Pitru Paksh | देशोदेशीचे पितृपक्ष

पितृपक्षातल्या खाद्यसंस्कृती आणि परंपरा ब्राझील मधल्या कोदोम्ब्ले सारख्या पंथातही आहे. भेंडीची भाजी देवीला प्रिय आहेच. अनेक पारंपारिक पदार्थ विविध देवी देवतांना प्रिय आहेत. वर फुलांबद्दल म्हटलंय. निशिगंधाची फुलं मृत आत्म्यांना बोलावण्यासाठीच्या पुजेत वापरतात.
[gspeech type=button]

आपल्या परिवारातल्या आणि देशातल्या ज्ञात आणि अज्ञात मृत व्यक्तिंचं स्मरण आपण पितृपक्षात करतो. ह्या मृत व्यक्ती पितृपक्षात पृथ्वीवर वास्तव्यास येतात असा समज आहे. जगातल्या सर्वच देशांमध्ये वर्षातून एकदा आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याची संस्कृती आहे. पाहुयात इतर देशांमध्ये पितरांचं स्मरण कशाप्रकारे करतात.

परदेशात ही पितृपक्ष

दोन नोव्हेंबरला पेरूमध्ये सुप्रसिद्ध ‘दिया दे लाॅस म्युएर्तोज ‘ असतो. ब्राझीलमध्ये याला, ‘दिया दो फिनादोस ‘म्हणतात. पुर्वजांच्या आठवणीत या दिवशी काही धार्मिक विधी केले जातात. मेक्सिको, मध्य अमेरिका आणि ॲझटेक, मायान संस्कृतीतही या दिवसाला महत्वं आहे. खरंतर थंडीचं आगमन होतं मेक्सिकोत. या दिवशी मोनार्क फुलपाखरू आलं की समजायचं आपल्या आप्तांचा आत्मा त्याच्या रूपाने जवळ आलाय. या दिवशी चार महाभुतांचा समावेश असलेला नैवेद्य असतो. याला आपण ऑफेर्तो किंवा ऑफरेन्दा म्हणू शकतो. जल, वायू, पृथ्वी आणि आग या चारीचा समावेश असलेला प्रसाद, डेकोरेशन किंवा सजावट मस्ट.

मृतांच्या आठवणीत त्यांच्या फोटोजवळ पाण्याचं भांडं, खास साॅफ्ट पाव ज्याचं नाव ,’पान दे म्युएर्तो ‘त्याला हाडाप्रमाणे सजवायचं, कागदाची तोरणं वस्तू बनवायच्यात, पपेल पिकादो म्हणतात त्याला. हाडाचा सापळा असलेले कपडे पण मिरवतात या दिवशी. कुत्र्याच्या हाडाचे कपडे ही असतात कारण आत्म्याच्या मुक्तीसाठी स्वर्गाच्या दारी कुत्रा शेवटपर्यंतच्या प्रवासात साथ देतो.

मला इथे धर्मराज युधिष्ठीर आठवतात. जी फुलं वाहतात त्यात केशरी पिवळा  रंग असतोच कारण तो सुर्याचं प्रतिक. प्रेम आणि क्षणभंगुरता दर्शवणारं प्रतिक, मेणबत्त्या असतात जोडीला.

ब्राझीलमधली परंपरा थोडी वेगळी आहे. मागे एक लेख लिहिला होता शोधते. मेक्सिकन परंपरा थोड्या फार फरकाने दक्षिण अमेरिकेत पहायला मिळते कारण मेर्कासूर पाॅलिसी मुळे या खंडातील लोक इथल्या देशात फिरू शकतात, नोकरी करू शकतात, घर घेऊ शकतात. संपूर्ण खंड एक देश म्हणता येईल. बसने सगळे देश जोडलेले आहेत.

पितृपक्षातल्या खाद्यसंस्कृती आणि परंपरा ब्राझील मधल्या कोदोम्ब्ले सारख्या पंथातही आहे. भेंडीची भाजी देवीला प्रिय आहेच. अनेक पारंपारिक पदार्थ विविध देवी देवतांना प्रिय आहेत. वर फुलांबद्दल म्हटलंय. निशिगंधाची फुलं मृत आत्म्यांना बोलावण्यासाठीच्या पुजेत वापरतात. 


मेक्सिकोमध्ये १ आणि २ नोव्हेंबरला  डे ऑफ द डेड साजरा करण्यात येतो. हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतात.  आपल्या आप्तांच्या आत्मांच्या स्वागताकरता मेक्सिकोच्या विविध भागात वेगवेगळ्या परंपरा आहेत. काही ठिकाणी ग्रेव्ह यार्डमधल्या थडग्यांना फुलांनी सजवतात. तिथं त्या व्यक्तीच्या आवडीचे पदार्थ मांडून ठेवतात. 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ