बारांबकी ते तेहरान : इराणच्या खामेनी यांच्या पूर्वजांचा भारत ते तेहरान प्रवास

Iran : इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक ज्यांनी इराणची क्रांती घडवून आणली त्या अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे भारताशी निकटचे संबंध आहेत. अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे पूर्वज हे भारतातले असून त्यांनी 18 व्या शतकात इराणमध्ये स्थलांतरण केलं होतं.
[gspeech type=button]

इराण आणि इस्रायल दरम्यानचा संघर्ष दिवसागणिक चिघळत चालला आहे. इराणच्या अणूप्रकल्प आणि लष्करी तळांवर इस्रायल बेहिशोबी हल्ले करत ते उद्धवस्त करत आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी काय निर्णय घेतात, याकडे सगळ्याचंच लक्ष आहे. इराण हे शिया मुस्लीमचं केंद्र असल्यामुळे मुस्लीम समाजामध्ये खामेनी यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे खामेनी काय वक्तव्य करतात, काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. 

अयातुल्ला अली खामेनी आणि इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक ज्यांनी इराणची क्रांती घडवून आणली त्या अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांचे भारताशी निकटचे संबंध आहेत.

खामेनी आणि खोमेनी यांचे पूर्वज उत्तरप्रदेशमधील

उत्तरप्रदेशमधल्या बाराबांकी जिल्ह्यातलं किंटूर हे गाव खोमेनी यांच्या पूर्वजाचं गाव आहे. किंटूर हे गाव शिया विद्वत्तेचं केंद्र म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध आहे.  खोमेनी यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचा जन्म 1800 च्या सुमारास किंटूरमध्ये झाला होता. 1830 मध्ये ते इराकमधल्या नजफ या शहरात धार्मिक अभ्यासासाठी गेले. तिथून इमाम अली यांच्या थडग्याला भेट देण्यासाठी ते इराणमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. भारतातलं मूळ जपण्यासाठीच त्यांनी त्यांच्या नावामध्ये हिंदी हा उल्लेख कायम ठेवला. आजही इराणच्या नोंदींमध्ये त्यांच्या नावामध्ये हा उल्लेख आढळून येतो. 

अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि सय्यद अहमद मुसावी हिंदी यांची ओळख

अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी हे इस्लामिक रिपब्लिकचे संस्थापक आहेत. इराणच्या लोकांवर त्यांचा मोठा प्रभाव आहे. तिथल्या चलनातील नोटांवर खोमेनी यांचा फोटो आहे. तर तेहरानमध्ये सोनेरी घुमटामध्ये त्यांची समाधी उभी केली आहे. थोडक्यात इराणच्या कणाकमात खोमेनी यांचं अस्तित्व आहे.  मात्र, खूप कमी जणांना माहित आहे की, ते मूळचे भारतातले आहेत. त्यांचे आजोबा सय्यद अहमद मुसावी हिंदी हे शिया धर्मगुरू होते. 18 व्या शतकामध्ये त्यांनी इराकमधल्या इमान अली यांच्या थडग्याला भेट देण्यासाठी भारतातून स्थलांतर केलं. 

खोमेनी यांच्या धार्मिक आदर्शांचा आणि इस्लामिक पुनरुज्जीवनाच्या आवाहनाचा विचार हा त्यांचे आजोबा अहमद हिंदी यांच्याकडून मिळाला. याच विचारांवर पुढे जाऊन त्यांनी 1979 मध्ये इस्लामिक क्रांतीचं नेतृत्व केलं. त्यांची प्रवचनं, भाषणं ही लाखों इराणी लोकांवर शक्तीशाली प्रभाव टाकत होती. 

या धार्मिक आणि इस्लामिक क्रांतीच्या विचाराच्या जोरावर त्यांनी इराणला पूर्णपणे शिया समाजाच्या धर्मराज्यात रुपांतर केलं. या घटनेमुळे पश्चिम आशियातल्या राजकारणाला नवीन आकार मिळाला. 

हे ही वाचा : इराण – इस्रायल युद्धाचा भारतावर काय परिणाम होणार

खोमेनी यांच्या पूर्वजांचा भारत ते इराण प्रवास

1830 मध्ये अहमद हिंदी हे धार्मिक अभ्यासासाठी इराकमधलं धार्मिक केंद्रस्थान नजफ इथे गेले. नजफ हे शिया इस्लाम बांधावांचं सर्वात पवित्र शहर मानलं जातं. नजफमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इराणमधल्या मशहद इथे इमाम अली यांच्या थडग्याला भेट देण्यासाठी गेले. त्यांनी तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेत धर्मगुरु म्हणून काम करु लागले. 

मुसावी कुटुंब हे सातवे शिया इमाम, इमाम-मुसा-अल-काझिम यांचे वंशज आहेत. त्यामुळे धार्मिक आणि आध्यात्मिक वर्तुळात त्यांना आदराचं स्थान होतं. इराणमध्ये स्थिरस्थावर झाल्यावर धर्मगुरू म्हणून धार्मिक क्षेत्रातला अहमद हिंदी यांचा प्रवेश हा इराणमध्ये खामेनी कुटुंबाच्या उदयाचं पहिलं पाऊल होतं. 

मशहादमधील खामेनींचे पूर्वजीवन

अली खमेनी यांचा जन्म मशहादमध्ये 1939 साली झाला. त्यांचे वडील सय्यद जावेद खामेनी हे धार्मिक विद्वान होते. ते सय्यद अहमद मुसावी हिंदी यांचे वंशज होते.  याच धार्मिक वातावरणात खामेनी यांचं संगोपन झालं. शिया धर्मशास्त्र, इस्लामिक न्यायशास्त्र आणि क्रांतिक्रारी विचारांची शिकवण त्यांना लहानपाणापासूनच मिळाली आहे.  

अली खामेनी यांनी खूप क्वचितच त्यांच्या पूर्वजांच्या भारताशी असलेल्या संबंधावर वक्तव्य केलं आहे. तरी, खामेनी यांचे पूर्वज आणि 18 शतकात त्यांनी केलेल्या स्थलांतराची माहिती इराणच्या राजकीय, धार्मिक वर्तुळात सर्वांना आहे. त्यामुळे इराणच्या माध्यमांमध्ये त्यांच्या सर्वोच्च नेत्याचे भारताशी असलेले बंध आकर्षणाचा विषय ठरत आहे. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 50 टक्के आयात शुल्कामुळे भारतीय निर्यातदारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पण, पंतप्रधान मोदींनी अमेरिकन
पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ