जागतिक पातळीवर एखाद्या घटनेचं स्मरण करण्यासाठी, आरोग्य विषयक जनजागृतीसाठी, एखाद्या वन्यजीवांच्या संवर्धनासाठी विशेष दिन साजरे केले जातात. असे हे विशेष दिवस साजरे करण्यामागे काहीना काही कथा असतात. आज जागतिक सिंह दिनानिमित्त हा दिवस कधिपासून कोणी का सुरू केला याचा प्रवास जाणून घेऊयात.
जागतिक सिंह दिनामागचा उद्देश
पहिला जागतिक सिंह दिन हा 2013 साली साजरा केला होता. डेरेक आणि बेव्हरली जौबर्ट यांना जंगली मांजरांचा सांभाळ आणि संवर्धन करणं खूप आवडायचं त्यामुळे ते खूप वेळ या प्राण्यांसोबत घालवायचे. त्याचवेळी जागतिक पातळीवर सिंहाची संख्या झपाट्याने कमी होत चालली असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. विविध जातीतल्या सिंहाचं संवर्धन व्हावं यासाठी त्यांनी ‘नॅशनल जिओग्राफी’ या चॅनलकडून मदत मागितली.
‘नॅशनल जिओग्राफी’ या चॅनलच्या साहाय्याने जौबर्ट दांम्पत्यांनी 2009 मध्ये बीग कॅट इनिशिएटिव्ह ( BCI) चळवळ सुरू केली. जागतिक पातळीवर विविध जातीतल्या सिंहाच्या जातीचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी या चळवळी अंतर्गत विशेष प्रयत्न सुरू केले. जंगलतोड, हवामान बदल, मानवी हस्तक्षेप यासारख्या बाबींमुळे सिंहाच्या अस्तित्व नाहिसं होऊ लागलं आहे. या कारणांशिवाय हिमयुन आणि विविध नैसर्गिक आपत्तींचाही सिंहाच्या संख्येवर परिणाम होत असल्याचं आढळून आलं आहे. विशेषत: भारतात आणि दक्षिण आफ्रिकेत नैसर्गिक आपत्तींमुळे सिंहाच्या अधिवासावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
आतापर्यंत या मोहिमेसाठी या संस्थेला 150 हून जास्त अनुदान पुरस्कार मिळाले आहेत. जवळपास 3 हजार जंगली मांजरांना धोकादायक स्थितीतून या चळवळीतच्या माध्यमातून वाचवलं आहे. तर 13 हजारहून जास्त जीवघेण्या सापळ्यातून त्यांना सुरक्षित ठेवलं आहे.
मांजरीच्या प्रजातीतला शिकारी प्राणी – सिंह
सिंह हा ‘फेलिडे’ मांजरीच्या प्रजातीतला आहे. सगळ्यात बलाढ्य शिकारी प्राणी म्हणून त्याची विशेष ओळख आहे. या फेलिडे जातीतल्या मांजरीचं म्हणजे सिंहाचं वजन हे 300 ते 600 पौंड असतं. या जातीतली पहिली मांजर हा वाघ असतो.
सिंहाचं शरीर हे स्नायूमय असतं. त्याचं डोकं लहान आणि कान गोल असतात आणि शेपूट जाड असते. सिंहीणीमध्ये आढळणाऱ्या जड आकर्षक मानेवरुन त्यांचं लिंग ओळखता येते. सिंह हे जंगलात नेमही घोळक्याने फिरत असतात. यामुळे त्यांना शिकार करणं सोपं जाते.
जागतिक स्तरावर सिंहांची संख्या
जागतिक स्तरावर सिंहांच्या दोन मुख्य उपप्रजाती आहेत. आफ्रिकन सिंह आणि आशियाई सिंह. आफ्रिकन सिंह हे उप-सहारा आफ्रिकेमध्ये आढळतात. तर आशियाई सिंह हे फक्त भारताच्या गीर जंगलातच पाहायला मिळतात. 2020 च्या अंदाजानुसार, जगभरात सुमारे 23 हजार ते 39 हजार सिंह आहेत. यापैकी 20 हजार ते 26 हजार सिंह हे आफ्रिकन सिंह आहेत. तर आशियाई सिंह फक्त 600 ते 700 आहेत.
सिंहाच्या संवर्धनासाठी उपाय
सिंहाची घटती संख्या पाहता त्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि त्यांची संख्या वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. जसं की अधिवास संरक्षण, मानवी-सिंह संघर्ष कमी करणे, आणि अवैध शिकारीला आळा घालणे गरजेचं आहे.
जागतिक स्तरावर सिंहांबद्दल जागरूकता वाढवून त्यांच महत्त्व लोकांना पटवून देणं आवश्यक आहे.