चंद्रिका टंडन यांना ‘त्रिवेणी’साठी ग्रॅमी पुरस्कार!

Chandrika Tandon : चंद्रिका टंडन यांच्या भारतीय मंत्रपठणाच्या  जागतिक संगीतांशी मेळ घालणाऱ्या ‘त्रिवेणी’ या अल्बमला 67 वा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. चंद्रिका टंडन यांच्या या अल्बममध्ये सात सूरांचं मिलन आहे. ध्यानसाधना करत ‘इनर हिलींग’ करणारं हे संगीत आहे असं टंडन म्हणतात. 
[gspeech type=button]

भारतीय वंशांच्या अमेरिकन व्यावसायिक, संगीतकार चंद्रिका टंडन यांना रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी ग्रॅमी पुरस्काराने गौरविलं आहे. चंद्रिका टंडन यांच्या भारतीय मंत्रपठणाच्या  जागतिक संगीतांशी मेळ घालणाऱ्या ‘त्रिवेणी’ या अल्बमला 67 वा ग्रॅमी पुरस्कार देण्यात आला आहे. चंद्रिका टंडन यांच्या या अल्बममध्ये सात सूरांचं मिलन आहे. ध्यानसाधना करत ‘इनर हिलींग’ करणारं हे संगीत आहे असं टंडन म्हणतात. 

साऊथ आफ्रिकन आणि जापनीज वादकांची साथ

साऊथ आफ्रिकाचे बासरीवादक वूटर केलरमॅन आणि जपानच्या चेलिस्ट वादक इरु मात्सुमोटो यांच्या सहकार्याने चंद्रिका टंडन यांनी हा अल्बम तयार केला आहे. या अल्बम मध्ये भारतीय वैदिक मंत्र पठणाला अत्याधुनिक जागतिक दर्जाच्या संगीताची साथ दिली आहे. जगातील या तीन वेगवेगळ्या संस्कृतीतून आलेल्या कलाकरांच्या साथीने या संगीताची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या अल्बमला ‘त्रिवेणी’ असं नाव देण्यात आलं आहे. 

संथ आणि नवीन ट्रेंडचं म्युझीक आणि संस्कृत भाषेतील मंत्र पठणामुळे ध्यानसाधनेसाठी हे सुयोग्य अशा जागतिक दर्जाच्या संगीताची निर्मिती झाली आहे. 

नैराश्यातही संगीताची साथ

“संगीत हे प्रेम असून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात संगीतामुळे एक नवीन प्रकाश निर्माण होतो” अशी प्रतिक्रिया चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कार स्वीकारताना दिली. त्या पुढे म्हणतात की, “ज्यावेळी आपण दुःखात नैराश्यात असतो तेव्हा संगीतच आपल्याला खऱ्या अर्थाने साथ देते. संगीत हे आपल्या आयुष्यात आनंद निर्माण करतो.

बालपणापासून संगीत क्षेत्राशी नातं

चंद्रिका टंडन यांचा चैन्नईतल्या एका धार्मिक, पारंपरिक विचारसरणीच्या कुटुंबात जन्म झाला आहे. मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. चंद्रिका आणि त्यांची छोटी बहिण इंद्रा या दोघींनीही संगीताचं शिक्षण घेतलं आहे. त्यांच्या कुटुंबाची वेदपाठशाळा असून तिथं सामवेदातील वैदिक मंत्र शिकवले जातात. तसेच त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कर्नाटक संगीतही शिकवतात.  त्यामुळे या धार्मिक वातावरणाचा चंद्रिका यांच्यावर मोठा प्रभाव दिसून येतो.

चंद्रिका टंडन यांची लहान बहिण इंद्रा नोयी या पेप्सिको कंपनीच्या गेल्या 12 वर्षापासून सीईओ आहेत. जागतिक पातळीवर यशस्वी महिला उद्योजकामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. तर टंडन या मॅकेन्सी कंपनीच्या पहिल्या भारतीय महिला पार्टनर आहेत. याशिवाय त्यांनी न्यूयॉर्कमध्ये  विविध व्यावसायिक संस्थांचं मूल्यमापन करणारी टंडन कॅपिटल असोसिएट कंपनी सुरू केली आहे. 

चंद्रिका टंडन यांचा प्रवास

चंद्रिका टंडन यांनी आयआयएम अहमदाबादमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.  चंद्रिका टंडन यांनी शास्त्रीय गायक सुभद्रा गुहा आणि गिरीश वझलवार यांच्याकडून संगीत प्रशिक्षण घेतले आहे. सन 2010 साली त्यांच्या ओम नमो नारायण: सोल कॉल या अल्बमला ग्रॅमी नामांकन मिळालं होतं. त्यानंतर तब्बल 11 वेळा त्यांचे विविध अल्बम हे ग्रॅमीसाठी नामांकीत केले होते. मात्र, यंदा त्यांना ‘त्रिवेणी’ अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला असून सुवर्ण ग्रॅमफोनने त्यांना गौरविलं आहे.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ