काही वर्षांपासून आपल्याला काहीही अडलं की लगेच आपण गुगलवर सर्च करायचो आणि माहिती मिळवायचो. त्यामुळे सगळंच काही लक्षात ठेवलंच पाहिजे असं काही नव्हतं. आता त्याची जागा एआय तंत्रज्ञानाने घेतली आहे. ऑफिसमध्ये काम करताना, अभ्यास करताना कुठे काही अडलं की लगेच चॅट जीपीटी, डीपसीक, जेमिनी, कोपायलट आणि ग्रोक यासारखे एआय ॲपवर जाऊन आपण तयार उत्तर मिळवतो. यामध्ये ऑफिसशी संबंधित पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यापासून शाळेतला एखादा निबंध लिहिण्याचं काम असो की, कोणतीही आकडेवारी असो सगळी माहिती या ॲपवर आपल्याला मिळते.
मात्र या ॲपच्या सततच्या वापरामुळे माणूस एकलकोंडा बनतो, असं खुद्द ओपन एआयने केलेल्या संशोधनातूनच स्पष्ट झालं आहे. ओपन एआय सह मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मीडिया लॅब या संस्थेनेसुद्धा या संदर्भात संशोधन केलं आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, 2022 साली चॅट जीपीटी लॉन्च केलं. त्यानंतर आतापर्यंत दर आठवड्याला जवळपास 400 दशलक्ष लोकं चॅट जीपीटी वापरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. डिसेंबर 2024 पर्यंत या वापरकर्त्यांमध्ये 33 टक्क्यांची वाढ झाली आहे.
ओपन एआय आणि मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी मीडिया लॅबकडून करण्यात आलेल्या या संशोधनाचा विषय चॅट जीपीटीचा प्रभावी वापर आणि भावनिक आरोग्य (Well-being – याला सुटेबल शब्द कोणता येईल) असा होता.
ओपनएआयच्या अभ्यासातून समोर आलेल्या गोष्टी
ओपन एआयने चॅट जीपीटीच्या माध्यमातूनच जवळपास 40 दशलक्ष वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया मिळवून आपले निष्कर्ष काढले आहेत. यापैकी 4 हजार 76 वापरकर्त्यांना त्यांनी या संवाद प्रक्रियेबद्दल त्यांचं मत काय आहे याबद्दलही विचारलं.
या अभ्यासातून असं दिसून आलं की, जे लोकं दररोज चॅट जीपीटी वापरतात ते भावनिकदृष्ट्या सुद्धा त्याच्यावर जास्त अवलंबून आहेत. प्रत्येक कामासाठी आपल्या सहकाऱ्यांची वा कुटुंबातील सदस्यांची मदत घेण्याऐवजी चॅट जीपीटीच्या मदतीनेच सगळी काम करत असल्याने त्यांच्या या वापरकर्त्यांमध्ये एकलकोंडेपणा वाढत असल्याचं आढळून आलं आहे.
हे ही वाचा : रोमेनियातील स्टार्टअप कंपनीने दृष्टीहीन व्यक्तींसाठी तयार केला एआय-आधारित चष्मा
मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूटच्या अभ्यासातल्या बाबी
मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूटने याबाबतीत आणखीन सखोल संशोधन केलं. या संशोधनामध्ये त्यांनी 28 दिवसासाठी 1 हजार लोकांना सहभागी केलं होतं. दैनंदिन आयुष्यामध्ये चॅट जीपीटीचा वापर खूप वाढला आहे. यामध्ये एआय तंत्रज्ञान जेव्हा वापरकर्त्यासोबत एखाद्या व्यक्तीसारखाच संवाद साधते. तेव्हा या संवादाचा वापरकर्त्यांवर जो परिणाम होतो, याविषयी भाष्य केलं आहे. या अभ्यासामध्ये, वापरकर्ते अलिकडेच विकसीत झालेल्या व्हॉईस मोडच्या साहाय्याने चॅट जीपीटी वर कशाप्रकारे संवाद साधतात, या तंत्राचा व्यक्तिवर भावनिकदृष्ट्या काय परिणाम होतो, व्यक्तिच्या वर्तवणुकीवर काय परिणाम होतो आणि या तंत्रज्ञानाविषयी वापरकर्त्याचा अनुभव अशा सगळ्या पैलूवर अभ्यास केला आहे.
यामध्ये चॅट जीपीटीचा सगळ्यात जास्त वापर करणारे व्यक्ती हे एकाकी असल्याचं, एआयवर खूपच अवलंबून असल्याचं आणि सामाजिकदृष्ट्या फारसे न मिसळणारे असल्याचं अभ्यासाअंती निष्कर्षातून समोर आलं.
यामध्ये वापरकर्ते कोणत्या प्रकारचं चॅटबोट वापरतात, वापरकर्त्याचा स्वभाव, चॅटबोट किती वेळ आणि कोणकोणत्या गोष्टीसाठी वापरलं जातं, अशा सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे.
पुरुष आणि महिलांच्या वापरातला फरक
मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूटच्या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या ज्या महिलांनी सलग एक महिना चॅट जीपीटी वापरलं त्या महिला नंतर समूहामध्ये मिसळण्यास पुरुषापेक्षा कमी उत्सुक होत्या.
या अभ्यासात असंही आढळून आलं की, जे वापरकर्ते चॅट जीपीटीचा खूप जास्त वापर करतात त्यांना चॅट जीपीटीकडून भावनिक जोड असलेले उत्तरं मिळतात. तर जे संतुलित प्रमाणात चॅट जीपीटीचा वापर करतात, त्यांना चॅट जीपीटीकडून औपचारिक स्वरुपातली उत्तरं मिळतात.
जे वापरकर्ते दीर्घकाळापासून चॅट जीपीटीचा दैनंदिन आयुष्यात वापर करत आहेत. त्यांना खूप जास्त एकाकीपणा वाटत असल्याचा अनुभव आला. त्या तुलनेत अलिकडेच चॅट जीपीटी वापरत असलेल्यांना असा कोणताही अनुभव आला नाही.
सुरुवातीला टेक्स्ट बेस्ड चॅटबोट्स पेक्षा व्हॉइस बेस्ड चॅटबॉक्समुळे वापरकर्त्यांना आपला एकाकीपणा कमी होत आहे, अशी भावना निर्माण होत होती. मात्र, या चॅटबोट टूलमुळे आपण आणखीन जास्त एकाकी पडत आहोत याची जाणीव होऊ लागली.
मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूटचे सहलेखक पॅट पटारनुतापोर्न म्हणतात की, एआयच्या मदतीने एआय वापरण्याचे काय काय परिणाम होतात याचा अभ्यास करणे गंमतीशीर आहे. पण एआयचा वाढता वापर लक्षात घेऊन या तंत्रज्ञानाचा मानवी भावनांवर काय परिणाम होतो याचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
चॅट बोटच्या व्हॉइस मोड टूलचा वापर करुन चॅट जीपीटीशी मोठ्या प्रमाणावर भावनिक संवाद साधल्याचं पाहायला मिळतं. मात्र, हा संवाद साधणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी होतं. या संपूर्ण अभ्यासातून एआय चॅटबोट हे पारदर्शक पद्धतीने, जबाबदारीने आणि संतुलित प्रमाणात वापरणं गरजेचं आहे.
ओपन एआयच्या सुरक्षे संबंधित काळजी घेणारे अधिकारी जेसॉन फांग यांनी एनडीटिव्हीला सांगितले की, एआय चॅटबोट क्षेत्रामध्ये आता जे काही काम सुरू आहे ते अगदिच प्राथमिक स्वरुवाचं काम आहे. मात्र, या प्राथमिक टप्प्यावरच या तंत्रज्ञानाचे वापरकर्त्यांवर आणि भविष्यकालीन काय काय परिणाम होऊ शकतात याचा अभ्यास करुन त्यानुसार हे तंत्रज्ञान विकसीत करणं ही आपली जबाबदारी आहे.
हे ही वाचा : अमेरिका आणि चीन मध्ये ‘एआय’ वॉर
एआयचा वापरकर्त्यांवरचा भावनिक परिणाम
एआय तंत्रज्ञानाचा वापरकर्त्यांवर भावनिक परिणाम होणार हे अपेक्षितच आहे, असं मत या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तिंनी मांडलं आहे. लंडन येथील प्राध्यापक केट डेवलीन म्हणतात की, एआयची चॅटबोट तंत्रज्ञान हे एक उत्पादक साधन म्हणून विकसीत केलं आहे. तरी अनेक जण या ॲपचा वापर एवढ्या जास्त प्रमाणात करतात की, जणू हे ॲप त्यांच्या दररोजच्या आयुष्यातला अविभाज्य भागच आहे.
मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूटच्या अभ्यासानुसार, खूप कमी लोकं (पण जास्त प्रमाणात) चॅट जीपीटीसोबत भावनिक संवाद साधतात. पण जसं आपण एखाद्या व्यक्तिशी पटत नाही म्हणून त्या व्यक्तीसोबतचं नातं तोडून टाकतो तसं, आपण या तंत्रज्ञानासोबत आपलं नातं किंवा संबंध तोडून टाकू शकत नाही. त्याऐवजी आपण आपल्या जीवनात या तंत्रज्ञानाचा कितपत आणि कशा पद्धतीने वापर करायचा हे ठरवू शकतो. तसंच या एआयच्या माध्यमातून जे जे वापरकर्ते त्यांच्या भावनिक विषयासंबंधित उत्तरं मिळवण्यासाठी मदत म्हणून वापर करतात, त्या वापरकर्त्यांच्या नेमक्या भावना समजून घेणं हेही कठीण आहे.