ट्रम्प सरकारमधील भारतीय अधिकारी

President Donald Trump : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रशासकीय बाजू मजबूत राहून प्रभावीपणे काम व्हावं, यासाठी अनेक महत्त्वाच्या पदावर भारतीय अधिकाऱ्यांची निवड केली आहे. “अमेरिकेला पुन्हा जगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवायचं आहे. त्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यक्तिंना अमेरिकेमध्ये सामावून घेतलं जाणारच” ही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भूमिका आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आज राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेऊन पदभार हाती घेणार आहेत. ट्रम्प यांच्या या दुसऱ्या कारकिर्दीत सगळ्यात क्षेत्रात बदल घडणार आहेत. हे नक्की. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ (MAGA) ही चळवळ सुरू करून याच धर्तीवर प्रचार करत ट्रम्प यांच्या रिपब्लिक पक्षाने निवडणूक जिंकली. 

ट्रम्प यांनी त्यांच्या सरकारमध्ये प्रशासकीय बाजू मजबूत राहून प्रभावीपणे काम व्हावं, यासाठी अनेक महत्त्वाच्या पदावर भारतीय अधिकाऱ्यांची निवड केली. तेव्हा मात्र, या मागा चळवळीतील काही कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला. पण या वादामध्ये, “अमेरिकेला पुन्हा जगाच्या सर्वोच्च स्थानी ठेवायचं आहे. त्यासाठी जगातील सर्वोत्तम व्यक्तिंना अमेरिकेमध्ये सामावून घेतलं जाणारच” असं मत डोनाल्ड ट्रम्प यांनी ठामपणे मांडलं. 

पाहुयात ट्रम्प यांच्या सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले भारतीय अधिकारी

विवेक रामास्वामी, गर्व्हरमेंट एफिशियन्सी

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या दुसऱ्या कारकिर्दीमध्ये प्रशासकीय विभाग अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘गर्व्हनमेंट एफिशियन्सी’ विभाग सुरू करत आहेत. या विभागाचे प्रमुख म्हणून  ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी आणि एलॉन मस्कची निवड केली आहे. हे दोघेही सिलिकॉन व्हॅलीमधले उद्योजक आहेत.

विवेक रामास्वामी यांचा जन्म ओहयो राज्यातल्या सिनसिनाटी इथं झाला आहे. रामास्वामी यांच्या जन्मापूर्वी त्यांच्या पालकांनी केरळ इथून अमेरिकेला स्थलांतर केलं.  हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी जीवशास्त्राची पदव्युत्तर पदवी घेतली आहे. तर येल विद्यापीठातून त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. सन 2014 मध्ये त्यांनी रोव्हिअंट सायन्स नावाची फॉर्मास्युटिकल कंपनी सुरू केली. याशिवाय ट्राविस मे आणि एका बायोटेक कंपनीचे ते सह- संस्थापक होते. जीवशास्त्र आणि वित्तसंस्था क्षेत्रामध्ये त्यांनी जास्त काम केलं आहे. 

ओहयो राज्याच्या राज्यपाल पदाची निवडणूक लढण्यासाठी  रामास्वामी हे ट्रम्प सरकार मधली ही महत्त्वाची जबाबदारी सोडू शकतील, अशा बातम्या माध्यमामधून समोर आल्या होत्या. मात्र असंं घडली नाही आहे. 

जय भट्टाचार्य, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक 

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारतीय वंशांचे जय भट्टाचार्य यांच्या नावाची घोषणा राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालकपदी केली होती. जय भट्टाचार्य यांचा जन्म कोलकत्तामध्ये झाला होता. उच्च शिक्षणासाठी त्यांनी अमेरिकेमध्ये स्थलांतरण केलं होतं. 1990 साली त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून बॅचरल ऑफ आर्ट्स आणि एमएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी डॉक्टर ऑफ मेडिसिन (एमडी) ची पदवी घेतली. 2000 साली त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं.  

अमेरिकेच्या राष्ट्रीय आरोग्य संस्थेच्या संचालक पदाचा कार्यभार हाती घेण्यापूर्वी ते स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत होते. त्यांचे अर्थशास्त्र, कायदे आणि आरोग्यक्षेत्रा संबंधित अनेक संशोधन पेपर प्रसिद्ध झाले आहेत. 

कश्यप पटेल, एफबीआय संचालक

कश्यप उर्फ कॅश पटेल हे भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आहेत. त्यांचं बालपण न्यूयॉर्क मधील गार्डन सिटीमध्ये गेलं. तिथेच त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केलं. पटेल यांनी रिचमंड विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पुढे पेस विद्यापीठातून त्यांनी  कायद्याची पदवी घेतली. तसचं युनायटेड किंगडममधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉ मधून इंटरनॅशनल लॉचं शिक्षण घेतलं.  

कश्यप पटेल यांनी “Government Gangsters: The Deep State, the Truth, and the Battle for Our Democracy” आणि “The Plot Against the King” ही पुस्तकं सुद्धा लिहीली आहेत. 

श्रीराम कृष्णन, एआय तंत्रज्ञानाचे प्रमुख सल्लागार

ट्रम्प सरकारच्या दुसऱ्या कारकिर्दीत श्रीराम कृष्णन हे व्हाईट हाऊसच्या एआय तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

श्रीराम कृष्णन यांचा जन्म चैन्नईमध्ये झाला आहे. तामिळनाडूतल्या एसआयएम इंजिनियरिंग कॉलेजमधून त्यांनी माहिती तंत्रज्ञान विषयात बीटेकची पदवी घेतली आहे. 2005 साली अमेरिकेमध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरीला सुरुवात केली. ट्विटर, याहू, फेसबूक आणि स्नॅप अशा महत्त्वाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी काम केलं आहे. 

फेब्रुवारी 2021 मध्ये ते अँडरसन होरोविट्झ कंपनीचे पार्टनर होते. 2023 मध्ये त्यांनी ही कंपनी सोडली. उद्योजक म्हणून जबाबदारी पार पाडतानाच श्रीराम यांनी आपल्या पत्नीसोबत  2021 साली ‘द आरती ॲन्ड श्रीराम शो ’ म्हणून पॉडकास्ट करायचे. हा त्यांचा शो ‘द गूड टाइम शो’ म्हणून प्रसिद्ध होता. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Tax Free Country : काही देशांमध्ये 'व्हॅट' नावाचा टॅक्स असतो. म्हणजे, कोणतीही वस्तू विकत घेतली किंवा सेवा वापरली, तर त्यावर
Illegal migrants return to India - अमेरिकेच्या सी-17 एअरक्राफ्टमधून भारतातील अनधिकृत स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे. अनधिकृत स्थलांतरितांसंबंधित अमेरिकेने
Trump’s tariffs list : डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील वस्तूंवर कर लावण्याचे आदेश दिल्यामुळे अमेरिकेच्या व्यापार भागीदार देशांना

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश