जेडी व्हॅन्स हे ट्रम्प यांचे उपाध्यक्ष असतील. भारताशी त्यांचा संबंध काय?

USA Election - डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केल्यावर, त्यांच्या भाषणात जे.डी. व्हान्स आणि त्यांची पत्नी उषा चिलुकुरी व्हान्स यांचं कौतुक केलं.
[gspeech type=button]

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजयाचा दावा केल्यावर, त्यांच्या भाषणात जे.डी. व्हान्स आणि त्यांची पत्नी उषा चिलुकुरी व्हान्स यांचं कौतुक केलं. उषा चिलुकुरी या भारतीय-अमेरिकन आहेत. ट्रम्प यांनी जे. डी. व्हान्स यांना विजयासाठी आणि उपराष्ट्राध्यक्षाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

व्हान्स यांचं भारताशी एक विशेष नातं आहे. एका मुलाखतीत व्हान्स यांनी सांगितलं की, ‘उषाची हिंदू धर्मावरील श्रद्धा आणि तिच्या जीवनशैलीनं त्यांना जीवनाकडे एका नवीन दृष्टीकोनातून पाहायला शिकवलं.

व्हाइट हाऊस सोडून चार वर्षांनी परत आलेल्या ट्रम्प यांनी बुधवारी ,11 नोव्हेंबर 2024 ला सकाळी पाम बीच काउंटी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आपल्या विजयाची घोषणा केली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या घोषणेनंतर जे.डी.व्हान्स यांनी आपल्या समर्थकांना सांगितले की, “आज आपण सर्वांनीच अमेरिकेच्या इतिहासातलं सर्वात मोठं राजकीय पुनरागमन पाहिलं. अध्यक्ष ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तुमच्यासाठी,तुमच्या स्वप्नांसाठी आणि तुमच्या मुलांच्या भविष्यांसाठी लढणं कधीच थांबवणार नाही. आम्ही आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभं करून दाखवू”

जे.डी.व्हान्स हे ओहायोचे सिनेटर आहेत. ते आधी ट्रम्प यांच्यावर टीका करायचे पण आता तेच ट्रम्प यांच्या धोरणांचं पूर्णपणे समर्थन करतात. रिपब्लिकन राष्ट्रीय अधिवेशनात भाषण करताना जे.डी.व्हान्स यांनी आपल्या आधीच्या आयुष्याबद्दल सांगितलं. कँटकी आणि ओहायोमधील गरीब कुटुंबात त्यांचं बालपण गेलं. त्यांची आई ड्रग्सच्या आहारी गेली होती आणि वडील घरात कधीच नसायचे. परंतु, अशा परिस्थितीतही जे.डी.व्हान्सने कठोर परिश्रम केले आणि सर्व अडचणींवर मात करत यश संपादन केलं.

जे.डी.व्हान्स यांनी मरीन कॉर्प्समध्ये प्रवेश केला. त्यांनी येल लॉ स्कूलमधून (Yale Law School) शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ते अमेरिकेच्या राजकारणात उच्च पदांवर पोहचले. 2014 मध्ये जे.डी.व्हान्स यांनी भारतीय-अमेरिकन वकील उषा वेंस यांच्यासोबत विवाह केला. उषा आणि जे.डी.व्हान्स दोघांनी एकमेकांच्या संस्कृतीला आणि जीवनशैलीला पूर्णपणे स्वीकारलं आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

पाकिस्तानने भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्करी ताकद वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी 13 ऑगस्ट 2025
Gaza Famine : एकात्मिक अन्न सुरक्षा टप्प्याचे वर्गीकरण (IPC) या संयुक्त राष्ट्रसंघाशी संबंधित संस्थेने गाझा शहरामध्ये अखेर दुष्काळ जाहीर केला
Denmark Book Tax Free : वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी डेन्मार्कमध्ये अखेर पुस्तकांवरील विक्री कर रद्द केला आहे. युरोपमध्ये ब्रिटनमध्ये पुस्तकांवर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ