गौतम अदानी विरोधात लाच दिल्याप्रकरणी आणि फसवणूकी विरोधात अमेरिकेत गुन्हा दाखल

Gautam Adani Fraud Case : अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन आणि अन्य अधिकाऱ्यां विरोधात विदेशी भ्रष्टाचार प्रथा अधिनियम (FCPA) चा भंग करून लाच देणे, गुंतवणूकदारांची फसवणूक, वित्त संस्थांची दिशाभूल करणे, तपासात अडथळा निर्माण करणे यासंदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
[gspeech type=button]

भारतातील नव्हे तर जगातील श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात अमेरिकेत लाच देणे आणि फसवणूक केल्याप्रकरणी अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे अधिकारी, एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेडचे कार्यकारी अधिकारी सिरील काबेनेस अशा एकुण सात जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी गुंतवणूकदारांची फसवणूक

भारतात सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्पाचं कंत्राट मिळविण्यासाठी गौतम अदानी यांनी भारतीय सरकारी खात्यांना 2 हजार कोटी रूपयाची लाच दिली. या प्रकल्पातून पुढच्या 20 वर्षात अदानी ग्रुपला 2 अब्ज डॉलरहून अधिक नफा होण्याची शक्यता आहे.

कंत्राट मिळवण्यासाठी दिलेली लाचेची रक्कम ही अदानी ग्रुपने जागतिक पातळीवरील गुंतवणूकदारांकडून आणि वित्तीय संस्थांची दिशाभूल करुन जमा केल्याचं उघड झालं आहे.

अदानी ग्रीन एनर्जी ग्रुपचे माजी सीईओ विनीत जैन यांनी गुंतवणूकदारांना आणि कर्जदारांशी खोटं बोलुन त्यांची फसवणूक करुन 3 अब्ज डॉलरहून अधिक रक्कम जमा केली आहे.

सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने म्हटलं आहे की, अदानी ग्रुपने फेडरल सिक्युरिटीज कायद्याचं उल्लंघन केलं आहेत. एज्योर पॉवर ग्लोबल लिमिटेड कंपनी ही अमेरिकन शेअर बाजारामध्ये व्यवहार करते. या कंपनीच्या माध्यमातून अदानी ग्रुपने गुंतवणूकदारांची फसवणूक करुन सुमारे 1,450 कोटी रुपये जमवले.

याप्रकरणी अमेरिकन सिक्युरिटीज एक्सचेंज कमिशनने गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन आणि अन्य अधिकाऱ्यां विरोधात विदेशी भ्रष्टाचार प्रथा अधिनियम (FCPA) चा भंग करून लाच देणे, गुंतवणूकदारांची फसवणूक, वित्त संस्थांची दिशाभूल करणे, तपासात अडथळा निर्माण करणे यासंदर्भातले गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कॉर्पोरेट फसवणूक आणि भ्रष्टाचाराचे प्रकरण म्हणून अमेरिकेत आता हे प्रकरण हाताळलं जात आहे.

अदानी ग्रुपवरील हिंडणबर्ग रिसर्चचे आरोप

यापूर्वी 2023 साली हिंडणबर्ग रिसर्च संस्थेने सुद्धा अदानी ग्रुपवर मनी लॉडरिंग, शेअर बाजारात आफराताफर केल्यासंदर्भातले आरोप केले होते. याबाबत अनेक पुरावेही सादर केले होते. मात्र, अदानी ग्रुपने हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. पण या घटनेमुळे अदानी ग्रुपचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर कोसळले होते.

या प्रकरणानंतर देशात विरोधकांनी ही सत्ताधारी भाजपा पक्षावर आणि मुख्य करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत चौकशीची मागणी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

America shutdown : शटडाऊनच्या या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसकडून ट्रम्प सरकारच्या मूल्यांशी मेळ नसलेल्या संस्थेत नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला जाणार
US government : अमेरिकन आर्थिक वर्ष हे 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर असं असतं. अमेरिका सरकारतर्फे चालवलं जाणाऱ्या प्रशासनातील विविध
Microsoft action on Israel army : मायक्रोसॉफ्ट कंपनीने इस्रायलच्या युनिट 8200चा मायक्रोसॉफ्ट क्लाउड आणि एआय सुविधांसाठीचा प्रवेश प्रतिबंध केला आहे.

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ