भारतातील किराणा पिशवी, गंजलेला पत्र्याचा डबा परदेशात ‘लक्झरी आयटम’!

Indian Utility Items Are Being Rebranded As Luxury : भुसारी आणि वाण्याकडच्या कळकट पिशव्यांना लकाकी मिळालीय. अमेरिकेतील 'Nordstrom' नावाच्या मोठ्या ब्रँड स्टोअरमध्ये या झोला बॅगा $48 म्हणजेच ₹4100 ला विकल्या जात आहेत. त्यावर “Ramesh Namkeen” असं छान प्रिंट ही केलंय.
[gspeech type=button]

तुम्हाला माहीत आहे का, आपल्या रोजच्या वापरातील साध्या वस्तू, जसं की किराणा पिशव्या किंवा स्वयंपाकघरात कडधान्य, तांदूळ, मसाले इत्यादी सामान ठेवण्यासाठी जे डबे आपण वापरतो. या गोष्टी बाहेरच्या देशात खूप ‘महागड्या वस्तू’ म्हणून विकल्या जातायत.

आपण ज्या गोष्टी सहज मिळवतो, त्यांना आपल्याकडे फारसं महत्त्व दिलं जात नाही. पण परदेशात या वस्तू ‘स्टाइल’, ‘लक्झरी’ किंवा ‘विंटेज’ म्हणून हजारो रुपयांना विकल्या जात आहेत.

चला तर मग पाहूया, आपल्याकडच्या अशा कुठल्या वस्तू आहेत ज्या परदेशात इतक्या महाग विकल्या जातायत.

‘रमेश नमकीन’ झोला तब्बल ₹4100 ला

आपल्याकडे फार पूर्वी पासून वाण्याकडे महिन्याच्या किराण्याची यादी दिली की, त्याचा माणूस पिशव्यांमध्ये भरून घरपोच हे सामान आणून देतो. याकरता वाण्यांकडे पापड, लोणची, अगरबत्ती किंवा गुटखा ब्राडींग लिहिलेल्या मोठ्या जाड कापडी पिशव्या असतात. या पिशव्यांमध्ये 15-20 किलो सामान सहज मावतं. या झोला पिशव्या आपल्यापैकी कित्येकांच्या घरी असतातही. याची किंमत फार तर शंभर रुपये असेल. मार्केट यार्डातून सामान, मंडईतून भाजी किंवा गावाहून येताना सामान अशा गोष्टींसाठी आपण या झोला बॅगा वापरतो. पण आपल्या याच झोला बॅगा आता परदेशात ‘विंटेज क्लासिक’ उपाधी मिरवत आहेत. भुसारी आणि वाण्याकडच्या कळकट पिशव्यांना लकाकी मिळालीय. अमेरिकेतील ‘Nordstrom’ नावाच्या मोठ्या ब्रँड स्टोअरमध्ये या झोला बॅगा $48 म्हणजेच ₹4100 ला विकल्या जात आहेत. त्यावर “Ramesh Namkeen” असं छान प्रिंट ही केलंय.

हे सगळं ‘Puebco’ नावाच्या जपानी कंपनीने केलंय. त्यांच्या मालकाचं नाव हिरोताका तनाका. तो एकदा भारतात आला होता तेव्हा त्याला आपल्या देशातल्या या वापरातल्या वस्तू खूप आवडल्या. मग त्यांनी हाच माल गोळा केला, थोडं डिझाइन केलं आणि परदेशात विकायला सुरुवात केली.

नायलॉन पिशवीची ₹3000 ला विक्री

आपण गावाला जाताना किंवा बाजारात जाताना सामान ठेवण्यासाठी जी रंगीबेरंगी पट्ट्यांची प्लास्टिक/नायलॉन पिशवी वापरतो ना, ती पिशवीही परदेशात “Recycled Plastic Striped Bag” या नावाने विकली जाते. आणि या पिशवीची किंमत तब्बल ₹3000 ते ₹6000 पर्यंत आहे.

आपल्याकडे ही पिशवी बाजारात फक्त 100-150 रुपयांना मिळते. पण परदेशात याला ‘इको-फ्रेंडली स्टाईलिश बॅग’ म्हणतात.

स्टीलचा डबा ₹22,700 ला

आपल्याकडे घरोघरी स्वयंपाकघरात सामान ठेवण्यासाठी स्टीलचे डब्बे आपण वापरतो. काहीजण कामावर जाताना किंवा शाळेत जाताना स्टीलच्या छोट्या डब्यातून पोळी-भाजी, वरण-भात घेऊन जातात. पण, हाच साधा स्टीलचा डबा परदेशात “Beverage Dispenser” नावाने ₹22,700 ला विकला जात आहे. एका डब्याची इतकी जास्त किंमत ऐकून कोणालाही आश्चर्य वाटेलच. कारण भारतात या डब्याची किंमत फारफार तर 500 रुपयापर्यंत आहे. आणि परदेशात मात्र हाच डब्बा हजारोच्या किंमतीत विकला जातोय.

पत्र्याचा गंजलेला धान्याचा डबा ₹10,500 ला

घराबाहेर, किचनमध्ये कोपऱ्यात ठेवलेला एखादा गंजलेला स्टीलचा डबा. जो धान्य, साखर, डाळी ठेवायला वापरला जातो. हाच डबा परदेशात “Vintage Steel Storage” म्हणून विकला जातो. आणि त्याची किंमत आहे ₹10,500. आपण मात्र अनेकवेळा हे वापरलेले जुने डबे गंजले की ते घराबाहेर काढून टाकतो.

लुंगी – ₹24,000 ला

आपल्याकडे पुरुष रोजच्या वापरासाठी जी लुंगी घालतात ज्याची किंमत 200-300 रुपये असते. तीच लुंगी परदेशात ‘Jean Paul Gaultier’ या जगप्रसिद्ध फॅशन ब्रँडने ‘Printed Beach Cover-Ups’ म्हणून ₹24,000 ला विकायला सुरुवात केली आहे.

लाकडी खाट – ₹55,000 ला

आपल्याकडे जी लाकडी खाट आपण झोपायला वापरतो, तीच खाट ऑस्ट्रेलियात 55 हजार रुपयांना विकली जाते. डॅनियल नावाचा ऑस्ट्रेलियन 2010 मध्ये भारतात आला होता. त्याला ही खाट खूप आरामदायक वाटली. मग त्याने सिडनीमध्ये अशीच खाट स्वतः तयार केली आणि विकायला सुरुवात केली. भारतात साधारण 3000-5000 रुपयांत मिळणारी खाट तिकडे लक्झरी फर्निचर म्हणून ओळखली जाते.

परदेशात जिथे लोक मोठ्या ब्रँडच्या मागे धावत असतात, तिथे आपल्या भारतातल्या या साध्या-साध्या वस्तूंना ‘ब्रँड’ बनवून विकलं जातंय.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Trump’s 25% tariff on India and MAGA : ट्रम्प यांचा भारतावरील 25% टॅरिफ आणि 'MAGA' चा नारा हे एक गुंतागुंतीचं
World lung cancer day : एआय, अ‍ॅडॉप्टिव्ह थेरपी यासारख्या अचूक साधनांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रेडिओथेरपीमध्ये बदल घडत आहेत. यामुळे जलदगतीने उपचार
World Wide Web Day : इंटरनेट क्रांती आणि या क्रांतीतला या नावीन्यपूर्ण संशोधनाची आठवण म्हणून 1 ऑगस्टला जागतिक वर्ल्ड वाईड

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ