डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ आणि ‘MAGA’ भारत-अमेरिका संबंधांवर काय परिणाम होणार?

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. हे फक्त व्यापार धोरणाशी संबंधित नाही, तर यात राजकारण आणि वाटाघाटीची चालही दडलेली आहे
[gspeech type=button]

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘टॅरिफ’ धोरणाने पुन्हा एकदा जगाचं लक्ष वेधून घेतलंय. यावेळेस ट्रम्प यांच्या निशाण्यावर आपला भारत देश आहे. ट्रम्प यांनी नुकतीच भारताच्या सर्व आयातीवर 25% अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा केली. पण या घोषणेसोबतच त्यांनी वापरलेल्या ‘MAGA’ (Make America Great Again) या नाऱ्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेरिकेने भारतावर टॅरिफ लावण्यामागचा नेमका अर्थ काय आहे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

ट्रम्प यांचा ‘टॅरिफ बॉम्ब’ काय आहे?

डोनाल्ड ट्रम्प यांनी 1 ऑगस्ट 2025 पासून भारतीय वस्तूंवर 25% टॅरिफ लागू होईल अशी घोषणा केली आहे. यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेच्या बाजारात खूप महाग होतील. परिणामी त्यांची मागणी कमी होऊ शकते. याचा थेट फटका हा भारतीय निर्यातदारांना बसणार आहे.

या घोषणेसोबतच, ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणं खरेदी केल्याबद्दलही नाराजी व्यक्त केली. आणि यासाठी भारतावर अतिरिक्त दंड लावण्याचा इशाराही दिला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर ‘अडथळे निर्माण करणारा’ आणि ‘खूप जास्त टॅरिफ’ लावणारा देश असे आरोप देखील केले आहेत.

‘MAGA’ आणि ‘MIGA’ यांचं कनेक्शन काय?

ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची घोषणा केली त्यावेळेस शेवटी ‘MAGA’ हा नारा वापरला. हा नारा त्यांच्या राजकारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण यामुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय फक्त व्यापार धोरणाशी संबंधित आहे की मोदींच्या ‘MIGA’ (Make India Great Again) घोषणेला ट्रम्प यांनी दिलेलं हे राजकीय प्रत्युत्तर आहे?

काही महिन्यांपूर्वी, पंतप्रधान मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना त्यांनी ‘मेक इंडिया ग्रेट अगेन’ ही संकल्पना ट्रम्प यांचा समोर मांडली होती. मोदी म्हणाले होते की, भारत आणि अमेरिका एकत्र येऊन ‘MEGA’ (Mega Partnership) तयार करू शकतात. पण ट्रम्प यांच्या आताच्या घोषणेने हे सगळे प्रयत्न वाया गेल्यासारखं वाटत आहे.

‘MAGA’ चा नारा का वापरला गेला?

ट्रम्प यांनी यापूर्वीही इतर देशांवर टॅरिफ लावले आहेत, पण त्यावेळी त्यांनी ‘MAGA’ चा नारा इतक्या स्पष्टपणे वापरला नव्हता. यामुळे अनेक तज्ञांचे म्हणणं आहे की ट्रम्प यांचा हा निर्णय फक्त व्यापार धोरणाचा भाग नाही, तर तो त्यांच्या देशातील जनतेसाठी एक संदेश आहे.

अमेरिकेतील निवडणुका जवळ आल्या आहेत

अमेरिकेत लवकरच निवडणुका होणार आहेत. ट्रम्प आपल्या समर्थकांना हे दाखवू इच्छितात की, ते कोणत्याही देशाला, अगदी मित्र देशांनाही झुकवण्यास तयार आहेत. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांच्यावर त्यांच्याच समर्थकांनी भारताबाबत ‘नरम’ असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे हा टॅरिफ लावून ट्रम्प आपल्या राजकीय समर्थकांना खुश करत आहेत.

वाटाघाटीसाठी दबाव

काही विश्लेषकांना वाटतं की ट्रम्प हे वाटाघाटीसाठी दबावतंत्र वापरत आहेत. याला ‘TACO trade’ (Trump Always Chickens Out) असंही म्हटलं जातं. म्हणजे , ट्रम्प आधी मोठे धोके देतात आणि नंतर थोडी माघार घेऊन आपल्या फायद्याचा करार करतात. कदाचित ते भारतावर दबाव आणून आपल्या अटी मान्य करून घेण्यासाठी हे करत असावेत.

हेही वाचा: भारतावर ट्रम्प यांचा टॅरिफ हल्ला; अमेरिकन नागरिकांचे जीवनही होणार महागडे

यावर भारताची भूमिका काय आहे?

भारत सरकारने या टॅरिफच्या परिणामांचा अभ्यास सुरू केला आहे. भारताने स्पष्ट केलं आहे की, ते अमेरिकेसोबत एक ‘निष्पक्ष आणि फायदेशीर’ व्यापार करार करण्यासाठी कटिबद्ध आहेत. पण त्याचबरोबर, भारत आपले ‘राष्ट्रीय हित’ जपण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचंही सांगितलं आहे.

भारताने अमेरिकेला वारंवार सांगितलं आहे की, ते आपल्या कृषी आणि दुग्ध क्षेत्राला परदेशी कंपन्यांसाठी खुलं करणार नाहीत. कारण, यामागे 70 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे. ही भारताची ‘रेड लाईन’ आहे आणि यामुळेच दोन्ही देशांमधील व्यापार करार रखडला आहे.

तसंच, भारताने रशियाकडून तेल आणि लष्करी उपकरणं खरेदी करणे सुरूच ठेवलं आहे. कारण ते भारताच्या गरजेनुसार आणि स्वस्त दरात उपलब्ध आहे. ट्रम्प यांनी यावर आक्षेप घेतला असला तरी, भारताने आपलं धोरण बदललेलं नाही

ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि ‘MAGA’ चा नारा हे एक गुंतागुंतीचं प्रकरण आहे. हे फक्त व्यापार धोरणाशी संबंधित नाही, तर यात राजकारण आणि वाटाघाटीची चालही दडलेली आहे.

ट्रम्प त्यांच्या देशातील मतदारांना ‘अमेरिका फर्स्ट’चा संदेश देत आहेत. तर दुसरीकडे ते भारतावर दबाव आणून आपल्या अटींवर करार करू इच्छित आहेत. भारताने मात्र आपलं राष्ट्रीय हित जपण्याची आपली भूमिका कायम ठेवली आहे.

पुढील काळात भारत आणि अमेरिका यांच्यात वाटाघाटी पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी ट्रम्प यांची भूमिका ‘MAGA’ नुसार कायम राहते की ते ‘TACO’ प्रमाणे माघार घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पण सध्या तरी ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे दोन्ही देशांमधील व्यापार संबंधांवर तात्पुरता ताण आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड
Trump's tariff attack on India : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारतावर 'टॅरिफ किंग' असल्याचा आरोप करत 30

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ