पुतिन यांनी अलास्का शिखर परिषदेत ट्रम्प आणि जगाला सांगितल्या या पाच गोष्टी!

अमेरिका-रशिया चर्चा अनिर्णीत संपली असताना, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पत्रकारांना संबोधित करताना जगाला अनेक संदेश दिले. रशियन नेत्याला हवा असणारा अमेरिकन मंच मिळाल्याने, शुक्रवारी अलास्कामध्ये झालेल्या या चर्चेला आधीपासूनच पुतिन यांच्यासाठी ‘विजय’ म्हणून पाहिले जात होते.
[gspeech type=button]

अलास्कामध्ये चर्चेपूर्वी, पुतिन यांनी पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. युक्रेनियन नागरिकांच्या हत्येच्या आरोपांव्यतिरिक्त युद्धबंदीची आवश्यकता, यासंबंधीच्या असंख्य प्रश्नांना पुतिन यांना तोंड द्यावे लागले. परंतु त्यांनी संयम राखला आणि चेहऱ्यावर फक्त एक राजनैतिक हास्य ठेवले. ट्रम्प आणि पुतिन यांनी अडीच तास एकमेकांशी संवाद साधल्यानंतर, दोन्ही नेते पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर आले. तथापि, ट्रम्प आणि पुतिन यांनी चर्चेवर थोडक्यात भाष्य केले. कोणतेही प्रश्न विचारले नाहीत, त्यामुळं अमेरिकन पत्रकार अधिक उत्तरांसाठी धावत राहिले. पुतिन हे व्यासपीठावर येणारे पहिले व्यक्ती होते, त्यांनी दोन्ही नेत्यांमध्ये काही बाबींमध्ये “सहमती” असल्याचे अधोरेखित केले. यावेळी पुतिन यांनी प्रथम माईकचा ताबा घेतला. नेहमीपेक्षा हे जरा आश्चर्याचं होतं. कारण, सहसा अमेरिकन अध्यक्ष इतर राष्ट्रप्रमुखांचं स्वागत करतात तेव्हा, संयुक्त पत्रकार परिषद ही अमेरिकन अध्यक्षांच्याच भाषणाने सुरू होते.  आणि त्यानंतर त्यांचे पाहुणे व्यासपीठावर येतात. पण, यावेळी, ट्रम्प यांच्या समोरच पुतिन यांनी पत्रकार परिषद सुरू केली आणि ट्रम्प पाहतच राहिले.

 

पुतिन यांनी त्यांच्या भाषणातून ट्रम्प, अमेरिका आणि उर्वरित जगाला पुढील पाच गोष्टी सांगितल्या –

 

1) ‘प्रिय शेजारी’: अलास्काच्या भूगोल आणि सामायिक इतिहासावर पुतिन यांचा भर

पुतिन यांनी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांना “प्रिय शेजारी” असं संबोधून अभिवादन केलं. या संबोधनामुळं याद्वारे, रशियन अध्यक्षांनी बेरिंग सामुद्रधुनी ओलांडून रशिया आणि अमेरिकेची भौगोलिक जवळीक अधोरेखित केली. पुतिन यांनी दोन्ही राष्ट्रांमधील ऐतिहासिक संबंध प्रस्थापित करण्यातही यश मिळवले, कारण जिथे ही बैठक झाली ते अलास्का, रशियाने अमेरिकेला विकलं होतं. “अमेरिका आणि रशिया हे जवळचे शेजारी आहेत, फक्त काही किलोमीटरचं दूर आहेत, म्हणून अलास्कामध्ये शिखर परिषद होणे अर्थपूर्ण होते,” असे पुतिन सुरुवातीला म्हणाले.

2) ‘चला पान उलटूया’: पश्चिमेकडील रशियाचा एकटेपणा संपवण्याचे उद्दिष्ट

पुतिन यांनी त्यांच्या भाषणात म्हटले की, रशिया आणि अमेरिकेने “पान उलटून सहकार्याकडे परत जावे”. युद्धाचा उल्लेख करण्याऐवजी, पुतिन यांनी अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्यावर अधिक भर दिला. गंमतीची गोष्ट म्हणजे, माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या कारकिर्दीत पुतिन यांचा असाच दृष्टिकोन होता. 2008 च्या जॉर्जिया युद्धामुळे अमेरिका-रशिया संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता. पुतिन यांच्या शुक्रवारच्या विधानातून असेही दिसून आले की, शुक्रवारच्या चर्चा केवळ रशिया-युक्रेन युद्धाबद्दलच नव्हत्या.

3) राष्ट्रीय हितसंबंधांबद्दल परस्पर आदर व्यक्त केल्याबद्दल ट्रम्प यांचे कौतुक

पुतिन यांच्या वक्तव्यातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे “मी अध्यक्ष असतो तर रशिया-युक्रेन युद्ध झाले नसते”, या ट्रम्प यांच्या  विधानाला पुतिन यांनी दुजोरा दिला. “ट्रम्प यांना काय साध्य करायचे आहे याची स्पष्ट कल्पना आहे आणि ते त्यांच्या देशाच्या समृद्धीची प्रामाणिकपणे काळजी घेतात आणि त्याच वेळी रशियाचे स्वतःचे राष्ट्रीय हितसंबंध आहेत हे समजून घेतात,” असेही पुतिन म्हणाले. तीव्र मतभेद असतानाही, या विधानाने परस्पर आदरावर आधारित संभाषणाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला. पुतिन यांनी संवादाच्या “मैत्रीपूर्ण” स्वरासाठी ट्रम्प यांचे आभार मानले आणि दोन्ही शक्तींमधील “व्यवसायिक, व्यावहारिक संबंध पुन्हा सुरू करण्याची” आशा व्यक्त केली.

4) शांततेसाठी पूर्वअटी निश्चित केल्या – युक्रेनवर दबाव आणून युरोपला इशारा

पुतिन यांनी त्यांच्या संक्षिप्त भाषणात रशिया आणि युक्रेनमधील कोणत्याही प्रकारच्या शांतता करारासाठी पूर्वअटी देखील मांडल्या. पुतिन यांनी मॉस्कोच्या दीर्घकालीन भूमिकेचा पुनरुच्चार केला: “संकटाची सर्व मूळ कारणे दूर केली पाहिजेत. रशियाच्या सर्व वैध चिंता विचारात घेतल्या पाहिजेत आणि युरोप आणि संपूर्ण जगात सुरक्षा क्षेत्रात योग्य संतुलन पुन्हा मिळवलं पाहिजे.” त्यांनी युरोप आणि युक्रेनला इशारा दिला की, अमेरिकेचे अध्यक्ष युक्रेनच्या प्रमुख सहयोगींपैकी एकाच्या शेजारी उभे राहिले. “आम्हाला आशा आहे की युक्रेनची राजधानी कीव आणि युरोपीय राजधान्या हे सर्व रचनात्मकपणे समजून घेतील. चिथावणी देऊन किंवा पडद्यामागील कारस्थानांद्वारे पुढील प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करणार नाहीत. आणि व्यत्यय आणण्याचाही प्रयत्न करणार नाहीत.” “मला आशा आहे की आमच्यातील समजदारीमुळे आम्हाला त्या ध्येयाच्या जवळ जाण्यास आणि युक्रेनमध्ये शांततेचा मार्ग मोकळा करण्यास मदत होईल,” असंही पुतिन पुढे म्हणाले.

5) ‘पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये’

ट्रम्प पत्रकार परिषदेचा समारोप करत असताना, पुतिन यांनी इंग्रजीत “पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये” असे सुचवले. म्हणजे त्यांनी संवाद सुरू ठेवण्यासाठी दार उघडे ठेवले आहे. पण, या कथेत बरेच काही आहे. बैठकीपूर्वी आणि नंतरही, ट्रम्प यांनी नमूद केले की त्यांची पुढची योजना त्यांच्या, पुतिन आणि युक्रेनचे अध्यक्ष व्हालदिमिर झेलेन्स्की यांच्यात त्रिपक्षीय शिखर परिषद आयोजित करण्याची आहे. जर पुढची बैठक मॉस्कोमध्ये होणार असेल, तर अशा बैठकीला सहमती दिल्याबद्दल ट्रम्प यांच्यावर केवळ टीकाच होणार नाही, तर सुरक्षेच्या कारणास्तव झेलेन्स्की रशियाला भेट देण्याची शक्यताही कमी आहे. तसेच, पुढच्या वेळी मॉस्कोमध्ये भेटण्याचा इरादा व्यक्त करून, पुतिन रशियाशिवाय इतरत्र बैठक घेण्यास अनिच्छा दर्शवत आहेत असे मानले जाऊ शकते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ