कृत्रिम कॉर्नियाच्या सहाय्याने 10 वर्षांनंतर दृष्टी परत ! 

CorNeat KPro : इस्त्राईलमधील "कॉर्निट व्हिजन" या स्टार्टअप कंपनीने तयार केलेली कृत्रिम कॉर्निया (CorNeat KPro) एका 78 वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यात यशस्वीरित्या बसवली आहे.
[gspeech type=button]

इस्त्राईलमधील “कॉर्निट व्हिजन” या स्टार्टअप कंपनीने तयार केलेली कृत्रिम कॉर्निया (CorNeat KPro) एका 78 वर्षीय व्यक्तीच्या डोळ्यात यशस्वीरित्या बसवली आहे. या व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी आपली दृष्टी गमावली होती आणि आता या व्यक्तीच्या डोळ्यात कोरनीट KPro डिव्हाइस लावल्यानंतर त्याला पुन्हा दिसू लागलं आहे.

जगातील सर्वात पहिली कृत्रिम कॉर्निया प्रत्यारोपणाची प्रक्रिया ही या व्यक्तीवर करण्यात आली आहे. कॉर्निट व्हिजन कंपनीने सांगितले की, हे इम्प्लांट धूसर, जखमी किंवा विकृत कॉर्नियाची रिप्लेसमेंट घेते आणि डोळ्याच्या भित्तेशी एकत्रित होऊन ती स्थिर होते. ही शस्त्रक्रिया इरित बहार यांनी केली आहे. त्या पेटा तिक्वा येथील रॅबिन मेडिकल सेंटरमध्ये नेत्ररोग विभागाच्या प्रमुख आहेत.

त्यांनी सांगितले की, “शस्त्रक्रिया अगदी साधी होती आणि परिणाम आमच्या सर्वांच्या अपेक्षांपेक्षा जास्त चांगले आले. तसेच सर्जरीनंतर रुग्णाच्या डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबीयांना ओळखता आले आणि पुस्तकातील मजकूरही वाचता आला.

कृत्रिम कॉर्नियाची वैशिष्ट्ये

CorNeat KPro इम्प्लांटचे डिझाईन अशा प्रकारे केले आहे की, ते अंध रुग्णांची दृष्टी प्रत्यारोपणानंतर लगेच परत मिळवून देऊ शकते. हे इम्प्लांट डोळ्यामध्ये सहजपणे बसवले जाते. त्यामुळे, तुम्हाला आता आय डोनरवर अवलंबून रहाण्याची गरज पडणार नाही . कोरनीट व्हिजनचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी, डॉ. गिलाड लिट्विन म्हणाले की, ही शस्त्रक्रिया “साधारणपणे सोपी आहे आणि ती एका तासाच्या आत पूर्ण केली जाऊ शकते.

ऑगस्ट 2019 मध्ये, इस्त्राईलच्या आरोग्य मंत्रालयाने कोरनीट इम्प्लांटच्या चाचण्या कॉर्निया अंधत्व असलेल्या दहा रुग्णांवर करण्यास मंजुरी दिली होती.

कोरनीट व्हिजनचे सह-संस्थापक आल्मोग अले-रझ यांनी एका निवेदनात सांगितले की “आमच्या उपकरणाची दृष्टी कार्यक्षमता, अपेक्षित उपचार वेळ आणि त्यात रोग पसरवण्याची क्षमता नसल्यामुळे आम्ही या वर्षाच्या अखेरीस दुसरी चाचणी सुरू करण्याची योजना करत आहोत. या चाचणीमध्ये आम्ही आमच्या कृत्रिम कॉर्नियाला मुख्य उपचार म्हणून मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न करू.”

भारतातील कॉर्निया अंधत्व

कॉर्नियाचे आजार हे अंधत्वाचे मुख्य कारण मानले जातात. 2011 मध्ये भारताच्या राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम (NPCB) ने अंदाज व्यक्त केला होता की, भारतात किमान 1,20,000 कॉर्निया अंध रुग्ण आहेत. तसेच, दरवर्षी 25,000 ते 30,000 नवीन कॉर्निया अंधत्वाचे रुग्ण भारतात वाढत आहेत.

ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध झाल्यास इथल्या रुग्णांना मोठी मदत होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Google Gemini Advanced : गुगलने आपल्या AI चॅटबॉट Gemini साठी ‘AI Premium Plan’ हे खास सब्सक्रिप्शन आणलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी
Australian universities restrictions : ऑस्ट्रेलियामधील काही विद्यापीठांनी भारतातल्या काही राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर निर्बंध घातले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,
Meta's AI technology : सोशल मीडियावरील लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेता मेटा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाच्या मालकीचे सोशल

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ