देशोदेशीच्या नूतन वर्षाच्या परंपरा

New Year 2025 : ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, अधिकृतरित्या वर्ष बदलते. जगभरात आजच्या दिवशी नवीन वर्षाला सुरूवात होत असली, तरिही स्थानिक परंपरांनुसार वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्ष सुरु होत असतं. 
[gspeech type=button]

आज 2025 सालचा पहिला दिवस. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, अधिकृतरित्या वर्ष बदलते. जगभरात आजच्या दिवशी नवीन वर्षाला सुरूवात होत असली, तरिही स्थानिक परंपरांनुसार वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या दिवशी नवीन वर्ष सुरु होत असतं. 

भारतातील वैविध्य

भारतामध्ये विविध प्रातांनुसार सौरमान आणि चांद्रमान कालगणना आहे. पण स्वातंत्र्यानंतर पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र कॅलेंडर तयार केलं होतं. या कॅलेंडरनुसार चैत्र हा वर्षातला पहिला महिना असून 22 तारखेला वर्षाचा पहिला दिवस ठरतो. इंग्रजी कॅलेंडरनुसार हा भारतीय सरकारी चैत्र महिना मार्च महिन्यात सुरु होतो.  तर लीप वर्षामध्ये चैत्र महिन्यातली पहिली तारीख ही 21 असते.  स्थानिक संस्कृतीनुसार कॅलेंडर, जागतिक पातळीवरच्या व्यवहारासाठी असलेले इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडर आणि स्वातंत्र्योत्तर काळातील हे विशेष भारतीय कॅलेंडर अशी एकूण तीन कॅलेंडर दैनंदिन कामकाजात वापरणं शक्य नव्हतं. त्यामुळे स्थानिक सण-उत्सवासाठी स्थानिक कालगणनेवर आधारीत असलेलं कॅलेंडरच वापरण्यात येतं. व्यवहारासाठी इंग्रजी ग्रेगोरियन कॅलेंडर वापरण्यात येतं.  तर सरकारी व न्यायालयीन कागदपत्रांवर पंडीत जवाहरलाल यांनी स्वातंत्र्यानंतर तयार केलेल्या भारतीय सरकारी कॅलेंडरनुसार महिना आणि वारांचा उल्लेख आढळतो.

 चीनमधील लुनार नववर्ष

चीनमध्ये सूर्य आणि चंद्राच्या स्थितीनुसार नववर्षाला सुरूवात होते. यावर्षी गेग्रोरियन कॅलेंडरनुसार 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी असा एकूण सात दिवसाचा नववर्षोत्सव साजरा केला जाणार आहे. चीन नववर्षोत्सवामध्ये दरवर्षी खगोलशास्त्राच्या अभ्यासानुसार एक विशेष आकार ज्याला झोडिएक ॲनिमल  साईन म्हटलं जातं ते काढलं जातं. तसंच रंग ही ठरवले जातात. त्यानुसार संपूर्ण उत्सवाची सजावट केली जाते. 

यंदा ‘वूड स्नेक’ हे झोडिएक ॲनिमल साईन आलेलं आहे. ज्याचा अर्थ शहाणपण, दूरदृष्टी आणि ॲडॅपटिब्लिटी असा आहे. तर या संपूर्ण वर्षात उत्तमोत्तम गोष्टी घडून दुर्दैवी घटना टाळण्यासाठी एम्राल्ड हिरवा आणि कर्माइन लाल रंग हे लकी रंग म्हणून निवडले आहे. यावेळी घरोघरी कंदील आणि लाल-हिरव्या रंगाची सजावट केली जाते.  

चीन, हाँगकाँग, माकू, तैवान, मलेशिया, मॉरिशस, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम या देशातल्या चिनी बहुल भागातही मोठ्या उत्साहाने लुनार नववर्ष उत्सव साजरा केला जातो. 

रोश हशनाह – ज्यूईश न्यू इयर

हिब्रु कॅलेंडरनुसार, ‘रोश हशनाह’ हा ज्यू समुदायाचा नववर्ष दिवस असतो. या धार्मिक कॅलेंडरमधला सातवा महिना तिश्री महिना आहे. या महिन्याचा पहिला दिवस नूतन वर्ष म्हणून साजरा केला जातो. यावर्षी 22  सप्टेंबरची संध्याकाळ ते 24 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत हा नववर्षाचा सण साजरा केला जाणार आहे. 

आपल्या ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हा महिना सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये हा हिब्रु तिश्री महिना सुरू होतो. 

रोश हशनाह या शब्दाचा अर्थ हेड ऑफ द इयर किंवा वर्षाचा पहिला दिवस असा आहे. धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी देवाने जगाच्या मानवाची उत्पत्ती करुन जगाच्या निर्मितीचं काम पूर्ण केलेला हा दिवस आहे अशी श्रध्दा बाळगली जाते.  

या दिवशी ज्यूईश लोक सरत्या वर्षाचा आढावा घेतात.  एकमेकांची,प्रियजनांची माफी मागतात, पुढच्या वर्षाचे संकल्प ठरवतात. धार्मिक प्रथेप्रमाणे, शोफर नावाच्या मेंढ्याचं शिंग वाजवून पश्चाताप करतात आणि सिनेगॉग्जमध्ये (प्रार्थनास्थळी) मुसाफा ही विशेष प्रार्थना करतात. 

यादिवशी जेवणामध्ये मासे किंवा मेंढ्याच्या मांसाचा समावेश असतो. त्याचबरोबर ब्रेड, खजूर, डाळिंब आणि मधात बुडवलेले ॲपल हे पदार्थ आवर्जून तयार केले जातात. 

मोहरम नववर्ष

मुस्लीम समुदायामध्ये मोहरम या पवित्र महिन्याचा पहिला दिवस हा नववर्ष म्हणून साजरा केला जातो. या दिवसाला हिजरी असं म्हणतात. मोहरम हा मुस्लीम समुदायाचा वर्षातला पहिला महिना असतो. चंद्राच्या स्थितीनुसार नवीन वर्ष ठरवलं जातं. मोहरम या मुस्लीम समुदायाच्या चार पवित्र महिन्यामधला एक महिना असून त्याला धार्मिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. यावर्षी 25 जूनला मुस्लीम नववर्ष साजरं करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ