साडेबारा हजार वर्षांपूर्वी नामशेष झालेला लांडगा पुन्हा जिवंत!

Dire wolves : सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf)  आता पुन्हा जिवंत झाला असल्याचा दावा अमेरिकेतील ‘Colossal Biosciences’ या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केला आहे. या प्राण्याला ‘अतिशय हिंस्र लांडगा’ असे म्हणतात.
[gspeech type=button]

सुमारे साडेबारा हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेला अतिशय हिंस्र शिकारी प्राणी – डायरे वुल्फ (Dire Wolf)  आता पुन्हा जिवंत झाला असल्याचा दावा अमेरिकेतील ‘Colossal Biosciences’ या जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीने केला आहे. या प्राण्याला ‘अतिशय हिंस्र लांडगा’ असे म्हणतात. डीएनए आणि आधुनिक क्लोनिंग तंत्रज्ञानाचा वापर करून या कंपनीने ग्रे वुल्फच्या पेशींमध्ये बदल करत डायरे वुल्फसारखी दिसणारी पिल्ले तयार केली आहेत.

या पिल्लांची रचना आणि दिसणं अगदी उत्तर अमेरिकेतील प्राचीन डायरे वुल्फसारखं असल्याचा दावा कंपनीने केला आहे. विशेष म्हणजे, एचबीओवरील लोकप्रिय ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेत दाखवले गेलेले ‘डायर वुल्फ’ हे प्राणी याच विलुप्त प्रजातीवर आधारित होते.

डोडो आणि टॅस्मानियन वाघालाही पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे.

‘Colossal Biosciences’ या कंपनीनं आपलं संशोधन केवळ डायरे वुल्फपुरतीच मर्यादित ठेवलं नाहीये.  डोडो आणि टॅस्मानियन वाघ यांसारख्या नामशेष प्राण्यांना देखील ही कंपनी पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करत आहे. 2021 पासून त्यांनी मॅमथ, डोडो व टॅस्मानियन वाघांसाठी डीएनए पुनर्रचना आणि जनुक संपादनाचं (gene editing) काम सुरू केलं आहे. मात्र डायरे वुल्फवर काम करत असल्याची माहिती त्यांनी याआधी दिली नव्हती.

साडेबारा हजार वर्षांपूर्वीचे डीएनए आणि आधुनिक विज्ञानाचा संगम

कंपनीचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बेन लॅम म्हणाले की, “हे मोठे यश आहे आणि यावरून सिद्ध होते की नामशेष झालेल्या प्राण्यांना पुन्हा जिवंत करण्याचे आमचे तंत्रज्ञान काम करत आहे. त्यांच्या टीमने 13 हजार वर्षे जुन्या दातांतील आणि 72 हजार वर्षे जुन्या कवटीतील डीएनए वापरून या अतिशय हिंस्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लांडग्यांची निरोगी पिल्ले तयार केली आहेत.

हे हिंस्र लांडगे एका गुप्त ठिकाणी 2000 एकरांच्या जागेत 10 फूट उंच मजबूत कुंपणात ठेवण्यात आले आहेत. तिथे सुरक्षा कर्मचारी, ड्रोन आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे. कंपनीने सांगितले की या जागेला अमेरिकन ह्युमन सोसायटी आणि अमेरिकेच्या कृषी विभागाने मान्यता दिली आहे.

हे ही वाचा : चीनमध्ये प्राण्यांच्या क्लोनिंगची मागणी का वाढतेय? 

पेशींमध्ये बदल करून क्लोनिंगद्वारे निर्मिती

या अनुवांशिक माहितीच्या आधारे ग्रे वुल्फच्या पेशींमध्ये 14 जनुकांतील 20 ठिकाणी बदल करण्यात आले. त्यानंतर या बदललेल्या पेशींमधील केंद्रकं (nucleus) मादी कुत्र्यांच्या अंड्यात टाकून क्लोनिंग प्रक्रिया केली गेली. या प्रक्रियेबाबत प्रोफेसर बेथ शॅपिरो यांनी सांगितले, “आम्ही मादी कुत्र्यांचे अंडे घेतो, त्यातील मूळ केंद्रक काढतो आणि त्यामध्ये संपादित केंद्रक टाकतो. नंतर त्याचे क्लोनिंग करून भ्रूण तयार केला जातो.”

हा भ्रूण विशेष प्रकारच्या मोठ्या, शिकारी स्वभाव असलेल्या कुत्रींच्या गर्भाशयात वाढवण्यासाठी प्रत्यारोपित करण्यात आला. अशा एकूण आठ वेळा हे प्रत्यारोपण झाले आणि प्रत्येकवेळी सुमारे 45 भ्रूण वापरण्यात आले.

Colossal कंपनीच्या माहितीनुसार, या प्रयोगातून 1 ऑक्टोबर 2024 रोजी दोन नर आणि 30 जानेवारी 2025 रोजी एक मादी अशा तीन डायरे वुल्फ पिलांचा जन्म झाला आहे. ही सर्व पिल्ले एका गुप्त ठिकाणी 2000  एकर क्षेत्रात उभारलेल्या दहा फूट उंच कुंपणात ठेवण्यात आली आहेत. तिथे सुरक्षा रक्षक, ड्रोन आणि कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवण्यात येते.

या परिसरास अमेरिकन ह्युमन सोसायटी आणि अमेरिकेच्या कृषी विभागाची अधिकृत मान्यता मिळाली आहे. कंपनीचे मुख्य प्राणी अधिकारी मॅट जेम्स यांनी सांगितले की, एका वेळेस फक्त एकच पिल्लू जन्माला येणे हे व्यवस्थापनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरले. त्यांनी स्पष्ट केले की, “जर एकदम 25 हिंस्र लांडगे झाले असते, तर त्यांना सांभाळणे फार कठीण झाले असते.”

ही पिल्ले जरी माणसांच्या देखरेखीखाली वाढत असली, तरी ती पाळीव प्राणी नाहीत. दोन नर लांडगे दररोज त्यांच्या विस्तीर्ण जागेचा फेरफटका मारतात, पण जेवणासाठी दिवसातून दोन वेळा परत येतात.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या प्राण्यांचे नैसर्गिक वर्तन अजून पूर्णपणे समोर आलेले नाही, कारण ते अजूनही वाढीच्या प्रक्रियेत आहेत.

या प्रयोगामुळे विज्ञानाच्या दुनियेत नवीन दिशा मिळाली आहे. नामशेष झालेल्या प्राण्यांना पुन्हा जिवंत करता येतं, हे आता शक्य वाटतंय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण
Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ