ॲपल कंपनीने तयार केलं स्वतःच ‘मोडेम चिप’

Apple modem chip : आतापर्यंत ॲपल कंपनी 'क्वालकॉम' नावाच्या दुसऱ्या कंपनीचा 'मोडेम चिप' वापरत होती. पण आता ॲपलने स्वतःच चिप बनवल्यामुळे, त्यांना 'क्वालकॉम' वर अवलंबून राहावं लागणार नाही.
[gspeech type=button]

आतापर्यंत ॲपल कंपनी ‘क्वालकॉम’ नावाच्या दुसऱ्या कंपनीचा ‘मोडेम चिप’ वापरत होती. पण आता ॲपलने स्वतःच चिप बनवल्यामुळे, त्यांना ‘क्वालकॉम’ ( Qualcomm ) वर अवलंबून राहावं लागणार नाही.

या नव्या ‘मोडेम चिप’चा वापर ॲपलच्या नवीन ‘iphone 16e’ मध्ये केला जाणार आहे. तसंच, ॲपल कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं की, या ‘चिप्स’ पुढील काही वर्षांत ॲपलच्या सगळ्या उत्पादनांमध्ये वापरल्या जातील. पण ते कधीपासून वापरल्या जातील, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. पण यामुळे ॲपलचे फोन आता इतर अँड्रॉइड फोनपेक्षा वेगळे असतील. कारण अँड्रॉइड फोनमध्ये ‘क्वालकॉम’चे चिप्स वापरले जातात.

नवीन ‘C1 सबसिस्टम’

ॲपलने बनवलेल्या नवीन ‘चिप्स’ ना ते ‘C1 सबसिस्टम’ म्हणतात. ‘सबसिस्टम’ म्हणजे प्रोसेसर आणि मेमरी यांसारखे महत्त्वाचे भाग एकत्र असलेले एक युनिट.

iPhone 16e मध्ये ‘A18’ प्रोसेसर चिप आहे, जी iphone 16 च्या इतर फोनमध्येही आहे. तसंच, ‘C1 सबसिस्टम’मुळे iphone 16e ची बॅटरी लाईफ 6.1-इंचच्या इतर कोणत्याही ॲपल फोनपेक्षा अधिक टिकाऊ आहे आणि त्यात नवीन ‘AI’ फिचर्सही आहेत.

मोडेम चिप

मोडेम चिप बनवणे खूप कठीण आहे. कारण ती अनेक देशांतील विविध मोबाईल नेटवर्कवर काम करण्यास सक्षम असावी लागते. आणि जगात फक्त मोजक्याच कंपन्या आहेत, ज्यांनी हे ‘मोडेम चिप’ यशस्वीपणे बनवले आहेत.

अनेक वर्षांपासून ॲपल कंपनी ‘क्वालकॉम’ कडून ‘मोडेम चिप्स’ घेत होते. ‘क्वालकॉम’ ही जगातली सर्वात मोठी चिप्स बनवणारी कंपनी आहे. आणि हे चिप्स अँड्रॉइड फोन आणि विंडोज लॅपटॉपमध्येही वापरले जातात. त्यामुळे इतर कंपनी ॲपलच्या उत्पादनांशी स्पर्धा करत असतात.

याआधी ॲपल आणि क्वालकॉम कंपनीमध्ये खूप मोठे कायदेशीर वाद झाले होते, पण 2019 मध्ये त्यांनी समझोता केला आणि ॲपलने त्यांच्याकडून ‘चिप्स’ घेण्याचा नवीन करार केला. कारण ‘इंटेल’ सारख्या दुसऱ्या कंपन्या ॲपलला चांगला पर्याय देऊ शकल्या नाहीत.

पण आता ॲपल कंपनीला विश्वास आहे की त्यांनी एक चांगला ‘चिप’ बनवला आहे. यामुळे, भविष्यात ॲपलच्या उत्पादनांमध्ये या चिप्सचा वापर वाढेल.

ग्लोबल कम्पॅटिबिलिटी

ॲपलने ‘C1’ तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे जगभरातील सर्व मोबाईल नेटवर्कवर कार्य करेल. यामध्ये 4-नॅनोमीटर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे, आणि हे तंत्रज्ञान कॅलिफोर्नियातील सनीव्हेल येथील ‘सिलिकॉन लॅब’मध्ये तयार केले गेले आहे.

ॲपलने याबाबत सांगितले आहे की, या चिप्सने 55 देशांमधील 180 मोबाईल कंपन्यांच्या नेटवर्कवर चाचणी घेतली आहे. यामुळे हे सर्व ठिकाणी प्रभावीपणे कार्य करेल.

इंटरनेटच्या गर्दीत स्मार्ट काम

समजा, आयफोनला इंटरनेटवर खूप गर्दी जाणवली, तर फोनचा प्रोसेसर मोडेमला सांगू शकतो की कोणते काम जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे, जास्त महत्त्वाचे काम आधी होईल आणि कमी महत्त्वाचे काम नंतर होईल. यामुळे फोन वापरणाऱ्याला तो लगेच प्रतिसाद देतोय असे वाटेल, असे ॲपलचे ‘अरुण मथियास’ यांनी सांगितले.

‘C1’ चिप्समध्ये ॲपलने स्वतः बनवलेले ‘GPS’ आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी देखील आहे. याचा अर्थ, जेव्हा मोबाईल नेटवर्क नसेल, तेव्हाही आयफोन वापरकर्ते या सुविधा वापरू शकतील. परंतु, या ‘C1’ चिप्समध्ये ‘मिलीमीटर वेव्ह 5G नेटवर्क’ सारख्या काही गोष्टी नाहीत.

ॲपलने स्वतःचे चिप्स बनवल्यामुळे ‘क्वालकॉम’चा वापर कमी होईल, पण ‘क्वालकॉम’चे काही तंत्रज्ञान अजूनही ॲपल वापरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण
Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ