सहजसोपे न्यू इयर रेझल्युशन

New Year's resolution : न्यू इयर रेझल्युशन ही पारंपारिक पद्धत आता सोशल मीडियावर टॉप ट्रेंड असतो. येत्या नवीन वर्षात तुम्ही नवीन काय शिकू शकता? कोणत्या नवीन गोष्टींची सवय लावून घेऊ शकता, अशा स्वरुपाच्या अनेक पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील. 

न्यू इयर रेझल्युशन ही पारंपारिक पद्धत आता सोशल मीडियावर टॉप ट्रेंड असतो. येत्या नवीन वर्षात तुम्ही नवीन काय शिकू शकता? कोणत्या नवीन गोष्टींची सवय लावून घेऊ शकता, अशा स्वरुपाच्या अनेक पोस्ट तुम्ही सोशल मीडियावर पाहिल्या असतील.

1 जानेवारी आणि 2 जानेवारी, वर्षाच्या या पहिल्या दोन दिवसातच नवीन वर्षाच्या संकल्पाचा कसा चुरा झाला, या आशयाचे मीम्सही पाहायला मिळतील. या अशा मीम्स नंतर केवळ मजेसाठी न्यू इयर रेझल्युशन हा ट्रेंड राहिला आहे की काय हा प्रश्न आपसुकच येतो. पण मग यावर उपाय काय? तर यासाठी रेझल्युशन्स असे ठरवा जे सहजशक्य असतील आणि वर्षभर ते आपल्याला पाळता येतील.

सेल्फ ग्रुमींग 

स्वत:कडे, स्वत:च्या विकासावर लक्ष देणं. माणसाची शिकण्याची प्रक्रिया ही सतत सुरूच असते. मात्र, मोबाईलच्या सततच्या वापरामुळे आपण काहीतरी शिकत राहण्याऐवजी आपला बराचसा वेळ वाया घालवतो. मात्र, याच मोबाईलच्या माध्यमातून आपण आपलं ज्ञान वाढवू शकतो. मग ते आपल्याला असलेल्या एखाद्या छंदाविषयी असू शकते किंवा अभ्यासाविषयी. प्रवासात असताना किंवा कोणत्याही वेळी दर आठवड्याला किमान एकतरी माहितीपूर्ण डॉक्यूमेंटरी पाहावी.

आपल्यापैकी सगळ्यांनाच वाचायला आवडतंच असं नाही. पण ज्यांना वाचायला आवडतं, ते अनेकदा वेळ नसल्याचं निमित्त देतात. अशावेळी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत मोबाईलवर उपलब्ध असलेले ऑडिओ बुक्स किंवा मोबाईलवर पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असलेल्या पुस्तकाचं वाचन करता येऊ शकतं. आणि हे आपण प्रवासात किंवा सहज जेव्हा आपल्याला मोकळा वेळ मिळेल त्यावेळी करु शकतो.

फिटनेस

अनेकदा नवीन वर्षात मी अमुक किलो वजन कमी करणारचं किंवा अमुक किलो वजन वाढवणार, जीम लावणार, योग क्लासेसला जाणार असे अनेक फिटनेसचे दरवर्षीचे ठरलेले रेझल्युशन पुन्हा पुन्हा ठरतात. पण हे रेझल्युशन पूर्ण होत नाहीत.

पण केवळ जीम आणि योग केल्यानेच आपण तंदुरुस्त राहू शकतो असं नाही. वेळ आणि इच्छा असेल तर जरुर जीम आणि योग करावा. पण जर वेळेअभावी ते करता येत नसेल तर दिनचर्येमध्ये काही सोपे बदल करुनही आपण आपलं आरोग्य जपू शकतो.

जसं की, दररोज झोपण्याच्या वेळा पाळणं, दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं, जिथं जिथं शक्य आहे तिथं गाडीचा वापर न करता चालत जाणं. यासह स्मोकिंग आणि अल्कोहोलचं प्रमाण ठरवून कमी करणं. अशाही आरोग्यासंबंधीत चांगल्या सवयी आपण या नव्या वर्षात स्वत:ला लावू शकतो.

पर्सनल फायनान्स

सेव्हिंग्ज, गुंतवणूक हे अलीकडचे महत्वपूर्ण विषय आहेत. या नवीन वर्षात आपला महिन्याभराच्या खर्चाचं आर्थिक बजेट आखून आपल्या पगाराचा आणि खर्चाचा ताळमेळ साधणं गरजेचं आहे. त्यानुसार दर महिन्याला आपल्याला काही ठराविक रक्कम ही गुंतवता आली पाहिजे. तर काही ठराविक रक्कम ही आपत्कालीन खर्चासाठी सेव्ह करुन ठेवता आली पाहिजे. वर्षाच्या पहिल्या महिन्यातच आपण जर मेडिकल इश्यूरन्स, वीमा पॉलिसी आणि म्युच्युअल फंडमधल्या एखाद्या योजनेत पैसे गुंतवले तर वर्षअखेर आपल्याकडे एक चांगली रक्कम सेव्ह होऊ शकते. या माध्यामातून आपल्याला एक चांगली आर्थिक शिस्त लागू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

इतर बातम्या

Tax Free Country : काही देशांमध्ये 'व्हॅट' नावाचा टॅक्स असतो. म्हणजे, कोणतीही वस्तू विकत घेतली किंवा सेवा वापरली, तर त्यावर
Illegal migrants return to India - अमेरिकेच्या सी-17 एअरक्राफ्टमधून भारतातील अनधिकृत स्थलांतरितांना भारतात परत पाठवण्यात आलं आहे. अनधिकृत स्थलांतरितांसंबंधित अमेरिकेने
Trump’s tariffs list : डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा, मेक्सिको आणि चीनवरील वस्तूंवर कर लावण्याचे आदेश दिल्यामुळे अमेरिकेच्या व्यापार भागीदार देशांना

विधानसभा फॅक्टोइड

मुंबई – औद्योगिक प्रयोजनासाठी एनए सनद आवश्यक नाही; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश