कधी अचानक आपला मोबाईल फोन खराब झाला तर तो दुरुस्तीला देणं म्हणजे एक प्रकारची रिस्कच असते. कारण अशावेळी तुमच्या फोनमधील खासगी डेटा,फोटो, मेसेजेस आणि इतर माहितीची चोरी होऊ शकते आणि त्याचा गैरवापर केला जातो. पण जर तुम्ही खालीलपैकी काही सोप्या गोष्टी केल्या तर, तुम्ही तुमच्या फोनमधील डेटा सुरक्षित ठेवू शकता.
1. USB डेटा ट्रान्सफर बंद करा
रिपेअरिंगसाठी फोन दिल्यावर, काही ठिकाणी तुमचा डेटा चोरण्यासाठी USB केबलचा वापर केला जातो. हे थांबवण्यासाठी, USB डेटा ट्रान्सफर बंद करा.
– Settings मध्ये जा
– USB settings किंवा About phone मध्ये > Software information मध्ये जाऊन Build number वर सात वेळा टॅप करा. यामुळे Developer options सुरू होईल.
– Settings मध्ये परत जाऊन Developer options शोधा.
– त्यात Default USB configuration मध्ये “Charging phone only” हा पर्याय निवडा. यामुळे फोन फक्त चार्ज होईल आणि डेटा ट्रान्सफर होणार नाही.
2. सिम कार्डला PIN लॉक लावा
तुमचं सिम कार्ड दुसऱ्या फोनमध्ये वापरलं गेलं तर तुमच्या कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस आणि इतर माहितीचा गैरवापर होऊ शकतो. हे टाळण्यासाठी सिम कार्डला PIN लॉक लावा.
– Settings मध्ये जा.
– Connections मध्ये Sim Manager किंवा Biometrics and security मध्ये Other security settings मध्ये जा.
– तुमच्या सिमवर क्लिक करा आणि Set SIM PIN हा पर्याय निवडा.
– तुमचा आवडता 4 अंकी PIN सेट करा. आता दुसऱ्या फोनमध्ये सिम वापरण्यासाठी त्याआधी तुम्हाला हा PIN टाकावा लागेल.
3. ॲप्सना दिलेली परवानगी एकाच वेळी काढून टाका
फोनमध्ये अनेक ॲप्सना आपण “All files access” देतो. दुरुस्तीच्या वेळी यामुळे तुमचा डेटा कोणीही बघू शकतो.
– Settings मध्ये जा.
– Apps मध्ये जा.
– वर उजव्या कोपऱ्यात तीन डॉट असतील त्यावर क्लिक करा.
– Special Access मध्ये जा.
– All files access हा पर्याय निवडा. इथे ज्या ॲप्सना ही परवानगी आहे, ती सर्व दिसतील. जी ॲप्स गरजेची नाहीत, त्यांची परवानगी बंद करा. यामुळे ते ॲप्स तुमच्या फोनमधील फाइल्स पाहू शकणार नाहीत.
4. महत्त्वाचे फाइल्स ‘सिक्युअर फोल्डर’मध्ये ठेवा
तुमच्या फोनमध्ये Secure Folder नावाचं एक खास फीचर असतं. हे एक व्हॉल्ट आहे. यात तुम्ही तुमचा महत्त्वाचा डेटा लपवून ठेवू शकता.
– Settings मध्ये जा.
– Security and Privacy मध्ये Secure Folder शोधा.
– तुमचा पासवर्ड, पिन किंवा पॅटर्न सेट करा.
– आता तुमच्या गॅलरीतील फोटो किंवा इतर कोणत्याही फाइल्सना सिलेक्ट करून Move to Secure Folder हा पर्याय निवडा. यामुळे त्या फाइल्स फक्त तुम्हालाच दिसतील, इतर कोणालाही दिसणार नाही.
5. Samsung Cloud Auto-Sync बंद करा
जर तुमच्याकडे Samsung चा फोन असेल, तर Samsung Cloud मध्ये तुमचा डेटा आपोआप सिंक होत राहतो. रिपेअरच्या वेळी हे चालू असेल तर तुमच्या डेटाचा गैरवापर होऊ शकतो.
– Settings मध्ये जा.
– Accounts and Backup मध्ये जा
– Samsung Cloud मध्ये Sync Settings शोधा.
– Auto-Sync बंद करा.
6. इतर काही महत्त्वाच्या टिप्स
फोन दुरुस्तीला देण्यापूर्वी तुमच्या फोनचा एक नीट फोटो काढून ठेवा. यामुळे फोनवर जर दुरुस्ती दरम्यान काही स्क्रॅचेस किंवा डॅमेज झालं असेल, तर नंतर आपण ते सिद्ध करू शकतो.
तुमच्या सिम कार्डमध्ये आणि मेमरी कार्डमध्ये अनेक महत्त्वाचे कॉन्टॅक्ट्स, मेसेजेस आणि फाइल्स असू शकतात. त्यामुळे ते फोनमधून काढून त्याचा बॅक अप ठेवा.
तुमचा फोन चोरीला गेला किंवा तो मिळाला नाही तर IMEI नंबर खूप महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुम्ही Settings > About phone मध्ये जा, तिथे तुम्हाला हा नंबर मिळेल. तो एका कागदावर लिहून ठेवा.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा लॉक स्क्रीन पासवर्ड, पॅटर्न किंवा पिन कोणालाही देऊ नका.
जर तुमच्या फोनचा डेटा जास्त महत्त्वाचा नसेल आणि तुम्ही त्याचा बॅकअप घेतला असेल तर, दुरुस्तीला देण्यापूर्वी फॅक्टरी रिसेट करा. यामुळे फोनमधील सर्व डेटा आधीच डिलीट होईल.
या टिप्स वापरल्यास तुमचा फोन आणि तुमचा खासगी डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील.