास्थळी पुरावे गोळा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने कार्यालयात आता जास्त खबरदारी घेत असल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं.

कार्यालयावर हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी, 16 सप्टेंबर रोजी, मध्यरात्रीनंतर कार्यालयाच्या खिडक्यांवर बीबी गन किंवा पेलेट गनने गोळीबार करण्यात आला होता. मात्र या दोन्ही घटनांमध्ये अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

लागोपाठच्या या घटनांमुळे सुरक्षा आणि चिंतेचा मुद्दा वाढला आहे. कारण, याआधीही माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करण्याच्या प्रयत्न झाला होता. पेनसिल्वेनियामध्ये झालेल्या एका रॅलीदरम्यान, 20 वर्षीय थॉमस मॅथ्यू क्रुक्सने गोळीबार केला होता. त्यावेळी ट्रम्प आणि इतर दोन व्यक्ती जखमी झाले होते.

गुन्ह्यांच्या या साखळीत, राजकीय कार्यकर्त्यांच्या सुरक्षतेचे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ