हवाई – इंद्रधनुष्याची राजधानी !

Rainbow Capital : जगात असं एक ठिकाण आहे, जिथे बऱ्याचदा तुम्हाला इंद्रधनुष्य पाहायला मिळेल. आणि ते ठिकाण आहे, अमेरिकेतलं हवाई आयलंड.या हवाई आयलंड वरची हवा स्वच्छ असते, पावसाच्या हलक्या सरी असतात. त्यामुळे तिथे अनेकदा इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. त्यामुळे हवाई विद्यापीठाचे प्राध्यापकांनी त्याला इंद्रधनुष्याची राजधानी असं नाव दिलं आहे. 
[gspeech type=button]

पावसामुळे हिरवागार झालेला परिसर, वातावरणात जरासा ओलावा आणि आकाशात सात रंगाचं इंद्रधनुष्य अशी पावसाळ्यातली संध्याकाळ ही खरंच मनाला मोहून टाकणारी असते. वयाची पन्नाशी गाठली तरी आकाशातल्या सात रंगांची उधळण असलेलं इंद्रधनुष्य पाहायला खूप आवडते. पण सगळीकडेच पावसाळ्यात वरचेवर इंद्रधनुष्य दिसत नाही. मात्र, जगात असं एक ठिकाण आहे, जिथे बऱ्याचदा तुम्हाला इंद्रधनुष्य पाहायला मिळेल. आणि ते ठिकाण आहे, अमेरिकेतलं हवाई आयलंड.

या हवाई आयलंड वरची हवा स्वच्छ असते, पावसाच्या हलक्या सरी असतात. त्यामुळे तिथे अनेकदा इंद्रधनुष्य पाहायला मिळतं. त्यामुळे हवाई विद्यापीठाचे प्राध्यापकांनी त्याला इंद्रधनुष्याची राजधानी असं नाव दिलं आहे.

इंद्रधनुष्य ही हवाई आयलंडची ओळख

सध्या या आयलंडवर हिवाळी-पावसाळा असं वातावरण आहे. त्यामुळे दररोजचं इथे इंद्रधनुष्य पाहायला मिळतो. त्यामुळे हवाई आयलंडवरच्या सार्वजनिक ठिकाणावर, बस स्थानकांवर सहजपणे इंद्रधनुष्याची चित्रे दिसतात. तसंच हवाई विद्यापिठाच्या क्रीडा संघाने सुद्धा त्यांच्या संघाचं नाव ‘रेन्बो’ (इंद्रधनुष्य) असं ठेवलं आहे.

इंद्रधनुष्य आशेचं प्रतिक

हवाई प्रांतातल्या होनोलूलू शहरामध्ये बाल संगोपन केंद्राच्या कार्यालयात इंद्रधनुष्याचं सुरेख चित्र आहे. याविषयी तिथल्या अध्यक्ष लिएन उशर सांगतात की, इंद्रधनुष्य हे आशेचं आणि नव्या सुरुवातीचं प्रतिक असतं. इंद्रधनुष्य पाहिल्यावर प्रसन्नता निर्माण होते. त्यामुळे हवाई बेटावर जेव्हा पाऊस पडून गेल्यावर आकाशात इंद्रधनुष्य तयार होतो तेव्हा तो पाहताच चेहऱ्यावर हास्य पसरतं.

इंद्रधनुष्य कसं तयार होतं?

पावसाळ्यात जेव्हा ऊन असतं आणि त्याचवेळी पावसाच्या हलक्या सरी येतात तेव्हा सुर्याच्या विरोधी दिशेला सुर्यकिरणांमुळे हवेतील रंगाचं अपवर्तन होतं आणि मग सात रंगाचं इंद्रधनुष्य दिसतं.  अनेकदा सकाळी किंवा संध्याकाळच्या सुमारास आपल्याला हे इंद्रधनुष्य पाहायला मिळतात.

जिथे स्वच्छ हवा असते तिथे ठळकपणे इंद्रधनुष्य दिसत असतात. शहरी भागामध्ये धुलीकण आणि हवा प्रदुषणामुळे आपल्याला सहजासहजी पावसाळ्यात हे इंद्रधनुष्य दिसत नाहीत. पण अमेरिकेच्या हवाई प्रांतामध्ये हवा स्वच्छ असल्यामुळे तिथे पावसाळ्यामध्ये वरचेवर इंद्रधनुष्य दिसतात.

रेन्बो चेस ॲप

हवाई विद्यापीठातील ॲटमोस्फिरीक सायन्स स्टीवन बसिंगर यांनी हवाईमध्ये कुठे कुठे इंद्रधनुष्य दिसणार आहे दिसू शकतो, याची माहिती स्थानिक लोकांना आणि पर्यटकांना मिळावी यासाठी रेन्बो चेस हे विशेष ॲप तयार केलं आहे.  हवाईमध्ये इंद्रधनुष्यासाठी वेगवेगळी अशी तब्बल 20 नावं आहेत.

इंद्रधनुष्याला धार्मिक अधिष्ठान

हवाई संस्कृतीमध्ये इंद्रधनुष्याला दैवी शक्ती मानलं जातं. तिकडच्या संस्कृतीमध्ये इंद्रधनुष्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं.  हवाई प्रातांचे द नेचर कन्झर्वेन्सी संस्थेचे सल्लागार सॅम ओहू गॉन यांनी अशी माहिती दिली की, हवाई संस्कृतीनुसार इंद्रधनुष्याला स्थानिक देवता ‘कान’ हिचे प्रतिक मानलं जातं.  इंद्रधनुष्याच्या अगदी जवळ असतात असे लोक जास्त ताकदवान, धैर्यवान असतात असा इथल्या स्थानिकांचा समज आहे.

हवाई संस्कृतीचे अभ्यासक हिनालेमोआना वोंग – कालू यांनी सांगितलं की, इंद्रधनुष्य हे ‘औमाकुआ’ म्हणजे पूर्वज किंवा कुटुंबाचा देव मानला जातो. याच्यामागे आख्यायिका अशी आहे की, जेव्हा आपल्या कुटुंबातील कोणाचा मृत्यू होतो तेव्हा ते आपल्याला त्यांची उपस्थिती दर्शविण्यासाठी इंद्रधनुष्याच्या माध्यमातून प्रकट होत असतात.

काही शतकानंतर ब्राझिलमध्ये असे इंद्रधनुष्य दिसू लागतील

न्यूयॉर्क विद्यापीठाच्या पर्यावरणीय अभ्यासक प्राध्यापक किंबरली कार्लेसन यांनी दोन वर्षापूर्ण एक संशोधन पेपर सादर केला.  त्यांच्या संशोधनानुसार आता होणाऱ्या हवामान बदलांमुळे सन 2100 मध्ये ब्राझिल, भूमध्यसागर आणि मध्य आफ्रिकेच्या काही भागामध्ये आता जसे हवाईमध्ये इंद्रधनुष्य दिसत आहेत तसे दिसायला सुरुवात होईल. या भागामध्ये आता खूप बर्फवृष्टी होत असते. मात्र तिथे कालांतराने मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता आहे. यात अमेरिकेच्या अलास्का राज्याचाही समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Screen Addiction : भारतातील अनेक मुले दररोज 2 ते 4 तास स्क्रीनकडे बघतात. आणि कोरोनाच्या आधीचा काळापेक्षा आताचा हा स्क्रीन
Iran - Israel War : इराण आणि इस्त्रायल या दोन्ही देशा दरम्यान संघर्षाची ठिणगी पडली आहे. आखातातल्या या देशापासून आपण
Vaccine on Cocaine : अमली पदार्थाचं व्यसन सोडवण्यासाठी आता थेट लसीची निर्मिती केली आहे. कोकेनचं सेवन केल्यावर ते मेंदूपर्यंत पोहोचू

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ