गुंतवणुकीसाठी जपानची भारताला पसंती!

Japanese FDI Investment in India : जपाने गुंतवणुकीसाठी भारताला सर्वाधिक पसंती दिली आहे. 'जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन' (जेट्रो) या संस्थेने जपान व्यवसायिकांना घेऊन केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
[gspeech type=button]

जागतिक पातळीवर भारताकडे एक उत्तम बाजारपेठ म्हणून पाहिलं जायचं. मात्र, आता या विचारामध्ये बदल होऊन गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून भारताचा विचार केला जातो. जपानेही गुंतवणुकीसाठी भारतालाच सर्वाधिक पसंती दिली आहे. जपान एक्सटर्नल ट्रेड ऑर्गनायझेशन (जेट्रो) या संस्थेने जपान व्यवसायिकांना घेऊन केलेल्या सर्व्हेक्षणातून ही बाब समोर आली आहे. जपानमधील 80 टक्के व्यवसायिक हे पुढच्या दोन वर्षात भारतामध्ये आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत भारतामध्ये व्यवसाय सुरू करु इच्छिणाऱ्यांमध्ये 4.7 टक्क्याची वाढ झाली आहे.

जपानची भारताला पसंती का?

‘द जपान बँक ऑफ इंटरनॅशनल कोऑपरेशन’ने जपानी परकीय थेट गुंतवणुकी संदर्भात डिसेंबर महिन्यात अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार, 58 टक्के जपानी व्यावसायिकांनी गुंतवणुकीसाठी पुढच्या तीन वर्षात भारत हा सर्वोत्तम पर्याय असल्याचं मत व्यक्त केलं आहे. त्याउलट, चीनमधल्या गुंतवणुकीत 17 टक्क्याची घट झाल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.

गुंतवणुकीसोबतच बाजारपेठ म्हणूनही भारत हा चांगला पर्याय आहे. भारतातील वाढती अर्थव्यवस्था, लोकसंख्या आणि मध्यमवर्गीयांचे वाढते प्रमाण या घटकांमुळे बाजारपेठ म्हणून भारत हा उत्तम पर्याय ठरत आहे. याच घटकांमुळे जपानी कंपन्यांना भारतात 2024 सालामध्ये विविध क्षेत्रात चांगला नफा मिळाला असल्याचंही या अहवालात स्पष्ट केलं आहे.

भारतातील संसाधने, मुबलक मनुष्यबळ आणि व्यवसायालापूरक असलेली धोरणं या मुख्य कारणांमुळे अनेक जपानी कंपन्यां भारतामध्ये आपले व्यवसाय सुरू करत आहेत.

दरम्यान, राजकीय अस्थिरता (केंद्रीय पातळीवर स्थापन करावं लागलेलं एनडीए सरकार), पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कंपन्यांविषयी प्रसिद्ध झालेल्या बातम्या (अदानीसारखे विषय) हे जपानी व्यवसायिकांसाठी महत्त्वपूर्ण विषय होते.

भारतातील जपानी कंपन्यांचा व्यवसाय जरी वाढत असला तरी, भारतातील कामगारांचा वाढता पगार खर्च, कर रचनेत वारंवार होणाऱ्या बदलांवर या व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तरिही जपानमधील मोठे उद्योजक हे भारतात गुंतवणूक करण्यासाठी जास्त उत्सुक आहेत.

2024 सालामध्ये जपानी कंपन्यांनी भारतामध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. भारत आणि आसियान देशांमध्ये उत्पादन पुरवठा साखळ्या आणखीन मजबूत करुन व्यवसाय वाढीसाठी जपान प्रयत्नशील आहे.

भारतासह नवीन देशांमध्ये जपानची गुंतवणूक

जेट्रो संस्थेच्या सर्व्हेनुसार, जपानी व्यवसायिक हे भारताला गुंतवणुकीसाठी पहिली पसंती देतात. भारतानंतर ब्राझील, संयुक्त अरब आमिराती, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि साऊथ आफ्रिका या देशांना पसंती दिली आहे.
आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिकमधील मोठ्या बाजारपेठा, व्यवसायवाढीसाठी असलेलं पूरक वातावरण आणि भविष्यातील संधी ओळखून जपान या देशांमध्ये अधिक गुंतवणूक करत आहे. त्यामुळेच गेल्या पाच वर्षापासून जपानने भारतात आणि मॅक्सिकोमध्ये आपल्या बाजारपेठेचा विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. .

जपान, चीन आणि इंडोनेशियाची साथ का सोडतेय?

आतापर्यंत जपानने चीन आणि इंडोनेशिया मध्ये जास्त गुंतवणूक केली आहे. मात्र, 2007 पासून जपानने चीनमधली गुंतवणूक कमी केली आहे. चीनमधल्या जपानच्या गुंतवणुकीमध्ये 21.7 टक्क्यांने घट झाली आहे. चीनप्रमाणे, यापूर्वी जपान थायलंडमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे गुंतवणूक करत असे. पण आता थायलंडमध्ये व्यवसाय सुरू करु इच्छिणाऱ्या व्यावसायिकांमध्ये 8.1 टक्क्यांने घट झाली आहे. सन 2023 मध्ये, थायलंडमधील राजकीय अस्थिरतेमुळे गुंतवणुकीमध्ये 34.1 टक्क्यांची घट झाली आहे.
चीनमधलं आर्थिक संकट, पुरवठा साखळीतील अडचणी, जागतिक पातळीवर चीनचं स्थान आणि राजकारणातील कुरघोड्या या कारणांमुळे जपानी व्यावसायिक चीनमध्ये गुंतवणूक करण्यास आता फारसे इच्छुक नाही आहेत.

जेट्रो संस्थेचं सर्व्हेक्षणाचं स्वरुप

ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 महिन्यामध्ये जेट्रो संस्थेने जगभरातील 83 देशांमध्ये व्यवसाय करीत असलेल्या जपानी कंपन्यांचा सर्व्हे केला. यामध्ये आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका येथील देशांमध्ये सर्वाधिक 66 टक्के नफा मिळवलेल्या जपानी कंपन्यांचा समावेश होता. भारत, व्हिएतनाम, मॅक्सिको आणि ब्राझिल या देशांमध्ये जपानी कंपन्यांनी 2024 सालामध्ये चांगला नफा मिळवला. त्याउलट चीन, थायलंड, जर्मनी आणि नेदरलॅंड या देशांमध्ये विशेषत: ऑटोमोटिव्ह क्षेत्रामध्ये जपानी कंपन्यांना अपेक्षित नफा मिळवता आलेला नाही. तरिही, 1 टक्का जपानी व्यावसायिकांनी चीन आणि तत्सम देशांतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Google Gemini Advanced : गुगलने आपल्या AI चॅटबॉट Gemini साठी ‘AI Premium Plan’ हे खास सब्सक्रिप्शन आणलं आहे. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी
Australian universities restrictions : ऑस्ट्रेलियामधील काही विद्यापीठांनी भारतातल्या काही राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जावर निर्बंध घातले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश,
Meta's AI technology : सोशल मीडियावरील लहान मुलांची सुरक्षितता लक्षात घेता मेटा कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे. मेटाच्या मालकीचे सोशल

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ