रिक्षाचं डिझाईन असणारी लुई व्हिटॉन ब्रँडची हँडबॅग

Louis Vuitton Handbag : लुई व्हिटॉन' (Louis Vuitton) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या स्प्रिंग/समर '26 मेन्सवेअर कलेक्शनमध्ये' चक्क मिनी ऑटो रिक्षाच्या आकाराच्या हँडबॅग्स रॅम्पवर फिरताना दिसल्या.
[gspeech type=button]

तुम्ही कधी विचार तरी केला होता का, की आपली रोजची लाडकी ‘ऑटो रिक्षा’ कधी पॅरिस फॅशन वीकच्या (Paris Fashion Week) रॅम्पवर दिमाखात चालेल? बासमती तांदळाच्या पिशव्या आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यानंतर, आता भारताकडून आणखी एका आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडला ‘प्रेरणा’ मिळाली आहे. यावेळी, आपल्या लाडक्या आणि रोजच्या प्रवासातील ऑटो रिक्षाने सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे.

पॅरिसच्या रॅम्पवर ऑटो रिक्षाचा जलवा

‘लुई व्हिटॉन’ (Louis Vuitton) या जगप्रसिद्ध ब्रँडच्या स्प्रिंग/समर ’26 मेन्सवेअर कलेक्शनमध्ये’ (Spring/Summer ’26 Menswear Collection) चक्क मिनी ऑटो रिक्षाच्या आकाराच्या हँडबॅग्स रॅम्पवर फिरताना दिसल्या. या बॅग्स पाहिल्यावर इंटरनेटवर एकच चर्चा सुरू झाली आहे आणि सगळे जण यावर मजेदार कमेंट्स करत आहेत.

या बॅग्स अगदी हुबेहूब रिक्षासारख्या होत्या. त्यांना तीन चाकं होती, रिक्षाचे हँडल होते आणि पिवळ्या रंगाचा डबा असलेला ‘कॅनोपी’ होता. विशेष म्हणजे, लुई व्हिटॉनच्या क्लासिक तपकिरी रंगाच्या लेदरवर त्यांचे खास ‘गोल्ड LV मोनोग्राम’ डिझाइन होते. ही या ब्रँडची ओळख आहे. पण यात सर्वात मजेदार गोष्ट होती ती म्हणजे, आपल्या मध्यमवर्गीय लोकांच्या प्रवासाचं महत्त्वाचं साधन असलेल्या या रीक्षाचं डिझाईन असणारी बॅग आता तब्बल 35 लाख रुपयांना विकली जाणार आहे.

भारतीय संस्कृती

या फॅशन शोमध्ये फक्त रिक्षाची बॅगच नव्हती, तर भारतातील अनेक गोष्टींपासून प्रेरित असे अनेक डिझाइन्स पाहायला मिळाले. रत्नांनी सजवलेले दागिने असोत, किंवा क्रॅप-स्टाईल सँडल्स असोत, कलेक्शनमध्ये अनेक ठिकाणी भारतीय संस्कृतीचा प्रभाव स्पष्ट दिसत होता. भारतीय कला आणि डिझाइनचा वापर खूप सुंदर पद्धतीने केला होता.

पण तरीही, रिक्षाची बॅग एका अॅक्सेसरी पेक्षा जास्त आर्ट पीस म्हणून उठून दिसत होती. या रिक्षा बॅगचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर, इन्स्टाग्रामवर लोकांनी अनेक वेगवेगळ्या आणि मजेदार कमेंट्स केल्या आहेत.

या कलेक्शनमागची खास संकल्पना

प्रसिद्ध संगीतकार आणि डिझायनर फरेल विल्यम्स यांनी भारताची संस्कृती, वारसा आणि विविधतेतून प्रेरणा घेऊन त्याचं लेटेस्ट कलेक्शन तयार केलं होतं. तसेच, एका प्रचंड मोठ्या सापशिडीच्या बोर्डचं स्वरूप या इव्हेंट फ्लोअरला देण्यात आलं होतं. आणि या खास कामासाठी फरेल विल्यम्स यांनी मुंबईतील प्रसिद्ध आर्किटेक्ट बिजॉय जैन यांच्या ‘स्टुडिओ मुंबई’ सोबत काम केलं होतं.

विल्यम्स यांना पश्चिम बंगालमधील सुंदर हिल स्टेशन दार्जिलिंग खूप आवडतं आणि याची झलक संपूर्ण शोमध्ये दिसत होती. केशरी, पिवळा, मातीसारखा तांबूस आणि हिरवा हे रंग खासकरून पूर्ण कलेक्शनमध्ये वापरले होते. जे दार्जिलिंगच्या निसर्गाची आठवण करून देत होते.

या फॅशन शो मध्ये संगीतकार ए.आर. रहमान यांच्या नवीन, दमदार पंजाबी गाणं ‘यारा’ वर रॅम्पवर चालणाऱ्या मॉडेल्सनी ठेका धरला. तसंच, या शोमध्ये अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटी देखील उपस्थित होते.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

HFMD in Children : एचएफएमडी हा एक विषाणूजन्य आजार आहे आणि हा व्हायरसमुळे होतो. साधारणपणे 1 ते 10 वर्षांच्या लहान
ChatGPT psychosis : एआय चॅटबोटच्या त्यातही चॅटजीपीटीच्या अतिवापरामुळे अनेकांना मनोविकाराने घेरलं आहे. या आजाराचं नाव आहे, ‘चॅटजीपीटी सायकोसिस’.
Us Visa: अमेरिका तुम्हाला तुमची सोशल मीडिया खाती पब्लिक करण्यासाठी किंवा त्यांची माहिती देण्यासाठी सक्ती करू शकत नाही. पण जर

विधानसभा फॅक्टोइड

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ

दिल्ली – रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची घेतली शपथ